Didn’t have (नव्हते) चा वापर: मालकी असण्याविषयी नकारात्मक उत्तरे
आपण भुतकाळातील मालकी असण्याविषयी नकारात्मक उत्तरे देण्यासाठी ‘डिडन्ट हॅव’ ‘नव्हते’ चा वापर करतो.
आपण मालकी असण्याविषयी नकारात्मक उत्तरे देण्यासाठी have सह didn’t (डू चे नकारात्मक रुप ) वापरतो.
वाक्यरचना
The formation of a negative answer is as;
नकारात्मक उत्तराची रचना अशी आहे;
- No, + subject + didn’t have + remaining words.
- नाही, + कर्ता (कोणतेही एकवचनी किंवा अनेकवचनी नाम) + नव्हते/नव्हता + उर्वरित शब्द
येथे काही उदाहरणे आहेत. वाक्यरचना वरीलप्रमाणे आहे.
चला एक नजर टाकूया-
- No, I didn’t have an elder brother.(relationship) नाही, मला एक मोठा भाऊ नव्हता. (नाते)
- No, Neela didn’t have two maternal aunts.(relationship) नाही, नीलाला दोन मावश्या नव्हत्या. (नाते)
- No, I didn’t have a coupon from Big Bazar.नाही, माझ्याकडे बिगबाजारचे कूपन नव्हते.
- No, we didn’t have a meeting at 2 pm yesterday.नाही, काल दुपारी दोन वाजता आमची बैठक झाली नाही.
- No, she didn’t have musical instruments last night.नाही, काल रात्री तिच्याकडे वाद्ये नव्हती.
- No, those boys didn’t have drawing books to draw a design.नाही, त्या मुलांकडे डिझाईन काढण्यासाठी चित्रकारी पुस्तके नव्हती.
- No, she didn’t have golden bangles.नाही, तिच्याकडे सोन्याच्या बांगड्या नव्हत्या.
- No, he didn’t have a big assignment of interior design.नाही, त्याला आंतरिक मांडणीचे मोठे नेमलेले काम नव्हते.
- No, Suvarna didn’t have two bags of red colour.नाही, सुवर्णाकडे लाल रंगाच्या दोन पिशव्या नव्हत्या.
- No, he didn’t have a circular wall clock.नाही, त्याच्याकडे भिंतीवरचे वर्तुळाकार घड्याळ नव्हते.
- No, Gaurav didn’t have so much office work yesterday.नाही, काल गौरवला कार्यालयीन काम खुप नव्हते.
- No, we didn’t have a new guitar that day.नाही, त्यादिवशी आमच्याकडे नवीन गिटार नव्हता.
- No, Nikita didn’t have a good time with him.नाही, निकिताने त्याच्याबरोबर चांगला वेळ घालवला नाही.
- No, a lion didn’t have a mane of golden hair.नाही, सिंहाला सोनेरी केसांची आयाळ नव्हती.
- No, doctors didn’t have a busy schedule in the medical camp.नाही, वैद्यकीय शिबिरात डॉक्टरांचे व्यस्त वेळापत्रक नव्हते.
- No, the bird didn’t have a nest in the tree.नाही, पक्ष्याला झाडावर घरटे नव्हते.
- No, animals didn’t have enough water in the forest.नाही, जंगलात प्राण्यांना पुरेसे पाणी नव्हते.
- No, a monkey didn’t have an infant under its arm.नाही, माकडाच्या बगलेत पिल्लू नव्हते.
- No, they didn’t have violet shirts with a yellow patch.नाही, त्यांना पिवळ्या रंगाचे ठिगळ लावलेले जांभळे शर्ट नव्हते.
- No, it didn’t have yellow eyes that frightened me.नाही, त्याच्या पिवळ्या डोळ्यांनी मला घाबरवले नाही.
- No, you didn’t have a blue skirt at the party.नाही, पार्टीत तुझ्या अंगावर निळा स्कर्ट नव्हता.
- No, we didn’t have that book in the college library.नाही, आमच्याकडे ते पुस्तक महाविद्यालयाच्या ग्रंथालयात नव्हते.
- No, Parth didn’t have five friends during his college days.नाही, कॉलेजच्या काळात पार्थला पाच मित्र नव्हते.
- No, teachers didn’t have a vacation in the month of April.नाही, एप्रिल महिन्यात शिक्षकांना सुट्टी नव्हती.
- No, Dolly didn’t have a green skirt with a red frill.नाही, डॉलीकडे लाल झालरचा हिरवा स्कर्ट नव्हता.
- No, it didn’t have too much pain in its ankle.(physical feeling) नाही, त्याच्या घोट्यात खूप वेदना नव्हती. (शारीरिक भावना)
- No, I didn’t have a green blouse with a white bow.नाही, माझ्याकडे पांढरा बो असलेला हिरवा ब्लाउज नव्हता.
- No, we didn’t have violet shirts as our uniform.नाही, आमचा जांभळा शर्ट हाच गणवेश नव्हता.
- No, that boy didn’t have a black t-scale.नाही, त्या मुलाकडे काळी टी-स्केल नव्हती.
- No, Sankita didn’t have eight subjects for her syllabus.नाही, संकिताला अभ्यासक्रमासाठी आठ विषय नव्हते.