Use of Did to Ask a Question

प्रश्न विचारण्यासाठी did चा वापर

भुतकाळातील प्रश्नार्थक वाक्य तयार करण्यासाठी did चा वापर केला जातो. did हे do चे भूतकाळी रूप आहे.

जेव्हा आपण प्रश्न विचारतो तेव्हा आपण वाक्याच्या सुरूवातीस did चा वापर केला पाहिजे.

वाक्यरचना

The formation is as;

वाक्यरचना अशी आहे;

 • Did + subject + base form of main verb + remaining words + ?
 • Did + कर्ता (मी / आम्ही / तू/ तूम्ही /आपण / तो/ ती/ ते / एकवचनी /अनेकवचनी संख्या) + मुख्य क्रियापदा चे मूळ रूप + उर्वरित शब्द +?

येथे काही उदाहरणे दिली आहेत. रचना वरीलप्रमाणे आहे.

Let's have a look-

चला एक नजर टाकूया-

 1. Did I see it carefully?
  मी ते काळजीपूर्वक पाहिले का?
 2. Did you watch that webisode in the evening?
  तुम्ही तो वेबिसोड संध्याकाळी पाहिला का?
 3. Did we walk through the woods cautiously?
  आम्ही जंगलातून सावधपणे चाललो का?
 4. Did they do it skillfully?
  त्यांनी हे कौशल्यपूर्वक केले का?
 5. Did you do your best in the exam?
   तुम्ही परीक्षेत उत्तरे व्यवस्थित लिहिली का?
 6. Did she do his favour last Monday?
  गेल्या सोमवारी तिने त्याची मर्जी राखली का?
 7. Did he perform well on stage?
  त्याने रंगभूमीवर चांगले सादरीकरण केले का?
 8. Did they help me during my difficult days?
  माझ्या कठीण दिवसात त्यांनी मला मदत केली का?
 9. Did he do his computerized work in his room?
  त्याने त्याचे संगणकीकृत काम त्याच्या खोलीत केले का?
 10. Did you check it according to your convenience?
  आपण आपल्या सोयीनुसार त्या तपासल्या आहेत का?
 11. Did I do as she told me to do?
  तिने मला करण्यास सांगितले तसे मी केले का?
 12. Did we discuss this topic with her mother?
  आम्ही तिच्या आईशी या विषयावर चर्चा केली का?
 13. Did she research the plants at different sites?
  तिने वेगवेगळ्या साइट्सवर वनस्पतींचे संशोधन केले का?
 14. Did I read anything on Sunday?
  मी रविवारी काही वाचले का?
 15. Did we wash our clothes on Saturday?
  आम्ही शनिवारी कपडे धुतले का?
 16. Did the cleaner clean our house on Monday?
  सोमवारी सफ़ाई कामगाराने आमचे घर स्वच्छ केले का?
 17. Did they complete their homework at night?
  त्यांनी त्यांचे गृहकार्य रात्री पूर्ण केले का?
 18. Did the employees do office work at their homes?
  कर्मचार्‍यांनी ऑफिसची कामे त्यांच्या घरी केली का?
 19. Did the staff do office work in time?
  कर्मचार्‍यांनी कार्यालयीन कामे वेळेत केली का?
 20. Did they do a good job?
  त्यांनी चांगले काम केले का?
 21. Did they meet him to get the bag?
  ते बॅग घेण्यासाठी त्याला भेटले का?
 22. Did you do as you wish in those days?
  आपण त्या दिवसांत आपल्या इच्छेनुसार केले का?
 23. Did we follow him on Facebook?
  आम्ही फेसबुकवर त्याचे अनुसरण केले का?
 24. Did I write it on my own in the last month?
  गेल्या महिन्यात ते मी स्वतः लिहिले का?
 25. Did they work properly?
  त्यांनी काम व्यवस्थित केले का?
 26. Did we manage the program well?
  आम्ही कार्यक्रम व्यवस्थित पार पाडला का?
 27. Did you call me on Monday?
  तू सोमवारी मला फोन केलास का?
 28. Did she investigate that case?
  तिने त्या प्रकरणाची चौकशी केली का?
 29. Did I do my duty well yesterday?
  काल मी माझे कर्तव्य चांगले पार पाडले का?
 30. Did we handle that situation well?
  आम्ही ती परिस्थिती व्यवस्थितपणे हाताळली का?

Back        Next