Use of Did to Show Certainty

निश्चितता दर्शविण्यासाठी did ‘च’ चा वापर

Did is used to show the certainty of the description in the past.

भूतकाळातील वर्णनाची निश्चितता दर्शविण्यासाठी 'डीड' चा वापर केला जातो.

Formation of a sentence

The formation of a sentence is as;

वाक्यरचना अशी आहे;

  • Subject + did + base form of main verb + remaining words.
  • कर्ता (मी / आम्ही / तू/ तूम्ही /आपण / तो/ ती/ ते / एकवचनी /अनेकवचनी संख्या) +  च + मुख्य क्रियापदाचे मूळ रूप + उर्वरित शब्द.

Let's have a look-

चला एक नजर टाकू या-

  1. We did admit that she was wrong.
    आम्ही मान्य केलेच की ती चुकीची होती.
  2. I did observe its growth daily.
    मी दररोज त्याच्या वाढीचे निरीक्षण केलेच.
  3. They did come on the occasion of their wedding anniversary.
    ते त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या प्रसंगि आलेच.
  4. She did go to her home town every year.
    ती दरवर्षी तिच्या मूळ शहरी गेलीच.
  5. Chetan did agree to pay workers their proper remuneration.
    कामगारांना त्यांचा योग्य मोबदला देण्यास चेतन सहमत होतेच.
  6. She did write about natural calamities.
    तिने नैसर्गिक आपत्तींबद्दल लिहिलेच.
  7. Saumya did read a book in a library.
    सौम्याने ग्रंथालयातील पुस्तक वाचलेच.
  8. He did wash plates before use.
    त्याने ताटल्या वापरण्यापूर्वी धुतल्याच.
  9. She did accept that she was wrong.
    ती चुकीची होती हे तिने मान्य केलेच.
  10. Goli did join us for some time.
    गोली काही काळ आमच्यासोबत सामील झालाच.
  11. Prachi did speak on this topic with her mother.
    प्राची या विषयावर तिच्या आईबरोबर बोललीच.
  12. She did use ‘did’ to emphasize the action in a sentence.
    Requested file could not be found (error code 404). Verify the file URL specified in the shortcode.
    तिने वाक्यात क्रियेवर जोर देण्यासाठी 'च' वापरलेच.
  13. She did perform a one-act play on stage.
    तिने मंचावर एकांकिका सादर केलीच.
  14. Sameer did ask questions about designing a building.
    समीर यांनी इमारतीची रचना करण्याबद्दल प्रश्न विचारलाच.
  15. Parth did send me a message.
    पार्थने मला संदेश पाठवलाच.
  16. She did follow her on Facebook.
    तिने तिला फेसबुकवर अनुसरण केलेच.
  17. He did sing songs at the annual function of the school.
    त्याने शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनात गाणे गायलेच.
  18. She did change the book cover frequently.
    तिने वारंवार पुस्तकाचे आच्छादन बदललेच.
  19. Anjali did close windows in the night.
    अंजलीने रात्रीच्या खिडक्या बंद केल्याच.
  20. I did love my computer.
    मी माझ्या संगणकावर प्रेम केलेच.
  21. We did know how to tackle that situation.
    ही परिस्थिती कशी हाताळायची हे आपल्याला/ आम्हाला माहित होतेच.
  22. Parents did take care of their kids.
    पालकांनी त्यांच्या मुलांची काळजी घेतलीच.
  23. Students did clean the playground of a school.
    विद्यार्थ्यांनी शाळेचे खेळाचे मैदान स्वच्छ केलेच.
  24. Teachers did guide students to solve the examples of mathematics.
    शिक्षकांनी गणिताचे उदाहरण सोडविण्यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलेच.
  25. We did arrange the program for social service.
    आम्ही सामाजिक सेवेसाठी कार्यक्रमाची व्यवस्था केलीच.
  26. You did simplify what you had to tell.
    आपल्याला जे सांगायचे होते ते आपण स्पष्ट केलेच.
  27. They did play every Sunday.
    ते दर रविवारी खेळलेच.
  28. We did play the piano.
     आम्ही पियानो वाजवलाच.
  29. They did go once again to get the bag.
    ते बॅग घेण्यासाठी पुन्हा एकदा गेलेच.
  30. I did replace the old machine with the new one.
    मी जुनी मशीन बदलून नवीन घेतलीच.

Back        Next