Asking for and giving permission

परवानगी घेणे आणि देणे

Sometimes we have to take or give permission for something. Here are some sentences.

कधीकधी आपल्याला कशासाठी तरी परवानगी घ्यावी लागते किंवा द्यावी लागते. येथे काही वाक्ये आहेत.

Have a look-

 • May I ask you a question?
 • मी तुम्हाला एक प्रश्न विचारू शकतो /ते का?
 • Please feel free.
 • बिनधास्त /कृपया मोकळ्या मनाने विचारा.
 • Can I ask a question, please?
 • कृपया मी एक प्रश्न विचारू शकतो का?
 • Yes, you can. 
 • होय तुम्ही विचारू शकता.
 • May Harish play this instrument?
 • हरीश हे वाद्य वाजवू शकतो का?
 • I don’t mind.
 • मला काही हरकत नाही.
 • Could I use your computer, please?
 • कृपया, मी आपला संगणक वापरू शकतो का?
 • Of course, but take care of my files.
 • नक्कीच, परंतु माझ्या फायलिंची काळजी घ्या.
 • May Smita take leave now? 
 • स्मिता आता रजा घेऊ शकते का?
 • Of course, if it is necessary.
 • अर्थात, जर ते आवश्यक असेल तर.
 • Is it okay if I read your book?
 • मी तुझे पुस्तक वाचले तर चालेल?
 • Why are you asking me? You are my friend.
 • तू मला का विचारतो आहेस? तू माझा मित्र आहेस.
 • May they participate in a volleyball match?
 • ते व्हॉलीबॉल सामन्यात सहभागी होऊ शकतात का?
 • Sure, if they prove themselves.
 • निश्चितच, जर त्यांनी स्वत:ला सिद्ध केले तर.
 • May she come with us? 
 • ती आमच्याबरोबर/ आपल्याबरोबर येऊ शकते?
 • I am sorry, it is not possible.
 • मला माफ करा, हे शक्य नाही.
 • Can I go now?
 • मी आता जाऊ शकते का?
 • Sure, you can.
 • नक्कीच, तु जाऊ शकते.
 • Can they join us at the party?
 • ते आमच्याबरोबर पार्टीत सामील होऊ शकतात का?
 • If they are comfortable with us
 • जर त्यांना आपल्यासोबत चांगले वाटत असेल
 • Can we stay here for a night?
 • आपण येथे एक रात्र राहू शकतो का?
 • Sorry, there isn’t any vacant room.
 • क्षमस्व, कोणतिही खोली रिकामी नाही.
 • Do you mind if I opened the window?
 • मी खिडकी उघडली तर तुला काही हरकत आहे का?
 • I don’t mind, it is already suffocating.
 • मला हरकत नाही, आधीच गुदमरल्यासारखे होते आहे.
 • Can she draw a picture on that paper?
 • ती त्या कागदावर चित्र काढु शकते का?
 • No problem, she can.
  (She can draw a picture on that paper.)
 • काही हरकत नाही, ती काढु शकते. (त्या कागदावर ती चित्र काढु शकते.)
 • Can my mother come with me?
 • माझी आई माझ्याबरोबर येऊ शकते का?
 • As you wish
 • जशी तुमची इच्छा
 • Can we go home now?
 • आम्ही आता घरी जाऊ शकतो का?
 • After solving those examples, you will get permission.
 • ती उदाहरणे सोडवल्यानंतर तुम्हाला परवानगी मिळेल.

Back        Next