अॅमचा वापरः व्यवसायाविषयी प्रश्न
आता आपण व्यवसायाबद्दल प्रश्न कसे तयार करावे ते पाहू.
या वाक्यांमध्ये आपण 'am' वापरू.
आपण वाक्य असे तयार केले पाहिजे-
- Am + subject (I) + remaining words + question mark?
- आहे (अॅम) + कर्ता (मी) + उर्वरित शब्द + प्रश्न चिन्ह?
येथे वाक्यांच्या प्रश्नार्थक रचना आहेत .
हे बघा-
- Am I a doctor? मी डॉक्टर आहे का?
- Am I a professor? मी प्राध्यापक आहे का?
- Am I a potter? मी कुंभार आहे का?
- Am I an engineer? मी अभियंता आहे का?
- Am I a cook? मी स्वयंपाकीण आहे का?
- Am I a hawker? मी एक फेरीवाला आहे का?
- Am I a collector? मी जिल्हाधिकारी आहे का?
- Am I a watchman? मी पहारेकरी आहे का?
- Am I an advocate? मी वकील आहे का?
- Am I a manager? मी व्यवस्थापक आहे का?
- Am I a reporter? मी पत्रकार आहे का?
- Am I a photographer? मी छायाचित्रकार आहे का?
- Am I a player? मी एक खेळाडू आहे का?
- Am I a clerk? मी एक लिपिक आहे का?
- Am I a poet? मी कवी आहे का?
- Am I a driver? मी वाहनचालक आहे का?
- Am I a teacher? मी शिक्षक आहे का?
- Am I a shopkeeper? मी दुकानदार आहे का?
- Am I a writer? मी लेखक आहे का?
- Am I an officer? मी एक अधिकारी आहे का?
- Am I a minister? मी मंत्री आहे का?
- Am I an M.L.A.? मी आमदार आहे का?
- Am I a mason? मी गवंडी आहे का?
- Am I a contractor? मी एक ठेकेदार आहे का?
- Am I an actor? मी अभिनेता आहे का?
- Am I a salesman? मी एक विक्रेता आहे का?
- Am I an editor? मी संपादक आहे का?
- Am I an auditor? मी लेखापरीक्षक आहे का?
- Am I a bank manager? मी बँक व्यवस्थापक आहे का?
- Am I a film producer? मी एक चित्रपट निर्माता आहे का?