व्यवसायाबद्दल सांगण्यासाठी ‘आहेत’ चा वापर
या धड्यात आपण व्यवसायाबद्दल सांगण्यासाठी ‘are’ चा उपयोग शिकू.
या वाक्याची रचना मागील धड्यातील वाक्यांसारखीच आहे.
वाक्याची रचना
या वाक्याची रचना आहे-
- Subject(we/you/you/they/these/those) + are + remaining words
- कर्ता (आम्ही /तू /तूम्ही/ ते/ या /त्या कोणतेही अनेकवचनी नाम ) + are आहेत + उर्वरित शब्द
लक्षात ठेवा-
- आपण इतर लोकांशी आदराने बोलतो.
- दुसर्या एखा द्या व्यक्तीबरोबर बोलताना आपण मराठीत अनेकवचनी संज्ञा प्रमाणे बोलतो.
- म्हणून आपण एका व्यक्तीसही ‘तु’ ऐवजी ‘तुम्ही’ असे संबोधतो.
- परंतु इंग्रजीमध्ये ‘तु’ आणि ‘तुम्ही’ या दोन्हीसाठी ‘you’ वापरले जाते.
येथे काही उदाहरणे आहेत. रचना वरीलप्रमाणे आहे.
एक नजर टाका–
- You are a doctor.तू डॉक्टर आहेस.
- We are professors.आम्ही प्राध्यापक आहोत.
- They are potters.ते कुंभार आहेत.
- My sisters are engineers.माझ्या बहिणी अभियंत्या (अभियंता )आहेत.
- You are a cook.तू एक स्वयंपाकीण आहेस. / तूम्ही एक स्वयंपाकीण आहात.
- They are hawkers.ते फेरीवाले आहेत.
- Her sisters are designers.तिच्या बहिणी योजक (डिझाइनर) आहेत.
- We are collectors.आम्ही संग्राहक/ जिल्हाधिकारी आहोत.
- They are watchmen.ते पहारेकरी आहेत.
- You are an advocate.तू/तूम्ही वकील आहात.
- You are a manager.तू/ तूम्ही व्यवस्थापक आहात.
- You are a reporter.तू/तूम्ही पत्रकार आहात.
- They are blacksmiths.ते लोहार आहेत.
- His two uncles are photographers.त्याचे दोन काका छायाचित्रकार आहेत.
- They are players.ते खेळाडू आहेत.
- You are a motorman.तू/ तूम्ही एक आगगाडी चालक आहात.
- We are clerks.आम्ही लिपिक आहोत.
- They are poets.ते कवी आहेत.
- We are nurses.आम्ही परिचारिका आहोत.
- You are a driver.तु/तुम्ही एक वाहनचालक आहात.
- We are shopkeepers.आम्ही दुकानदार आहोत.
- You are a writer.तुम्ही एक लेखक आहात.
- We are architects.आम्ही वास्तुविद्याविशारद आहोत.
- You are an officer.तू एक अधिकारी आहेस.
- All my friends are pilots.माझे सर्व मित्र वैमानिक आहेत.
- They are ministers.ते मंत्री आहेत.
- We are MLAs.आम्ही आमदार आहोत.
- They are teachers.ते शिक्षक आहेत.
- They are book publishers.ते पुस्तक प्रकाशक आहेत.
- We are booksellers.आम्ही पुस्तक विक्रेते आहोत.