Use of Is: Questions about Profession

इज चा वापरःव्यवसायाबद्दल प्रश्न

आता आपण इज (आहे) चा वापर करुन प्रश्न कसा तयार करावा ते पाहू.

प्रश्नाची रचना

प्रश्न विचारण्यासाठी च्या वाक्याची रचना अशी आहे;

  • Is + subject (he/ she/ it/ any singular noun) + remaining words + Question mark ( ?)
  • आहे (is)  + कर्ता (तो / ती / ते/ अन्य एकवचन संज्ञा)  + उर्वरित शब्द + प्रश्न चिन्ह (?)

येथे काही उदाहरणे आहेत.रचना वरीलप्रमाणे आहे.

चला एक नजर टाकूया-

  1. Is she a doctor?
    ती डॉक्टर आहे का?
  2. Is my mother a professor?
    माझी आई प्राध्यापक आहे का?
  3. Is he a potter?
    तो कुंभार आहे का?
  4. Is my sister an engineer?
    माझी बहिण अभियंता आहे का?
  5. Is she a cook?
    ती एक स्वयंपाकीण आहे का?
  6. Is he a hawker?
    तो एक फेरीवाला आहे का?
  7. Is her sister a designer?
    तिची बहिण एक डिझाइनर/योजक आहे का?
  8. Is his father a collector?
    त्याचे वडील जिल्हाधिकारी आहेत का?
  9. Is her brother a watchman?
    तिचा भाऊ पहारेकरी आहे का?
  10. Is she an advocate?
    ती वकील आहे का?
  11. Is he a manager?
    तो एक व्यवस्थापक आहे का?
  12. Is she a reporter?
    ती पत्रकार आहे का?
  13. Is he a blacksmith?
    तो एक लोहार आहे का?
  14. Is his uncle a photographer?
    त्याचे काका छायाचित्रकार आहेत का?
  15. Is Sachin a player?
    सचिन एक खेळाडू आहे का?
  16. Is she a motorwoman?
    ती आगगाडीची चालक आहे का?
  17. Is Lara a clerk?
    लारा एक लिपिक आहे का?
  18. Is Tarak a poet?
    तारक कवी आहे का?
  19. Is she a nurse?
    ती परिचारिका आहे का?
  20. Is Sahil a driver?
    साहिल वाहनचालक आहे का?
  21. Is he a shopkeeper?
    तो एक दुकानदार आहे का?
  22. Is she a writer?
    ती एक लेखक आहे का?
  23. Is Sameer an architect?
    समीर एक वास्तुविद्याविशारद आहे का?
  24. Is he an officer?
    तो एक अधिकारी आहे का?
  25. Is my brother a pilot?
    माझा भाऊ एक वैमानिक आहे का?
  26. Is she a Minister?
    ती मंत्री आहे का?
  27. Is she an MLA?
    ती आमदार आहे का?
  28. Is Smita a teacher?
    स्मिता शिक्षक आहे का?
  29. Is she a book publisher?
    ती पुस्तक प्रकाशक आहे का?
  30. Is he a bookseller?
    तो पुस्तक विक्रेता आहे का?

BACK         NEXT