व्यवसायाबद्दल सांगण्यासाठी नकारात्मक वाक्यांमध्ये 'was' चा वापर
भूतकाळातील स्थितीबद्दल सांगण्यासाठी आपण ' was ' चा वापर पाहिला आहे.
या प्रकरणात आपण व्यवसायाबद्दल सांगण्यासाठी 'was not' (नव्हतो/ता/ती/ते) च्या वापराबद्दल जाणून घेऊ.
वाक्याची रचना
या वाक्याची रचना मागील पाठातील वाक्यांच्या रचने समानच आहे. परंतु या वाक्यात आपल्याला 'was' सह 'not' वापरावे लागेल
म्हणून या वाक्याची रचना आहे-
- Subject + was not + remaining words.
- कर्ता (मी / तो / ती / ते / अन्य एकवचनी नाम) + was not (नव्हतो/ता/ती/ते) + उर्वरित शब्द
आपण वाक्यातील 'was not' च्या वापराबद्दल चर्चा करू.
- व्यवसायाबद्दल नकारात्मक सांगणे
येथे काही उदाहरणे आहेत. रचना वरीलप्रमाणे आहे.
- He was not a hawker. तो एक हातगाडीवरून माल विकणारा फेरीवाला नव्हता.
- I was not an MLA. मी आमदार नव्हते/ नव्हतो.
- He was not a blacksmith. तो लोहार नव्हता.
- My brother was not a pilot. माझा भाऊ एक वैमानिक नव्हता.
- He was not a shopkeeper. तो एक दुकानदार नव्हता.
- Her sister was not a designer. तिची बहिण एक डिझायनर नव्हती.
- His father was not a collector. त्याचे वडील जिल्हाधिकारी नव्हते.
- Her brother was not a watchman. तिचा भाऊ एक पहारेकरी नव्हता.
- Sahil was not a taxi driver. साहिल टॅक्सी चालक नव्हते.
- She was not a fiction writer. ती एक कल्पित कथा लेखक नव्हती.
- Sameer was not an architect. समीर एक वास्तुविशारद नव्हता.
- He was not a skilled potter. तो एक कुशल कुंभार नव्हता.
- He was not a bank manager. तो एक बँक व्यवस्थापक नव्हता.
- She was not a news reporter. ती एक बातमी पत्रकार नव्हती.
- Tarak was not a comic poet. तारक हा विनोदी कवी नव्हता.
- Lara was not a clerk in primary school. लारा शाळेत लिपिक नव्हती.
- She was not a Foreign Minister. ती परराष्ट्र मंत्री नव्हती.
- Sachin was not a cricket player. सचिन क्रिकेट खेळाडू नव्हता.
- She was not a doctor at a government hospital. ती सरकारी रुग्णालयात डॉक्टर नव्हती.
- My mother was not a professor of the English language. माझी आई इंग्रजी भाषेची प्राध्यापिका नव्हती.
- My sister was not a chemical engineer. माझी बहीण रासायनिक अभियंता नव्हती.
- She was not a ticket checker in the railway department. ती रेल्वे विभागात तिकीट तपासक नव्हती.
- She was not an advocate at the Supreme Court. ती सर्वोच्च न्यायालयात वकील नव्हती.
- His uncle was not a professional photographer. त्याचे काका एक व्यावसायिक छायाचित्रकार नव्हते.
- She was not a motorwoman on the Mumbai local train. ती मुंबई लोकल ट्रेनमध्ये आगगाडीची चालक नव्हती.
- She was not a nurse in medical college. ती वैद्यकीय महाविद्यालयात एक नर्स नव्हती.
- He was not an officer in the education department. ते शिक्षण विभागाचे अधिकारी नव्हते.
- Smita was not a teacher in Aurangabad. स्मिता औरंगाबाद मध्ये शिक्षीका नव्हती.
- She was not an academic book publisher. ती एक शैक्षणिक पुस्तक प्रकाशक नव्हती.
- He was not a bookseller in Pune. तो /ते पुण्यात पुस्तक विक्रेता नव्हता /नव्हते.