Use of ‘Was’ to Tell about Profession

व्यवसायाबद्दल सांगण्यासाठी 'वॉज' चा उपयोग

आपण मागील प्रकरणात भूतकाळातील स्थितीबद्दल सांगण्यासाठी  was (वॉज) चा वापर पाहिला आहे. या प्रकरणात आपण भूतकाळातील व्यवसायाबद्दल सांगण्यासाठी was च्या वापराबद्दल जाणून घेऊ.

Formation of a sentence
वाक्याची रचना

या वाक्याची रचना मागील पाठातील वाक्यांच्या रचने समानच आहे.

म्हणून या वाक्याची रचना आहे-

  • Subject (I/he/she/it/any singular noun) +  was + remaining words
  • कर्ता (मी / तो / ती / ते / अन्य एकवचनी नाम) + होतो/होते /होता/ होती   + उर्वरित शब्द

आपण वाक्यातील 'was' च्या वापराबद्दल चर्चा करू.

येथे काही उदाहरणे आहेत. रचना वरीलप्रमाणे आहे.

एक नजर टाका-

  1. He was a hawker.
    तो एक हातगाडीवरून माल विकणारा फेरीवाला होता.
  2. She was an MLA.
    ती आमदार होती.
  3. He was a blacksmith.
    तो लोहार होता.
  4. My brother was a pilot.
    माझा भाऊ एक वैमानिक होता.
  5. He was a shopkeeper.
    तो एक दुकानदार होता.
  6. Her sister was a designer.
    तिची बहिण एक डिझायनर होती.
  7. His father was a collector.
    त्याचे वडील जिल्हाधिकारी होते.
  8. Her brother was a watchman.
    तिचा भाऊ एक पहारेकरी होता.
  9. Sahil was a taxi driver.
    साहिल टॅक्सी चालक होते.
  10. She was a fiction writer.
    ती एक कल्पित कथा लेखक होती.
  11. Sameer was an architect.
    समीर एक वास्तुविशारद होता.
  12. He was a skilled potter.
    तो एक कुशल कुंभार होता.
  13. He was a bank manager.
    तो एक बँक व्यवस्थापक होता.
  14. She was a news reporter.
    ती एक बातमी पत्रकार होती.
  15. Tarak was a comic poet.
    तारक हा विनोदी कवी होता.
  16. Lara was a clerk in primary school.
    लारा शाळेत लिपिक होती.
  17. She was a Foreign Minister.
    ती परराष्ट्र मंत्री होती.
  18. Sachin was a cricket player.
    सचिन क्रिकेट खेळाडू होता.
  19. She was a doctor at a government hospital.
    ती सरकारी रुग्णालयात डॉक्टर होती.
  20. My mother was a professor of the English language.
    माझी आई इंग्रजी भाषेची प्राध्यापिका होती.
  21. My sister was a chemical engineer.
    माझी बहीण रासायनिक अभियंता होती.
  22. She was a ticket checker in the railway department.
    ती रेल्वे विभागात तिकीट तपासक होती.
  23. She was an advocate at the Supreme Court.
    ती सर्वोच्च न्यायालयात वकील होती.
  24. His uncle was a professional photographer.
    त्याचे काका एक व्यावसायिक छायाचित्रकार होते.
  25. She was a motorwoman on the Mumbai local train.
    मुंबई लोकल ट्रेनमध्ये ती आगगाडीची चालक होती.
  26. She was a nurse in medical college.
    ती वैद्यकीय महाविद्यालयात एक नर्स होती.
  27. He was an officer in the education department.
    ते शिक्षण विभागाचे अधिकारी होते.
  28. Smita was a teacher in Aurangabad.
    स्मिता औरंगाबाद मध्ये शिक्षीका होती.
  29. She was an academic book publisher.
    ती एक शैक्षणिक पुस्तक प्रकाशक होती.
  30. He was a bookseller in Pune.
    तो /ते पुण्यात पुस्तक विक्रेता होता /होते.

Back          Next