Use of ‘Was’ in Negative Sentences to Tell about Profession

व्यवसायाबद्दल सांगण्यासाठी नकारात्मक वाक्यांमध्ये 'was' चा वापर

भूतकाळातील स्थितीबद्दल सांगण्यासाठी आपण ' was ' चा वापर पाहिला आहे.

या प्रकरणात आपण व्यवसायाबद्दल सांगण्यासाठी 'was not' (नव्हतो/ता/ती/ते) च्या वापराबद्दल जाणून घेऊ.

वाक्याची रचना

या वाक्याची रचना मागील पाठातील वाक्यांच्या रचने समानच आहे. परंतु या वाक्यात आपल्याला  'was' सह 'not' वापरावे लागेल

म्हणून या वाक्याची रचना आहे-

  • Subject + was not + remaining words.
  • कर्ता (मी / तो / ती / ते / अन्य एकवचनी नाम) + was not (नव्हतो/ता/ती/ते) + उर्वरित शब्द

आपण वाक्यातील 'was not' च्या वापराबद्दल चर्चा करू.

  • व्यवसायाबद्दल नकारात्मक सांगणे

येथे काही उदाहरणे आहेत. रचना वरीलप्रमाणे आहे.

एक नजर टाका-

  1. He was not a hawker.
    तो एक हातगाडीवरून माल विकणारा फेरीवाला नव्हता.
  2. I was not an MLA.
    मी आमदार नव्हते/ नव्हतो.
  3. He was not a blacksmith.
    तो लोहार नव्हता.
  4. My brother was not a pilot.
    माझा भाऊ एक वैमानिक नव्हता.
  5. He was not a shopkeeper.
    तो एक दुकानदार नव्हता.
  6. Her sister was not a designer.
    तिची बहिण एक डिझायनर नव्हती.
  7. His father was not a collector.
    त्याचे वडील जिल्हाधिकारी नव्हते.
  8. Her brother was not a watchman.
    तिचा भाऊ एक पहारेकरी नव्हता.
  9. Sahil was not a taxi driver.
    साहिल टॅक्सी चालक नव्हते.
  10. She was not a fiction writer.
    ती एक कल्पित कथा लेखक नव्हती.
  11. Sameer was not an architect.
    समीर एक वास्तुविशारद नव्हता.
  12. He was not a skilled potter.
    तो एक कुशल कुंभार नव्हता.
  13. He was not a bank manager.
    तो एक बँक व्यवस्थापक नव्हता.
  14. She was not a news reporter.
    ती एक बातमी पत्रकार नव्हती.
  15. Tarak was not a comic poet.
    तारक हा विनोदी कवी नव्हता.
  16. Lara was not a clerk in primary school.
    लारा शाळेत लिपिक नव्हती.
  17. She was not a Foreign Minister.
    ती परराष्ट्र मंत्री नव्हती.
  18. Sachin was not a cricket player.
    सचिन क्रिकेट खेळाडू नव्हता.
  19. She was not a doctor at a government hospital.
    ती सरकारी रुग्णालयात डॉक्टर नव्हती.
  20. My mother was not a professor of the English language.
    माझी आई इंग्रजी भाषेची प्राध्यापिका नव्हती.
  21. My sister was not a chemical engineer.
    माझी बहीण रासायनिक अभियंता नव्हती.
  22. She was not a ticket checker in the railway department.
    ती रेल्वे विभागात तिकीट तपासक नव्हती.
  23. She was not an advocate at the Supreme Court.
    ती सर्वोच्च न्यायालयात वकील नव्हती.
  24. His uncle was not a professional photographer.
    त्याचे काका एक व्यावसायिक छायाचित्रकार नव्हते.
  25. She was not a motorwoman on the Mumbai local train.
    ती मुंबई लोकल ट्रेनमध्ये आगगाडीची चालक नव्हती.
  26. She was not a nurse in medical college.
    ती वैद्यकीय महाविद्यालयात एक नर्स नव्हती.
  27. He was not an officer in the education department.
    ते शिक्षण विभागाचे अधिकारी नव्हते.
  28. Smita was not a teacher in Aurangabad.
    स्मिता औरंगाबाद मध्ये शिक्षीका नव्हती.
  29. She was not an academic book publisher.
    ती एक शैक्षणिक पुस्तक प्रकाशक नव्हती.
  30. He was not a bookseller in Pune.
    तो /ते पुण्यात पुस्तक विक्रेता नव्हता /नव्हते.

Back          Next