Use of Was: Questions about Profession

वॉज चा वापरः व्यवसायाबद्दल प्रश्न

भूतकाळातील व्यवसायाबद्दल सांगण्यासाठी आपण ' was ' चा वापर पाहिला आहे. या प्रकरणात आपण भूतकाळातील व्यवसायाबद्दल प्रश्न विचारण्यासाठी 'was' च्या वापराबद्दल जाणून घेऊ.

प्रश्नाची रचना

प्रश्न विचारण्यासाठी च्या वाक्याची रचना अशी आहे;

  • Was + Subject (I/he/she/it/any singular noun) + remaining words+ question mark (?)
  • Was (होतो/होते /होता/ होती ) + कर्ता (मी / तो / ती / ते / अन्य एकवचनी नाम) + उर्वरित शब्द+ प्रश्न चिन्ह (?)

व्यवसायाबद्दल विचारणे

आपण वाक्यातील 'was' च्या वापराबद्दल चर्चा करू.

येथे काही उदाहरणे आहेत. रचना वरीलप्रमाणे आहे.

चला एक नजर टाकूया-

  1. Was he a hawker?
    तो एक हातगाडीवरून माल विकणारा फेरीवाला होता का?
  2. Was she an MLA?
    ती आमदार होती का?
  3. Was he a blacksmith?
    तो लोहार होता का?
  4. Was my brother a pilot?
    माझा भाऊ एक वैमानिक होता का?
  5. Was he a shopkeeper?
    तो एक दुकानदार होता का?
  6. Was her sister a designer?
    तिची बहिण एक डिझायनर होती का?
  7. Was his father a collector?
    त्याचे वडील जिल्हाधिकारी  होते का?
  8. Was her brother a watchman?
    तिचा भाऊ एक पहारेकरी होता का?
  9. Was Sahil a taxi driver?
    साहिल टॅक्सी चालक होते का?
  10. Was she a fiction writer?
    ती एक कल्पित कथा लेखक होती का?
  11. Was Sameer an architect?
    समीर एक वास्तुविशारद होता का?
  12. Was he a skilled potter?
    तो एक कुशल कुंभार होता का?
  13. Was he a bank manager?
    तो एक बँक व्यवस्थापक होता का?
  14. Was she a news reporter?
    ती एक बातमी पत्रकार होती का?
  15. Was Tarak a comic poet?
    तारक हा विनोदी कवी होता का?
  16. Was Lara a clerk in primary school?
    लारा शाळेत लिपिक होती का?
  17. Was she a Foreign Minister?
    ती परराष्ट्र मंत्री होती का?
  18. Was Sachin a cricket player?
    सचिन क्रिकेट खेळाडू होता का?
  19. Was she a doctor at a government hospital?
    ती सरकारी रुग्णालयात डॉक्टर होती का?
  20. Was my mother a professor of the English language?
    माझी आई इंग्रजी भाषेची प्राध्यापिका होती का?
  21. Was my sister a chemical engineer?
    माझी बहीण रासायनिक अभियंता होती का?
  22. Was she a ticket checker in the railway department?
    ती रेल्वे विभागात तिकीट तपासक होती का?
  23. Was she an advocate at the Supreme Court?
    ती सर्वोच्च न्यायालयात वकील होती का?
  24. Was his uncle a professional photographer?
    त्याचे काका एक व्यावसायिक छायाचित्रकार होते का?
  25. Was she a motorwoman on the Mumbai local train?
    मुंबई लोकल ट्रेनमध्ये ती आगगाडीची चालक होती का?
  26. Was she a nurse in medical college?
    ती वैद्यकीय महाविद्यालयात एक नर्स होती का?
  27. Was he an officer in the education department?
    ते शिक्षण विभागाचे अधिकारी होते का?
  28. Was Smita a teacher in Aurangabad?
    स्मिता औरंगाबाद मध्ये शिक्षीका होती का?
  29. Was she an academic book publisher?
    ती एक शैक्षणिक पुस्तक प्रकाशक होती का?
  30. Was he a bookseller in Pune?
    तो /ते पुण्यात पुस्तक विक्रेता होता /होते का?

Back          Next