व्यवसायाबद्दल सांगण्यासाठी 'वॉज' चा उपयोग
आपण मागील प्रकरणात भूतकाळातील स्थितीबद्दल सांगण्यासाठी was (वॉज) चा वापर पाहिला आहे. या प्रकरणात आपण भूतकाळातील व्यवसायाबद्दल सांगण्यासाठी was च्या वापराबद्दल जाणून घेऊ.
Formation of a sentence
वाक्याची रचना
या वाक्याची रचना मागील पाठातील वाक्यांच्या रचने समानच आहे.
म्हणून या वाक्याची रचना आहे-
- Subject (I/he/she/it/any singular noun) + was + remaining words
- कर्ता (मी / तो / ती / ते / अन्य एकवचनी नाम) + होतो/होते /होता/ होती + उर्वरित शब्द
आपण वाक्यातील 'was' च्या वापराबद्दल चर्चा करू.
येथे काही उदाहरणे आहेत. रचना वरीलप्रमाणे आहे.
एक नजर टाका-
- He was a hawker. तो एक हातगाडीवरून माल विकणारा फेरीवाला होता.
- She was an MLA.ती आमदार होती.
- He was a blacksmith. तो लोहार होता.
- My brother was a pilot. माझा भाऊ एक वैमानिक होता.
- He was a shopkeeper. तो एक दुकानदार होता.
- Her sister was a designer. तिची बहिण एक डिझायनर होती.
- His father was a collector. त्याचे वडील जिल्हाधिकारी होते.
- Her brother was a watchman. तिचा भाऊ एक पहारेकरी होता.
- Sahil was a taxi driver. साहिल टॅक्सी चालक होते.
- She was a fiction writer. ती एक कल्पित कथा लेखक होती.
- Sameer was an architect. समीर एक वास्तुविशारद होता.
- He was a skilled potter. तो एक कुशल कुंभार होता.
- He was a bank manager. तो एक बँक व्यवस्थापक होता.
- She was a news reporter. ती एक बातमी पत्रकार होती.
- Tarak was a comic poet. तारक हा विनोदी कवी होता.
- Lara was a clerk in primary school. लारा शाळेत लिपिक होती.
- She was a Foreign Minister. ती परराष्ट्र मंत्री होती.
- Sachin was a cricket player. सचिन क्रिकेट खेळाडू होता.
- She was a doctor at a government hospital. ती सरकारी रुग्णालयात डॉक्टर होती.
- My mother was a professor of the English language. माझी आई इंग्रजी भाषेची प्राध्यापिका होती.
- My sister was a chemical engineer. माझी बहीण रासायनिक अभियंता होती.
- She was a ticket checker in the railway department. ती रेल्वे विभागात तिकीट तपासक होती.
- She was an advocate at the Supreme Court. ती सर्वोच्च न्यायालयात वकील होती.
- His uncle was a professional photographer. त्याचे काका एक व्यावसायिक छायाचित्रकार होते.
- She was a motorwoman on the Mumbai local train. मुंबई लोकल ट्रेनमध्ये ती आगगाडीची चालक होती.
- She was a nurse in medical college. ती वैद्यकीय महाविद्यालयात एक नर्स होती.
- He was an officer in the education department. ते शिक्षण विभागाचे अधिकारी होते.
- Smita was a teacher in Aurangabad. स्मिता औरंगाबाद मध्ये शिक्षीका होती.
- She was an academic book publisher. ती एक शैक्षणिक पुस्तक प्रकाशक होती.
- He was a bookseller in Pune. तो /ते पुण्यात पुस्तक विक्रेता होता /होते.