वॉज: व्यवसायाबद्दल नकारात्मक उत्तरे
या धड्यात आपण 'वॉज' वापरून व्यवसायाबद्दल नकारात्मक वाक्यात उत्तर कसे द्यावे हे पाहू.
नकारात्मक उत्तराची रचना
नकारात्मक उत्तराची रचना अशी आहे;
- No, + subject (I/he/ she/ it/ singular noun) + was + not + remaining words
- नाही, + कर्ता (मी/ तो / ती / ते/ अन्य तृतीय एकवचनी नाम) + नव्हता /नव्हती/ नव्हते + उर्वरित शब्द.
थोडक्यात आपण-
- No, + subject + wasn’t.
- नाही, + कर्ता + नव्हता /नव्हती/ नव्हते
- No, he wasn't.नाही, तो नव्हता.
- No, she wasn't.नाही, ती नव्हती.
असे म्हणू शकतो.
येथे काही उदाहरणे आहेत. रचना वरीलप्रमाणे आहे.
एक नजर टाका–
- No, he was not a hawker. नाही, तो एक हातगाडीवरून माल विकणारा फेरीवाला नव्हता. (No, he wasn’t.)
- No, I was not an MLA. नाही, ती आमदार नव्हती. (No, I wasn’t.)
- No, he was not a blacksmith. नाही, तो लोहार नव्हता. (No, he wasn’t.)
- No, my brother was not a pilot. नाही, माझा भाऊ एक वैमानिक नव्हता. (No, he wasn’t.)
- No, he was not a shopkeeper. नाही, तो एक दुकानदार नव्हता. (No, he wasn’t.)
- No, her sister was not a designer. नाही, तिची बहिण एक डिझायनर नव्हती. (No, she wasn’t.)
- No, his father was not a collector. नाही, त्याचे वडील जिल्हाधिकारी नव्हते. (No, he wasn’t.)
- No, her brother was not a watchman. नाही, तिचा भाऊ एक पहारेकरी नव्हता. (No, he wasn’t.)
- No, Sahil was not a taxi driver. नाही, साहिल टॅक्सी चालक नव्हते. (No, he wasn’t.)
- No, she was not a fiction writer. नाही, ती एक कल्पित कथा लेखक नव्हती. (No, she wasn’t.)
- No, Sameer was not an architect. नाही, समीर एक वास्तुविशारद नव्हता. (No, he wasn’t.)
- No, he was not a skilled potter.नाही, तो एक कुशल कुंभार नव्हता. (No, he wasn’t.)
- No, he was not a bank manager. नाही, तो एक बँक व्यवस्थापक नव्हता. (No, he wasn’t.)
- No, she was not a news reporter. नाही, ती एक बातमी पत्रकार नव्हती. (No, she wasn’t.)
- No, Tarak was not a comic poet.नाही, तारक हा विनोदी कवी नव्हता. (No, he wasn’t.)
- No, Lara was not a clerk in primary school. नाही, लारा शाळेत लिपिक नव्हती.(No, she wasn’t.)
- No, she was not a Foreign Minister. नाही, ती परराष्ट्र मंत्री नव्हती. (No, she wasn’t.)
- No, Sachin was not a cricket player. नाही, सचिन क्रिकेट खेळाडू नव्हता. (No, he wasn’t.)
- No, she was not a doctor at a government hospital. नाही, ती सरकारी रुग्णालयात डॉक्टर नव्हती. (No, she wasn’t.)
- No, my mother was not a professor of the English language. नाही, माझी आई इंग्रजी भाषेची प्राध्यापिका नव्हती. (No, she wasn’t.)
- No, my sister was not a chemical engineer. नाही, माझी बहीण रासायनिक अभियंता नव्हती. (No, she wasn’t.)
- No, she was not a ticket checker in the railway department. नाही, ती रेल्वे विभागात तिकीट तपासक नव्हती. (No, she wasn’t.)
- No, she was not an advocate at the Supreme Court. नाही, ती सर्वोच्च न्यायालयात वकील नव्हती. (No, she wasn’t.)
- No, his uncle was not a professional photographer. नाही, त्याचे काका एक व्यावसायिक छायाचित्रकार नव्हते. (No, he wasn’t.)
- No, she was not a motorwoman on the Mumbai local train. नाही, ती मुंबई लोकल ट्रेनमध्ये आगगाडीची चालक नव्हती. (No, she wasn’t.)
- No, she was not a nurse in medical college. नाही, ती वैद्यकीय महाविद्यालयात एक नर्स नव्हती. (No, she wasn’t.)
- No, he was not an officer in the education department. नाही, ते शिक्षण विभागाचे अधिकारी नव्हते. (No, he wasn’t.)
- No, Smita was not a teacher in Aurangabad. नाही, स्मिता औरंगाबाद मध्ये शिक्षीका नव्हती. (No, she wasn’t.)
- No, she was not an academic book publisher.नाही, ती एक शैक्षणिक पुस्तक प्रकाशक नव्हती. (No, she wasn’t.)
- No, he was not a bookseller in Pune. नाही, तो /ते पुण्यात पुस्तक विक्रेता नव्हता /नव्हते. (No, he wasn’t.)