Use of ‘Were’ to Tell about Profession

व्यवसायाबद्दल सांगण्यासाठी 'वअ/वअर' चा उपयोग

आपण मागील प्रकरणात भूतकाळातील व्यवसायाबद्दल सांगण्यासाठी  was (वॉज) चा वापर पाहिला आहे. या प्रकरणात आपण भूतकाळातील व्यवसायाबद्दल सांगण्यासाठी were च्या वापराबद्दल जाणून घेऊ.

वाक्याची रचना

या वाक्याची रचना भूतकाळातील स्थितीबद्दल सांगण्यासाठीच्या वाक्य रचने समानच आहे.

म्हणून भूतकाळातील व्यवसायाबद्दल सांगण्यासाठीच्या वाक्याची रचना आहे-

  • Subject (we/you/they/any plural noun) +  were + remaining words.
  • कर्ता (आम्ही /तू /तूम्ही/ ते/ या /त्या/ कोणतेही अनेकवचनी नाम ) + होता/ होती/ होते + उर्वरित शब्द

येथे काही उदाहरणे आहेत. रचना वरीलप्रमाणे आहे.

एक नजर टाका-

  1. We were hawkers.
    आम्ही एक हातगाडीवरून माल विकणारे फेरीवाले होतो.
  2. You were MLAs.
    तुम्ही आमदार होता.
  3. You were a blacksmith.
    तु/ तुम्ही लोहार होता.
  4. My two brothers were pilots.
    माझे दोन भाऊ वैमानिक होते.
  5. They were shopkeepers.
    ते दुकानदार होते.
  6. Her sisters were designers.
    तिच्या बहिणी योजक (डिझायनर) होत्या.
  7. His parents were collectors.
    त्याचे पालक जिल्हाधिकारी होते.
  8. Her three neighbors were watchmen.
    तिचे तीन शेजारी पहारेकरी होते.
  9. Sahil and his friend were taxi drivers.
    साहिल आणि त्याचे मित्र टॅक्सी चालक होते.
  10. They were fiction writers.
    ते कल्पित कथा लेखक होते.
  11. Sameer and his colleagues were architects.
    समीर आणि त्याचे सहकारी वास्तुविद्याविशारद होते.
  12. They were skilled potters.
    ते कुशल कुंभार होते.
  13. You were a bank manager.
    तु / तुम्ही एक बँक व्यवस्थापक होता.
  14. You were news reporters.
    तु / तुम्ही बातमी पत्रकार होता.
  15. Tarak and his uncle were comic poets.
    तारक आणि त्यांचे काका विनोदी कवी होते.
  16. Lara’s friends were clerks in school.
    Requested file could not be found (error code 404). Verify the file URL specified in the shortcode.
    लाराचे मित्र शाळेत लिपिक होते.
  17. They were Foreign Ministers.
    ते परराष्ट्र मंत्री होते.
  18. Sachin’s two brothers were cricket players.
    Requested file could not be found (error code 404). Verify the file URL specified in the shortcode.
    सचिनचे दोन भाऊ क्रिकेट खेळाडू होते.
  19. We were doctors at government hospitals.
    आम्ही सरकारी रुग्णालयात डॉक्टर होतो.
  20. My husband and brother were professors at Bhavans College.
    माझे पती आणि भाऊ भवन्स महाविद्यालयात प्राध्यापक होते.
  21. My sisters were chemical engineers.
    माझ्या बहिणी रासायनिक (अभियंता)अभियंत्या होत्या.
  22. They were ticket checkers in the railway department.
    ते रेल्वे विभागात तिकीट तपासक होते.
  23. She and her son were advocates at the Supreme Court.
    तिचा मुलगा आणि ती दोघे सर्वोच्च न्यायालयात वकील होते.
  24. His two uncles were professional photographers.
    त्याचे दोन काका व्यावसायिक छायाचित्रकार होते.
  25. They were motormen on the Mumbai local train.
    ते मुंबई लोकल ट्रेनमध्ये आगगाडी चालक होते.
  26. Both sisters were nurses in medical college.
    दोन्ही बहिणी वैद्यकीय महाविद्यालयात परिचारिका होत्या.
  27. You were officers in the education department.
    तुम्ही शिक्षण विभागात अधिकारी होता.
  28. Smita and her spouse were teachers in Aurangabad.
    स्मिता आणि तिचे पती औरंगाबादमध्ये शिक्षक होते.
  29. We were academic book publishers.
    आम्ही शैक्षणिक पुस्तक प्रकाशक होतो.
  30. They were booksellers in Pune.
    ते पुण्यात पुस्तक विक्रेते होते.

               Back          Next