Use of ‘Were’ in Negative Sentences to Tell about Profession

व्यवसायाबद्दल सांगण्यासाठी नकारात्मक वाक्यांमध्ये (were)'वअ'चा वापर

भूतकाळातील स्थितीबद्दल सांगण्यासाठी आपण नकारात्मक वाक्यांमध्ये 'were' चा वापर पाहिला आहे.

या प्रकरणात आपण व्यवसायाबद्दल सांगण्यासाठी 'were not' (नव्हतो/नव्हता/ नव्हते) च्या वापराबद्दल जाणून घेऊ.

वाक्याची रचना

या वाक्याची रचना मागील पाठातील वाक्यांच्या रचने समानच आहे. परंतु या वाक्यात आपल्याला  'were' सह 'not' वापरावे लागेल

म्हणून या वाक्याची रचना आहे-

 • Subject (we/ you/they/ other plural noun)+ were not + remaining words.
 • कर्ता (आम्ही /तू, तूम्ही/ ते / अन्य अनेकवचनी नाम) + were not (नव्हतो /नव्हता/ नव्हते) + उर्वरित शब्द

आपण वाक्यातील 'were not' च्या वापराबद्दल चर्चा करू.

 • व्यवसायाबद्दल नकारात्मक सांगणे

येथे काही उदाहरणे आहेत. रचना वरीलप्रमाणे आहे.

एक नजर टाका-
 1. We were not hawkers.
  आम्ही हातगाडीवरून माल विकणारे फेरीवाले नव्हतो.
 2. You were not MLAs.
  तुम्ही आमदार नव्हता.
 3. You were not a blacksmith.
  तु/ तुम्ही लोहार नव्हता.(एकवचनी)
 4. My two brothers were not pilots.
  माझे दोन भाऊ वैमानिक नव्हते.
 5. They were not shopkeepers.
  ते दुकानदार नव्हते.
 6. Her sisters were not designers.
  तिच्या बहिणी योजक (डिझायनर) नव्हत्या.
 7. His parents were not collectors.
  त्याचे पालक संग्राहक नव्हते.
 8. Her three neighbors were not watchmen.
  तिचे तीन शेजारी पहारेकरी नव्हते.
 9. Sahil and his friend were not taxi drivers.
  साहिल आणि त्याचे मित्र टॅक्सी चालक नव्हते.
 10. They were not fiction writers.
  ते कल्पित कथा लेखक नव्हते.
 11. Sameer and his colleagues were not architects.
  समीर आणि त्याचे सहकारी वास्तुशास्त्रज्ञ /वास्तुविशारद नव्हते.
 12. They were not skilled potters.
  ते कुशल कुंभार नव्हते.
 13. You were not a bank manager.
  तु / तुम्ही एक बँक व्यवस्थापक नव्हता.
 14. You were not news reporters.
  तुम्ही बातमी पत्रकार नव्हता.
 15. Tarak and his uncle were not comic poets.
  तारक आणि त्यांचे काका हास्यकवी नव्हते.
 16. Lara’s friends were not clerks in school.
  Requested file could not be found (error code 404). Verify the file URL specified in the shortcode.
  लाराचे मित्र शाळेत लिपिक नव्हते.
 17. They were not Foreign Ministers.
  ते परराष्ट्र मंत्री नव्हते.
 18. Sachin’s two brothers were not cricket players.
  Requested file could not be found (error code 404). Verify the file URL specified in the shortcode.
  सचिनचे दोन भाऊ क्रिकेट खेळाडू नव्हते.
 19. We were not doctors at government hospitals.
  आम्ही सरकारी रुग्णालयात डॉक्टर नव्हतो.
 20. My husband and brother were not professors at Bhavans College.
  Requested file could not be found (error code 404). Verify the file URL specified in the shortcode.
  माझे पती आणि भाऊ भवन्स महाविद्यालयात प्राध्यापक नव्हते.
 21. My sisters were not chemical engineers.
  माझ्या बहिणी रासायनिक (अभियंता)अभियंत्या नव्हत्या.
 22. They were not ticket checkers in the railway department.
  ते रेल्वे विभागात तिकीट तपासक नव्हते.
 23. She and her son were not advocates at the Supreme Court.
  तिचा मुलगा आणि ती दोघे सर्वोच्च न्यायालयात वकील नव्हते
 24. His two uncles were not professional photographers.
  त्याचे दोन काका व्यावसायिक छायाचित्रकार नव्हते.
 25. They were not motormen on the Mumbai local train.
  ते मुंबई लोकल ट्रेनमध्ये आगगाडी चालक नव्हते.
 26. Both sisters were not nurses in medical college.
  दोन्ही बहिणी वैद्यकीय महाविद्यालयात परिचारिका नव्हत्या.
 27. You were not officers in the education department.
  तुम्ही शिक्षण विभागात अधिकारी नव्हता.
 28. Smita and her spouse were not teachers in Aurangabad.
  स्मिता आणि तिचे पती औरंगाबादमध्ये शिक्षक नव्हते.
 29. We were not academic book publishers.
  आम्ही शैक्षणिक पुस्तक प्रकाशक नव्हतो.
 30. They were not booksellers in Pune.
  ते पुण्यात पुस्तक विक्रेते नव्हते.

               Back          Next