Good Wishes

शुभेच्छा

आपण इतरांना विविध प्रसंगी शुभेच्छा देतो. परंतु आपली शुभेच्छा देण्याची पद्धत समान असते.

प्रसंगानुसार शुभेच्छा कशी द्यायची ते आपण पाहू.

वाढदिवसाच्या प्रसंगी म्हणावे-

  • Wish you a happy birthday
    आपणास वाढदिवसाच्या शुभेच्छा
  • Happy birthday
    वाढदिवसाच्या शुभेच्छा
  • Many happy returns of the day
    हा आनंदी दिवस अनेकदा येवो
  • Wish you a happy Independence Day
    आपणास स्वातंत्र्य दिनाच्या हार्दीक शुभेच्छा
  • Wish you a happy 16th marriage anniversary
    आपणास/ तुम्हाला 16व्या लग्न वर्धापनदिनाच्या हार्दीक शुभेच्छा

 एखाद्याला त्याच्या यशाबद्दल अभिनंदन करण्यासाठी म्हणावे-

  • Congratulations
    अभिनंदन
  • Congrats on your success
    आपल्या यशाबद्दल अभिनंदन
  • Congratulations on behalf of my staff
    माझ्या कर्मचा-यांच्या वतीने अभिनंदन
  • Congratulations on your wedding
    आपल्याला लग्नाचे अभिनंदन

यशासाठी शुभेच्छा देण्यास म्हणावे-

  • Wish you all the best
    आपणाला शुभेच्छा
  • Best luck
    भाग्यवंत असा/शुभेच्छा.
  • Good luck
    भाग्यवंत असा /शुभेच्छा
  • May you always be lucky.
     
    आपण नेहमी भाग्यवान असा.
  • May luck always shine on you.
     
    आपणास नशीबाने नेहमी साथ द्यावी.
  • Hope you do well in the examination
    आपण परीक्षेत चांगले कराल अशी आशा
  • Hope you perform your duty well
    आपण आपले कर्तव्य पाळाल अशी आशा

कोणी आजारी असेल तर; म्हणा-

  • Get well soon
     
    लवकर बरे व्हा

कोणी प्रवास करणार असेल तर; म्हणा-

  • Happy journey
     
    प्रवास सुखाचा होओ
  • Wish you a happy journey
    आपणास आनंददायक प्रवासाची शुभेच्छा

                      BACK                                    NEXT