(वॉज)होतो/होते /होता/ होती :व्यवसायाबद्दल सकारात्मक उत्तरे
या धड्यात आपण सकारात्मक उत्तरे कशी तयार करावी ते पाहू.
सकारात्मक उत्तराची रचना
सकारात्मक उत्तराची रचना अशी आहे;
- Yes, + subject (I/he/she/it/ any singular noun) + was + remaining words.
- होय, + कर्ता ( मी/ तो / ती / ते / अन्य एकवचन संज्ञा) + होतो/होते /होता/ होती + उर्वरित शब्द.
or किंवा थोडक्यात उत्तर देण्यासाठी आपण फक्त-
- Yes + subject (I/he/she/it/singular noun) + was
- होय + कर्ता ( मी/तो / ती / ते / अन्य एकवचन संज्ञा) + (वॉज)होतो/होते /होता/ होती
- Yes, he was.(होय, तो होता.)
- Yes, she was.(होय, ती होती.)
असे म्हणू शकतो.
येथे काही उदाहरणे आहेत. रचना वरीलप्रमाणे आहे.
एक नजर टाका–
- Yes, he was a hawker. होय, तो एक हातगाडीवरून माल विकणारा फेरीवाला होता. (Yes, he was.)
- Yes, I was an MLA. होय, मी आमदार होते/होतो. (Yes, I was.)
- Yes, he was a blacksmith. होय, तो लोहार होता. (Yes, he was.)
- Yes, my brother was a pilot. होय, माझा भाऊ एक वैमानिक होता. (Yes, he was.)
- Yes, he was a shopkeeper. होय, तो एक दुकानदार होता. (Yes, he was.)
- Yes, her sister was a designer. होय, तिची बहिण एक डिझायनर होती. (Yes, she was.)
- Yes, his father was a collector. होय, त्याचे वडील जिल्हाधिकारी होते. (Yes, he was.)
- Yes, her brother was a watchman. होय, तिचा भाऊ एक पहारेकरी होता. (Yes, he was.)
- Yes, Sahil was a taxi driver. होय, साहिल टॅक्सी चालक होते. (Yes, he was.)
- Yes, she was a fiction writer. होय, ती एक कल्पित कथा लेखक होती. (Yes, she was.)
- Yes, Sameer was an architect. होय, समीर एक वास्तुविशारद होता. (Yes, he was.)
- Yes, he was a skilled potter. होय, तो एक कुशल कुंभार होता. (Yes, he was.)
- Yes, he was a bank manager. होय, तो एक बँक व्यवस्थापक होता. (Yes, he was.)
- Yes, she was a news reporter. होय, ती एक बातमी पत्रकार होती. (Yes, she was.)
- Yes, Tarak was a comic poet. होय, तारक हा विनोदी कवी होता. (Yes, he was.)
- Yes, Lara was a clerk in primary school. होय, लारा शाळेत लिपिक होती. (Yes, she was.)
- Yes, she was a Foreign Minister. होय, ती परराष्ट्र मंत्री होती. (Yes, she was.)
- Yes, Sachin was a cricket player. होय, सचिन क्रिकेट खेळाडू होता. (Yes, he was.)
- Yes, she was a doctor at a government hospital. होय, ती सरकारी रुग्णालयात डॉक्टर होती. (Yes, she was.)
- Yes, my mother was a professor of the English language. होय, माझी आई इंग्रजी भाषेची प्राध्यापिका होती. (Yes, she was.)
- Yes, my sister was a chemical engineer. होय, माझी बहीण रासायनिक अभियंता होती.(Yes, she was.)
- Yes, she was a ticket checker in the railway department. होय, ती रेल्वे विभागात तिकीट तपासक होती. (Yes, she was.)
- Yes, she was an advocate at the Supreme Court. होय, ती सर्वोच्च न्यायालयात वकील होती. (Yes, she was.)
- Yes, his uncle was a professional photographer. होय, त्याचे काका एक व्यावसायिक छायाचित्रकार होते. (Yes, he was.)
- Yes, she was a motorwoman on the Mumbai local train. होय, मुंबई लोकल ट्रेनमध्ये ती आगगाडीची चालक होती. (Yes, she was.)
- Yes, she was a nurse in medical college. होय, ती वैद्यकीय महाविद्यालयात एक नर्स होती. (Yes, she was.)
- Yes, he was an officer in the education department.होय, ते शिक्षण विभागाचे अधिकारी होते. (Yes, he was.)
- Yes, Smita was a teacher in Aurangabad. होय, स्मिता औरंगाबाद मध्ये शिक्षीका होती. (Yes, she was.)
- Yes, she was an academic book publisher. होय, ती एक शैक्षणिक पुस्तक प्रकाशक होती. (Yes, she was.)
- Yes, he was a bookseller in Pune. होय, तो /ते पुण्यात पुस्तक विक्रेता होता /होते.(Yes, he was.)