विल: नकारात्मक उत्तरे
भविष्यात काहीतरी (क्रिया)न करण्या विषयी सांगण्यासाठी तू /तूम्ही/तो / ती / ते / कोणताही एकवचनी किंवा अनेकवचनी कर्त्यासह ' विल' वापरले जाते.
नकारात्मक उत्तरामध्ये (will not) '-णार नाही ' चा वापर
वाक्यरचना
या वाक्याची रचना अशी आहे;
- No, + Subject you/ he / she / it/ they/ any singular or plural subject + will not + base form of a verb +remaining words
- नाही, + कर्ता (तू /तूम्ही/तो / ती / ते / कोणताही एकवचनी किंवा अनेकवचनी ) + विल (will not) नाही (करणार/ असणार/ होणार) + क्रियापदाचे मूळ रूप+ उर्वरित शब्द
थोडक्यात उत्तर देण्यासाठी आपण फक्त-
- No, you won't.
- No, he won't.
- No, she won't.
- No, they won't.
असे म्हणू शकतो.
येथे काही उदाहरणे आहेत. रचना वरीलप्रमाणे आहे.
चला एक नजर टाकूया-
- No, he will not go to the market. नाही, तो बाजारात जाणार नाही.
- No, she will not cook sweets for us.नाही, ती आमच्यासाठी मिठाई बनवणार नाही.
- No, they will not come on Monday.नाही, ते सोमवारी येणार नाहीत.
- No, it will not eat an apple.नाही, ते एक सफरचंद खाणार नाही.
- No, Anil will not solve an exercise in English.नाही,अनिल इंग्रजीतील एक सराव सोडवणार नाही.
- No, Gaurav will not play on the ground.नाही, गौरव मैदानावर खेळणार नाही.
- No, my parents will not go for a walk in the evening.नाही, माझे पालक संध्याकाळी फिरायला जाणार नाहीत.
- No, Shamali will not study in the college library.नाही, शामली महाविद्यालयाच्या ग्रंथालयात अभ्यास करणार नाही.
- No, she will not work hard to achieve her goal.नाही, ती आपले लक्ष्य साध्य करण्यासाठी परिश्रम घेणार नाही.
- No, students will not watch an air strike documentary.नाही, विद्यार्थी हवाई हल्ल्याचा माहितीपट पाहणार नाहीत.
- No, you will not buy a book for me.नाही, तू माझ्यासाठी पुस्तक विकत घेणार नाही.
- No, they will not collect stamps.नाही, ते शिक्के गोळा करणार नाहीत.
- No, Amruta will not write a story of a genius country boy.नाही, अमृता खेड्यातिल एका अलौकिक बुद्धिमान मुलाची कथा लिहीणार नाही.
- No, a cleaner will not clean our house tomorrow.नाही, सफाई कामगार उद्या आमचे घर स्वच्छ करणार नाही.
- No, she will not inquire about the bus.नाही, ती बसबद्दल विचारपूस करणार नाही.
- No, my mother will not purchase some vegetables.नाही, माझी आई काही भाज्या खरेदी करणार नाही.
- No, Sameer will not go by bus to his home town.नाही, समीर बसने आपल्या गावी जाणार नाही.
- No, they will not read this magazine.नाही, ते हे मासिक वाचणार नाहीत.
- No, students will not have fun on a trip.नाही, सहलीत विद्यार्थ्यांना मजा येणार नाही.
- No, she will not have her own house.नाही, तिचे स्वतःचे घर असणार नाही.
- No, he will not send you a message.नाही, तो तुम्हाला संदेश पाठवणार नाही.
- No, his brother will not receive him at the airport.नाही, त्याचा भाऊ विमानतळावर त्याला घ्यायला जाणार नाही.
- No, Smita will not reach there by 10 o’clock.Requested file could not be found (error code 404). Verify the file URL specified in the shortcode.नाही, स्मिता तेथे १० वाजेपर्यंत पोहोचणार नाही.
- No, her father will not solve that issue early.नाही, तिचे वडील लवकर हा प्रश्न सोडवणार नाहीत.
- No, Chetan will not watch a cartoon movie.नाही, चेतन एक हास्यचित्रपट पाहणार नाही.
- No, Karan will not plan to go out next week.नाही, करण पुढच्या आठवड्यात बाहेर जाण्याची योजना करणार नाही.
- No, you will not observe the lane.नाही, तूम्ही रस्त्याचे नियम पाळणार नाही.
- No, they will not communicate with each other.नाही, ते एकमेकांशी संवाद साधणार नाहीत.
- No, you will not drink hot water in the morning.नाही, तुम्ही सकाळी गरम पाणी पिणार नाही.
- No, his mother will not save some money for the tour.नाही, त्याचि आई दौर्यासाठी काही पैसे वाचवणार नाही.