व्यवसायाबद्दल
Sam has passed the Tenth exam with good marks. He has to take admission for the eleventh class. There is a discussion about his career between Sam and his mother.
सॅम दहावीची परीक्षा चांगल्या गुणांसह उत्तीर्ण झाला आहे. त्याला अकरावीच्या वर्गात प्रवेश घ्यायचा आहे. सॅमच्या व्यवसायाविषयीं तो आणि त्याची आई यांच्यात चर्चा सुरु आहे.
Have a look-
- Sam: Mom, now I have scored good marks. In which college will you admit me?
- सॅम: आई, आता मी चांगले गुण मिळवले आहेत. तु मला कोणत्या महाविद्यालयात प्रवेश देशिल?
- Mother: Sam, you have scored more marks in science and mathematics. You can get admission to Science College. But there is a vast syllabus, and you should work hard.
- आई: सॅम, तू विज्ञान आणि गणितामध्ये जास्त गुण मिळवले आहेत. तुला सायन्स कॉलेजमध्ये प्रवेश मिळू शकेल. परंतु तिथे खुप अभ्यासक्रम असतो आणि तु कठोर परिश्रम केले पाहिजेत.
- Sam: Yes, mom. I will work hard. I won’t give you a chance to complain. What shall I do after it?
- सॅम: होय, आई. मी कठोर परिश्रम करीन. मी तुला तक्रार करण्याची संधी देणार नाही. त्यानंतर मी काय करावे?
- Mother: You have an interest in computer science, drawing pictures of buildings. You can choose computer science as your career. Or, you can choose a career in the buildings.
- आई: तुला संगणक शास्त्र, इमारतींचे चित्र रेखाटणे यांची आवड आहे, तु संगणक विज्ञान व्यवसाय म्हणून निवडू शकतो. किंवा, तु इमारतींमध्ये व्यवसाय निवडू शकतो.
- Sam: I am most interested in the buildings. I think I can do better in the buildings.
- सॅम: मला इमारतींमध्ये सर्वाधिक रस आहे. मला वाटते इमारतींमध्ये मी अधिक चांगले करू शकतो.
- Mother: Then you should go for an Architectural course. There you can develop your skills in the buildings.
- आई: मग तु वास्तुकला अभ्यासक्रमासाठी जावे. तेथे तु इमारतींमध्ये आपले कौशल्य विकसित करू शकतो.
- Sam: What should I do for it? How can I get the chance to pursue my architectural studies?
- सॅम: मी त्यासाठी काय करावे? माझ्या वास्तुशास्त्राचा अभ्यास करण्याची संधी मला कशी मिळू शकेल?
- Mother: You should take Mathematics, Physics, and Chemistry as your group.
- आई: तुला आपला गट म्हणून गणित, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र घेतले पाहिजे.
- Sam: How many marks should I score in it?
- सॅम: मी त्यात किती गुण मिळवावे?
- Mother: You should score good marks in the Twelfth standard, and crack the entrance exam for the Architectural course as well.
- आई: तु बारावीत चांगले गुण मिळवले पाहिजेत, आणि वास्तुशास्त्र अभ्यासक्रमासाठीच्या प्रवेश परिक्षेत देखील पास झाला पाहिजे.
- Sam: Mom, what is an entrance exam, and why should I crack that exam?
- सॅम: आई, प्रवेश परिक्षा म्हणजे काय आणि मी ती परिक्षा का पास व्हावे?
- Mother: There are different entrance exams for the different professional courses. So, you should collect the information about the entrance exam for the architectural course.
- आई: वेगवेगळ्या व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी वेगवेगळ्या प्रवेश परीक्षा असतात. तर, तु वास्तुशास्त्र अभ्यासक्रमासाठीच्या प्रवेश परिक्षेविषयीची माहिती काढली पाहिजे.
- Sam: Where can I get the information about the entrance exam?
- सॅम: मला प्रवेश परिक्षेची माहिती कोठे मिळेल?
- Mother: Search for it on the internet.
- आई: ति इंटरनेटवर शोध.
- Sam: Mom, I searched on the internet. The name of that exam is NATA.
- सॅम: आई, मी इंटरनेटवर शोधले. त्या परिक्षेचे नाव नाटा आहे.
- Mother: Have you checked the syllabus for it?
- आई: तु त्याचा अभ्यासक्रम पाहिलास का?
- Sam: Yes, there is Visual, Architectural information, and Drawing.
- सॅम: होय, दृश्य, वास्तुशास्त्र माहिती आणि रेखांकन आहे.
- Mother: Will you be OK with that syllabus? Do you think that you can crack that exam?
- आई: तुला तो अभ्यासक्रम झेपेल ना? तु ती परिक्षा पास होऊ शकतो असे तुला वाटते का?
- Sam: Yes, of course. I shall give my best because I have to pursue architectural studies at any cost.
- सॅम: होय, नक्कीच. मी सर्वोत्तम देईन कारण मला कुठल्याही किंमतीवर स्थापत्य शास्त्राचा अभ्यास करायचा आहे.
- Mother: Then you should do the practice of drawing also.
- आई: मग तुला रेखांकनाचाही सराव करायला हवा.
- Sam: Yes, Mom, I have to join the drawing class. I got the information about the best drawing coaching class.
- सॅम: हो, आई, मला चित्रकला वर्गात दाखल व्हायचे आहे. मला सर्वोत्कृष्ट चित्रकला शिकवणी वर्गाची माहिती मिळाली.
- Mother: You should adjust your time for the study of Twelfth and drawing.
- आई: तु बारावी आणि रेखांकनाच्या अभ्यासासाठी आपला वेळ समायोजित केला पाहिजे.
- Sam: Yes, Mom, I shall.
- सॅम: होय, आई, मी करेन.
- Mother: Are you sure that you have to become an Architect?
- आई: तुला वास्तुविशारद व्हायचे आहे हे पक्के का?
- Sam: Of course. I have to become an architect by hook or crook.
- सॅम: नक्कीच. मला काहिही करून वास्तुविशारद व्हायचे आहे.
- Mother: Ok then, it’s well and good. Now focus on your studies. Get the brochure of that coaching class.
- आई: ठीक आहे, मग छान आहे. आता आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित कर. त्या शिकवणी वर्गाचे माहितीपत्रक मिळव.
- Sam: I shall get it tomorrow morning and start studying. Will you help me make a timetable for the study of an academic as well?
- सॅम: मी ते उद्या सकाळी घेईन आणि अभ्यास सुरू करेन. शैक्षणिक अभ्यासाचे वेळापत्रक तयार करण्यात तु मला मदत करशिल?
- Mother: Yes, I will help you. We shall take all those on paper according to the portion of all the subjects.
- आई: होय, मी तुला मदत करीन. आपण ते सर्व सर्व विषयांच्या अभ्यासक्रमानुसार कागदावर उतरवू.
- Sam: You will make it easy for me to plan the study of the subjects that will help me score more.
- सॅमः तु माझ्यासाठी त्या विषयांचा अभ्यास करण्याची योजना आखणे सोपे करशिल जे मला अधिक गुण मिळवून देण्यास मदत करेल.
- Mother: So, work hard to become an architect.
- आई: मग, वास्तुविशारद होण्यासाठी कठोर परिश्रम कर.