रेल्वे स्थानकावर
Nowadays so many people travel by railway. The railway is a lifeline of Mumbai.
There is a discussion between three passengers.
आजकाल बरेच लोक रेल्वेने प्रवास करतात. रेल्वे ही मुंबईची जीवनरेखा आहे.
तीन प्रवाश्यांमध्ये चर्चा होत आहे.
Have a look-
- Passenger 1: Excuse me, on what platform can I take a fast train?
- प्रवासी १: माफ करा, मी कोणत्या फलाटावर जलद ट्रेन घेऊ शकतो?
- Passenger 2: At platform number 5
- प्रवासी २: फलाट क्रमांक 5 वर
- Passenger 1: Does it halt at Dadar?
- प्रवासी १: ति दादर येथे थांबते का?
- Passenger 2: Yes, all trains halt at Dadar, slow as well as fast.
- प्रवासी २: होय, सर्वच गाड्या दादर येथे थांबतात, धिम्या तसेच जलद.
- Passenger 1: Will I get a rush?
- प्रवासी १: मला गर्दी मिळेल का?
- Passenger 2: No, you won’t get a rush at this time. There is a rush at peak hours, from 8 to 10 am and 6 to 8 pm.
- प्रवासी २: नाही, यावेळी आपल्याला गर्दी मिळणार नाही. कामाच्या जाण्यायेण्याच्या वेळी, सकाळी 8 ते 10 आणि संध्याकाळी 6 ते 8 या वेळेत गर्दी असते.
- Passenger 1: Oh, I see. We should avoid traveling during peak hours. By the way, how to reach platform 5?
- प्रवासी १: अच्छा आता कळलं. आपण कामाच्या जाण्यायेण्याच्या तासांमध्ये प्रवास करणे टाळले पाहिजे. तसे, फलाट 5 वर कसे जायचे?
- Passenger 2: Go by this bridge and step down at the left.
- प्रवासी २: या पुलावरून जा आणि डावीकडे खाली उतरा.
- Passenger 1: Thank you, you helped me a lot.
- प्रवासी १: धन्यवाद, तुम्ही मला खूप मदत केली.
(Passenger goes to platform 5, and asks another person)
(प्रवासी प्लॅटफॉर्म 5 वर जातो आणि दुस ऱ्या व्यक्तीला विचारतो)
- Passenger 1: What is the time of the train for Dadar?
- प्रवासी १: दादरसाठी रेल्वेचा वेळ काय आहे?
- Passenger 3: It passed just. It was slow.
- प्रवासी३: आत्ताच गेली. धिमी होती.
- Passenger 1: I missed it. When is another?
- प्रवासी १: माझी चुकली. दुसरी कधी आहे?
- Passenger 3: Trains for Dadar are every three minutes. Don’t you have a timetable with you?
- प्रवासी ३: दादरसाठी दर तीन मिनिटांनी गाड्या असतात. तुमच्याकडे वेळापत्रक नाही का?
- Passenger 1: No, I don’t have a timetable. I will get it tomorrow. I have taken a new job. But now I should wait for two minutes.
- प्रवासी १: नाही, माझ्याकडे वेळापत्रक नाही. मला ते उद्या मिळेल. मी नवीन नोकरी घेतली आहे. पण आता मी दोन मिनिटे थांबलं पाहिजे.
- Passenger 3: Yes, you don’t have any choice.
- प्रवासी ३: होय, तुमच्याकडे काही पर्याय नाही.
- Passenger 1: How many stations are there before Dadar?
- प्रवासी १: दादरच्या आधी किती स्थानके आहेत?
- Passenger 3: There are seven stations. But if you take a fast train, you won’t get any station. It doesn’t halt at any station.
- प्रवासी ३: सात स्थानके आहेत. परंतु तुम्ही जलद रेल्वे घेतल्यास तुम्हाला कोणतेही स्थानक मिळणार नाही. ति कोणत्याही स्थानकावर थांबत नाही.
- Passenger 1: I shall take the fast one so that I will reach early at the destination.
- प्रवासी १: मी जलद घेईन जेणेकरुन मी माझ्या ठिकाणी लवकर पोहोचेल.
- Passenger 3: Better decision, it will be suitable for you.
- प्रवासी ३: उत्तम निर्णय, तो तुमच्यासाठी योग्य असेल.
- Passenger 1: Is it the last station?
- प्रवासी १: हे शेवटचे स्थानक आहे का?
- Passenger 3: No, it isn’t. After Dadar, it becomes slow.
- प्रवासी ३: नाही, ते नाही. दादर नंतर, ति धिमी होते.
- Passenger 1: Train service is much disciplined.
- प्रवासी १: रेल्वे सेवा जास्त शिस्तबद्ध आहे.
- Passenger 3: Yes, trains are at the proper time. Employees and workers can reach their workplace on time. We can rely on the train.
- प्रवासी ३: होय, गाड्या योग्य वेळी असतात. कर्मचारी आणि कामगार त्यांच्या कामाच्या ठिकाणी वेळेवर पोहोचू शकतात. आपण रेल्वेवर अवलंबून राहू शकतो.
- Passenger 1: Oh, I am so happy about this.
- प्रवासी १: ओह, मी याबद्दल खुप आनंदी आहे.
- Passenger 3: Train is passing. Get inside.
- प्रवासी ३: रेल्वे जात आहे. आत जा.
- Passenger 1: I had a great time with you. Enjoyed, Bye
- प्रवासी १: मी तुमच्याबरोबर चांगला वेळ घालवला. आनंद झाला, चला (बाय)
- Passenger 3: Me too, Bye
- प्रवासी ३: मला पण, बाय/ चला