Use of ‘Did Have’ to Ask Questions about Possession

आपण भुतकाळातील मालकीविषयी प्रश्न विचारण्यासाठी have सह did वापरतो.

हि रचना नेहमीच्या किंवा कायम स्थितीच्या संदर्भात वापरलि जाते.

म्हणून did have (होते/ वे लागले) चा वापर करून प्रश्नाची रचना अशी आहे-

 • Did + subject + have + remaining words + question mark (?)
 • डिड + कर्ता (कोणताही- एकवचनी किंवा अनेकवचनी नाम) + हॅव+ उर्वरित शब्द+ प्रश्न चिन्ह (?)

येथे काही उदाहरणे आहेत. वाक्यरचना वरीलप्रमाणे आहे.

चला एक नजर टाकूया-

 1. Did I have an elder brother?
  (relationship) मला एक मोठा भाऊ होता का?(नाते)
 1. Did Neela have two maternal aunts?
  (relationship) नीलाला दोन मावश्या होत्या का? (नाते)
 1. Did I have a coupon from Big Bazar?
  माझ्याकडे बिगबाजारचे कूपन होते का?
 1. Did we have a meeting at 2 pm yesterday?
  काल दुपारी दोन वाजता आमची बैठक झाली का?
 1. Did she have musical instruments last night?
  काल रात्री तिच्याकडे वाद्ये होती का?
 1. Did those boys have drawing books to draw a design?
  त्या मुलांकडे डिझाईन काढण्यासाठी चित्रकारी पुस्तके होती का?
 1. Did she have golden bangles?
  तिच्याकडे सोन्याच्या बांगड्या होत्या का?
 1. Did he have a big assignment of interior design?
  त्याला आंतरिक मांडणीचे मोठे नेमलेले काम होते का?
 1. Did Suvarna have two bags of red colour?
  सुवर्णाकडे लाल रंगाच्या दोन पिशव्या होत्या का?
 1. Did he have a circular wall clock?
  त्याच्याकडे भिंतीवरचे वर्तुळाकार घड्याळ होते का?
 1. Did Gaurav have so much office work yesterday?
  काल गौरवला कार्यालयीन काम खुप होते का?
 1. Did we have a new guitar that day?
  त्यादिवशी आमच्याकडे नवीन गिटार होता का?
 1. Did Nikita have a good time with him?
  निकिताने त्याच्याबरोबर चांगला वेळ घालवला का?
 1. Did a lion have a mane of golden hair?
  सिंहाला सोनेरी केसांची आयाळ होती का?
 1. Did doctors have a busy schedule in the medical camp?
  वैद्यकीय शिबिरात डॉक्टरांचे व्यस्त वेळापत्रक होते का?
 1. Did the bird have a nest in the tree?
  पक्ष्याला झाडावर घरटे होते का?
 1. Did animals have enough water in the forest?
  जंगलात प्राण्यांना पुरेसे पाणी होते का?
 1. Did a monkey have an infant under its arm?
  माकडाच्या बगलेत पिल्लू होते का?
 1. Did they have violet shirts with a yellow patch?
  त्यांना पिवळ्या रंगाचे ठिगळ लावलेले जांभळे शर्ट होते का?
 1. Did it have yellow eyes that frightened me?
  त्याच्या पिवळ्या डोळ्यांनी मला घाबरवले का?
 1. Did you have a blue skirt at the party?
  पार्टीत तुझ्या अंगावर निळा स्कर्ट होता का?
 1. Did we have that book in the college library?
  आमच्याकडे ते पुस्तक महाविद्यालयाच्या ग्रंथालयात होते का?
 1. Did Parth have five friends during his college days?
  ### in/during

कॉलेजच्या काळात पार्थला पाच मित्र होते का?

 1. Did teachers have a vacation in the month of April?
  एप्रिल महिन्यात शिक्षकांना सुट्टी होती का?
 1. Did Dolly have a green skirt with a red frill?
  डॉलीकडे लाल झालरचा हिरवा स्कर्ट होता का?
 1. Did it have too much pain in its ankle?
  (physical feeling) त्याच्या घोट्यात खूप वेदना होती का? (शारीरिक भावना)
 1. Did I have a green blouse with a white bow?
  माझ्याकडे पांढरा बो असलेला हिरवा ब्लाउज होता का?
 1. Did we have violet shirts as our uniform?
  आमचा जांभळा शर्ट हाच गणवेश होता का?
 1. Did that boy have a black t-scale?
  त्या मुलाकडे काळी टी-स्केल होती का?
 1. Did Sankita have eight subjects for her syllabus?
  संकिताला अभ्यासक्रमासाठी आठ विषय होते का?
Compact Audio Player Error! You must enter the mp3 file URL via the "fileurl" parameter. Please check the documentation and correct the mistake.