‘डु’ (करणे)चा उपयोग
‘डु’ मी, आम्ही, तु, तुम्ही, ते, किंवा कोणत्याही अनेकवचनी नाम, सर्वनामा सह वापरले जाते.
आपण वर्तमान काळात प्रश्न विचारण्यासाठी मदत करणारे क्रियापद म्हणून 'डू' वापरतो.
आपण 'डू' -
- मुख्य क्रियापद म्हणून
- नकारात्मक वाक्य तयार करण्यासाठी
- प्रश्न विचारण्यासाठी
- वर्णनाची निश्चितता दर्शविण्यासाठी
- मुख्य क्रियापद म्हणून
वापरू शकतो.
Use of 'Do' as the Main Verb
आपण कर्त्यानंतर 'डू' मुख्य क्रियापद म्हणून वापरू शकतो.
Formation of a sentence
वाक्याची रचना
वाक्य या स्वरुपात असेल-
- Subject (I/we/you/they/any plural number)+ do + remaining words.
- कर्ता (मी / आम्ही / तु / तुम्ही/ आपण / ते / कोणतेही अनेकवचनी नाम) + करा + उर्वरित शब्द.
आपण 'do' मुख्य क्रियापद म्हणून वाक्याच्या सुरूवातीला वापरू शकतो.
वाक्य या स्वरुपात असेल-
- Do + remaining words
- करा + उर्वरित शब्द
येथे काही उदाहरणे दिली आहेत. रचना वरीलप्रमाणे आहे.
Have a look-
- I do it carefully. मी ते काळजीपूर्वक करतो.
- Do it with concentration.ते एकाग्रतेने करा.
- We do as you tell.तुम्ही सांगता तसे आम्ही करतो.
- They do it in the morning.ते ते सकाळी करतात.
- Do your best.पूर्ण प्रयत्न कर.
- Do me a favor, please.कृपया माझे एक काम करा.
- They do well in their exam.ते त्यांच्या परीक्षेत चांगले काम करतात.
- They do something for me.ते माझ्यासाठी काहीतरी करतात.
- I do my homework in the evening.मी माझा गृहपाठ संध्याकाळी करतो.
- We do it according to our convenience.आम्ही ते आमच्या सोयीनुसार करतो.
- Do as she asks you to do.ति तुम्हाला जसे करण्यास सांगते तसे करा.
- You can do well in this situation.तुम्ही या परिस्थितीत चांगले काम करू शकता.
- I always do research on human behavior.मी नेहमीच मानवी वर्तनावर संशोधन करतो.
- I do office-work from home now. मी आता ऑफिसचे काम घरून करतो.
- We do our laundry on Saturday.आम्ही शनिवारी आमचे कपडे धुण्याचे काम करतो.
- You do nothing on Monday.तुम्ही सोमवारी काहीही करत नाही.
- They do their homework at night.ते त्यांचे गृहकार्य रात्री करतात.
- Employees do their work well.कर्मचारी त्यांची कामे चांगल्या प्रकारे करतात.
- Officers do office work in time.अधिकारी कार्यालयीन कामे वेळेच्या आत करतात.
- They do a good job.ते चांगले काम करतात.
- Do it once again.ते पुन्हा एकदा करा.
- Do as you wish.आपल्या इच्छेनुसार करा.
- We do our study after lunch.आम्ही आमचा अभ्यास दुपारच्या जेवणानंतर करतो.
- I do it on my own.मी ते स्वतःहून करतो.
- They do it properly.ते ते योग्य रितीने करतात.
- We do well on stage.आम्ही व्यासपीठावर चांगले सादरिकरण करतो.
- Do it on your own.ते तुम्ही स्वतः करा.
- Do as I do.मी करतो तसे करा.
- I do my duty well.मी माझे कर्तव्य चांगले पार पाडतो.
- We do our best.आम्ही आमचे सर्वोत्तम प्रयत्न करतो.