Use of Had: Action to Do

हॅड (होते)चा वापर: करण्याची कृती

‘Had’ is used to explain the action to do in the past.

भुतकाळातील कृती समजावून देण्यासाठी ‘हॅड’ चा वापर केला जातो.

वाक्यरचना

The formation of a sentence is as;

वाक्याची रचना अशी आहे-

  • Subject + had to + base form of verb + remaining words.
  • कर्ता (कोणताही- एकवचनी किंवा अनेकवचनी नाम) + चे होते/ वे लागले + क्रियापदाचे मूलभूत रूप + उर्वरित शब्द.

येथे काही उदाहरणे आहेत. वाक्यरचना वरीलप्रमाणे आहे.

चला एक नजर टाकूया-

  1. She had to provide food to orphans yesterday.
    काल तिला अनाथांना अन्न पुरवावे लागले.
  2. I had to serve meals in the cafeteria for my kids.
    मला माझ्या मुलांसाठी कॅफेटेरियामध्ये जेवण वाढावे लागले.
  3. He had to get information about the presence of workers.
    कामगारांच्या उपस्थितीबद्दल त्यांना माहिती मिळवायची होती.
  4. He had to write an article about a pet for a website.
    त्याला वेबसाइटसाठी पाळीव प्राण्याबद्दल लेख लिहावा लागला.
  5. I had to buy some notebooks for my son.
    मला माझ्या मुलासाठी काही वह्या खरेदी करायच्या होत्या.
  6. She had to manage a program in the office.
    तिला कार्यालयात एक कार्यक्रम व्यवस्थापित करावा लागला.
  7. He had to participate in the college dance competition.
    त्याला महाविद्यालयीन नृत्य स्पर्धेत भाग घ्यावा लागला.
  8. Sanika had to convince her mother for her marriage.
    सानिकाला तिच्या लग्नासाठी आईला पटवावे लागले.
  9. She had to cook for her guests.
    तिला आपल्या पाहुण्यांसाठी स्वयंपाक करावा लागला.
  10. She had to paint her house with her skill.
    तिला आपल्या कौशल्याने तिचे घर रंगवायचे होते.
  11. Saurabh had to check all evidence last night.
    काल रात्री सौरभला सर्व पुरावे तपासावे लागले.
  12. We had to plant a hundred trees a day.
    आम्हाला दिवसाला शंभर झाडे लावावी लागली.
  13. He had to guard a farmhouse of his sister.
    त्याला आपल्या बहिणीच्या शेतातिल घराची देखभाल करायची होती.
  14. Students had to reach for a parade on time.
    विद्यार्थ्यांना परेडसाठी वेळेवर पोहोचायचे होते.
  15. She had to complete her work within an hour.
    तिला आपले काम एका तासाच्या आत पूर्ण करावे लागले.
  16. You had to cultivate fruit trees last year.
    तुम्हाला गेल्या वर्षी फळझाडांची लागवड करावी लागली.
  17. They had to learn sincerely to crack the competitive exam.
    स्पर्धा परीक्षेत उत्तिर्ण होण्यासाठी त्यांना प्रामाणिकपणे शिकावे लागले.
  18. A waiter had to serve water to all customers.
    वेटरला सर्व ग्राहकांना पाणी द्यावे लागले.
  19. He had to compromise with her wife.
    त्याला त्याच्या पत्नीशी तडजोड करावी लागली.
  20. Students had to put on blue shoes.
    विद्यार्थ्यांना निळे बुट घालावे लागले.
  21. She had to convey the message to her sister.
    तिला तिच्या बहिणीला संदेश द्यावा लागला.
  22. A worker had to work for eight hours.
    कामगाराला आठ तास काम करावे लागले.
  23. An elephant had to pull the log.
    हत्तीला लाकडाचा ओंडका खेचावा लागला.
  24. A bullock had to work in a field.
    बैलाला शेतात काम करायचे होते.
  25. A teacher had to teach Mathematics in an easy way.
    शिक्षकाला गणित सोप्या पद्धतीने शिकवायचे होते.
  26. A student had to wear a school uniform.
    विद्यार्थ्याला शाळेचा गणवेश घालायचा होता.
  27. She had to try her best to succeed in this competitive world.
    या स्पर्धात्मक जगात यशस्वी होण्यासाठी तिला सर्वतोपरी प्रयत्न करावे लागले.
  28. The staff had to arrive before 10 o’clock.
    Requested file could not be found (error code 404). Verify the file URL specified in the shortcode.
    कर्मचाऱ्यांना 10 वाजण्याच्या आधी पोहोचायचे होते.
  29. We had to speak our minds clearly in that situation.
    त्या परिस्थितीत आपल्याला आपल्या मनातिल स्पष्टपणे बोलावे लागले.
  30. Sangeeta had to study for four hours every day.
    संगीताला दररोज चार तास अभ्यास करावा लागला.

Back        Next