Job interview

There is an interview for the post of teacher. The Secretary of an Education society is taking an interview.

Have a look-

  • Candidate: May I come in, sir?
  • उमेदवार: मी आत येऊ का सर?
  • Secretary: Yes, please.
  • सचिव: होय, कृपया.
  • Candidate: Good morning, sir.
  • उमेदवार: सुप्रभात, सर.
  • Secretary: Good morning. Have your seat, please.
  • सचिव: सुप्रभात. कृपया बसा.
  • Candidate: Thank you.
  • उमेदवार: धन्यवाद
  • Secretary: Your name, please.
  • सचिव: कृपया, तुमचे नाव
  • Candidate: I am Neena Patole.
  • उमेदवार: मी नीना पटोले
  • Secretary: You have applied for the post of mathematics teacher. Tell me about yourself.
  • सचिव: तुम्ही गणिताच्या शिक्षक पदासाठी अर्ज केला आहे. मला स्वतःबद्दल सांगा.
  • Candidate: Yes, sir. I earned the degrees B. Sc, B. Ed. and have teaching experience of five years. I teach mathematics to tenth students. The passing result of the tenth standard for mathematics was more than 90 percent for each year for the last five years.
  • उमेदवार: हो सर. मी बी.एससी., बी.एड. आहे आणि मला पाच वर्षांचा अध्यापन अनुभव आहे. मी दहावीच्या विद्यार्थ्यांना गणित शिकवते. मागील पाच वर्षात गणितासाठी दहावी उत्तीर्ण होणारा निकाल दरवर्षी 90% पेक्षा जास्त होता.
  • Secretary: Why did you want to be a teacher?
  • सचिव: तुम्हाला शिक्षक व्हावेसे का वाटले?
  • Candidate: In my school days, my father used to teach me. He always tried to simplify the terms easily. I used to enjoy learning with him. That inspired me to become a teacher.
  • उमेदवार: माझ्या शालेय जिवनात माझे वडील मला शिकवायचे. त्यांनी नेहमीच मुद्दे सहजपणे सोपे करण्याचा प्रयत्न केला. मला त्यांच्याबरोबर शिकण्यात मजा यायची. यामुळे मला शिक्षक होण्याची प्रेरणा मिळाली.
  • Secretary: Where have you taught?
  • सचिव: तुम्ही कुठे शिकवले?
  • Candidate: I have been teaching at Don Bosco Secondary School.
  • उमेदवार: मी डॉन बॉस्को माध्यमिक शाळेत शिकवत आहे.
  • Secretary: Have you resigned?
  • सचिव: तुम्ही राजीनामा दिला आहे का?
  • Candidate: No, not yet, but I have to leave it.
  • उमेदवार: नाही, अद्याप नाही, परंतु मला ती सोडायची आहे.
  • Secretary: Why have you to leave your current job?
  • सचिव: तुम्हाला तुमची सध्याची नोकरी का सोडायची आहे?
  • Candidate: The place is very far from my house. Besides, the salary is not enough.
  • उमेदवार: ती जागा माझ्या घरापासून खूप दूर आहे. याशिवाय पगार पुरेसा नाही.
  • Secretary: What is your present salary? What salary do you expect?
  • सचिव: तुमचा सध्याचा पगार किती आहे? तुम्हाला किती पगाराची अपेक्षा आहे?
  • Candidate: Twenty thousand rupees per month. According to my expertise and experience, I expect Thirty thousand to forty thousand per month.
  • उमेदवार: दरमहा वीस हजार रुपये. माझ्या कौशल्य आणि अनुभवानुसार, मला दरमहा तीस हजार ते चाळीस हजाराची अपेक्षा आहे.
  • Secretary: What is your teaching style?
  • सचिव: तुमची शिकवण्याची शैली कशी आहे?
  • Candidate: Most of the students learn problem-solving. They are not able to solve other examples of the same type which they learned. I teach the basics so that they should be able to solve any problem with any number of the same type.
  • उमेदवार: बहुतेक विद्यार्थी उदाहरणे सोडवणे शिकतात. ते शिकलेल्या प्रकारची इतर उदाहरणे सोडविण्यास सक्षम नसतात. मी मुलभूत गोष्टी शिकवते जेणेकरून ते सारख्याच प्रकारच्या कोणत्याही आकडयासहच्या उदाहरणांचे निराकरण करण्यास सक्षम असतील.
  • Secretary: What are the misconceptions students may have while solving the problem 41.7+ 0.34? How will you correct it?
  • सचिव: 41.7+ 0.34 हे उदाहरण सोडवताना विद्यार्थ्यांना काय गैरसमज असू शकतात? तुम्ही त्याचे निराकरण कसे कराल?
  • Candidate: They may line the 4 upright below 7 so, the answer will be wrong. I will teach them to line the decimals up and then put the zero right below one and 3 right below 7. So, they won’t get confused.
  • उमेदवारः ते 7 खाली 4 लिहू शकतात, म्हणून उत्तर चुकेल. मी त्यांना दशांश चिन्ह एकाखाली एक द्यायला सांगेल आणि नंतर शुन्य एक या अंकाखाली व तिन सात या अंकाखाली ठेवण्यास शिकवीन. म्हणजे, ते भ्रमित होणार नाहीत.
  • Secretary: What will you do for the students who are poor at mathematics?
  • सचिव: गणितात कच्चे असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तुम्ही काय कराल?
  • Candidate: First, I shall take them aside and find out the root cause of their poorness in mathematics and teach them accordingly so that they will have confidence and they will study.
  • उमेदवार: प्रथम मी त्यांना बाजूला घेऊन गणितात कच्चे असण्याचे मूळ कारण शोधून काढेन आणि त्यानुसार त्यांना शिकवेन जेणेकरुन त्यांना आत्मविश्वास येईल आणि ते अभ्यास करतील.
  • Secretary: How do you motivate students?
  • सचिव: तुम्ही विद्यार्थ्यांना कशा प्रकारे प्रेरित करता?
  • Candidate: I put the names of well-performing students on the board, and tell all students to clap for them. I know they get motivated by this method.
  • उमेदवारः मी उत्तम कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांची नावे फळ्यावर लिहिते, आणि सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्यासाठी टाळ्या वाजवण्यास सांगते. मला माहित आहे की ते या पद्धतीने प्रेरित होतात.
  • Secretary: If a period of the tenth standard is off due to the unavailability of a science teacher, how will you manage that class?
  • सचिव: विज्ञान शिक्षकाच्या अनुपलब्धतेमुळे जर दहावीचा तास रिकामा असेल तर तो वर्ग तुम्ही कसा सांभाळाल?
  • Candidate: I will assign students to ask questions and answer the questions of the taught lesson.
  • उमेदवार: मी विद्यार्थ्यांना शिकवलेल्या धड्यावरिल प्रश्न विचारण्याचे आणि प्रश्नांची उत्तरे देण्याचे कार्य देईल.
  • Secretary: All right. We shall let you know soon.
  • सचिव: ठीक आहे. आम्ही लवकरच आपल्याला कळवू.
  • Candidate: Ok. Thank you.
  • उमेदवार: ठीक आहे. धन्यवाद

Back        Next