Mother and Class Teacher

आई आणि वर्ग शिक्षिका

The class teacher asks a student to call her mother to meet. She has to speak about the student’s progress with her mother.

वर्ग शिक्षिका एका विद्यार्थिनीला तिच्या आईला भेटायला बोलवायला सांगतात. त्यांना विद्यार्थिनीच्या प्रगतीबद्दल तिच्या आईशी बोलायचे आहे.

Have a look-

  • Mother: Good morning, ma’am. I am Pornima Varma, Sachi’s mother. Sachi told me that you want to see me.
  • आई: शुभ प्रभात, मॅम. मी पोर्णिमा वर्मा आहे, साचीची आई. साचीने मला सांगितले की तुम्हाला मला भेटायचे आहे.
  • Teacher: Yes, please have a seat. I have to talk to you about Sachi.
  • शिक्षिका: होय, कृपया बसुन घ्या. मला तुमच्याशी साचीबद्दल बोलायचं आहे.
  • Mother: What is a problem? Does she mess up in the class?
  • आई: काय झाले? ती वर्गात गोंधळ घालते का?
  • Teacher: No, she doesn’t. I want to show you her monthly progress report. Go through this and see how she is doing with her studies.
  • शिक्षिका: नाही, ती गोंधळ घालत नाही. मला तुम्हाला तिचा मासिक प्रगती अहवाल दाख वायचा आहे. हे जरा डोळ्याखालुन घाला आणि बघा ति तिच्या अभ्यासात कशी आहे.
  • Mother: Oh, she has failed in two subjects, Maths and Science. She didn’t tell me about this.
  • आई: ओह, ती गणित आणि विज्ञान या दोन विषयांत नापास झाली आहे. तिने मला याबद्दल सांगितले नाही.
  • Teacher: Don’t you ask her to study? You should be serious about her studies.
  • शिक्षिका: तुम्ही तिला अभ्यास करायला सांगत नाही का? तिच्या अभ्यासाबद्दल तुम्ही गंभीर असले पाहिजे.
  • Mother: She doesn’t take an interest in her studies. I am worried about her. I tried to talk with her, but not worked.
  • आई: ति तिच्या अभ्यासामध्ये गोडी दाखवत नाही. मला तिची काळजी वाटते. मी तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण काही उपयोग झाला नाही.
  • Teacher: Yesterday I noticed that she couldn’t read a book properly.
  • शिक्षिका: काल माझ्या लक्षात आले की ती पुस्तक योग्य प्रकारे वाचू शकत नाही.
  • Mother: Yes, I also think so. She also complains of headaches.
  • आई: होय, मलाही असेच वाटते. ती डोकेदुखीचीही तक्रार करते.
  • Teacher:  Better get her to an eye specialist. 
  • शिक्षिका: तिला नेत्रतज्ज्ञांकडे नेलेले बरे.
  • Mother: Yes, I will take her to an eye specialist and consult regarding her health.
  • आई: होय, मी तिला नेत्रतज्ज्ञांकडे नेईन आणि तिच्या आरोग्याबद्दल सल्लामसलत करेन.
  • Teacher: Besides, she needs extra attention for maths and science. Which coaching class does she go to?
  • शिक्षिका: याशिवाय, गणित आणि विज्ञानासाठी तिला अधिक लक्ष देणे आवश्यक आहे. ती कोणत्या कोचिंग क्लासला जाते?
  • Mother:  Sapana coaching classes
  • आई: सपना कोचिंग क्लास
  • Teacher: Meet the head of that coaching class and show him a progress report.
  • शिक्षिका: त्या कोचिंग क्लासच्या प्रमुखांना भेटा आणि त्यांना प्रगती अहवाल दाखवा.
  • Mother: Yes, I will do.
  • आई: होय, मी भेटेन.
  • Teacher:  Pay more attention to her. The half-yearly exam is at the corner too.
  • शिक्षिका: तिच्याकडे अधिक लक्ष द्या. सहामाही परीक्षाही जवळ आली आहे.
  • Mother: I shall try my level best. Please, note assignments in her diary so that I can ask her to complete those on time.
  • आई: मी माझे सर्वतोपरी प्रयत्न करेन. कृपया तिच्या रोजनिशीत दिलेल्या अभ्यासाची  नोंद घ्या जेणेकरुन मी तिला वेळेवर पूर्ण करण्यास सांगू शकेन.
  • Teacher: Daily assignments are put on the board, but she doesn’t note them in her diary.
  • शिक्षिका: दररोजचा अभ्यास फळ्यावर दिला जातो, परंतु ते ती तिच्या रोजनिशीत नोंदवत नाही.
  • Mother: I shall check it from now onwards. Please, can you pay attention to whether she notes in her diary or not?
  • आई: हो, मी यापुढे हे तपासून घेईन. कृपया, ती तिच्या रोजनिशीत नोंदवते की नाही याकडे आपण लक्ष देऊ शकता का?
  • Teacher: Of course, I shall, but please, check her diary daily.
  • शिक्षिका: होय, नक्कीच, परंतु कृपया रोज तिची रोजनिशी तपासत जा.
  • Mother: Can you speak with her mathematics teacher about her progress?
  • आई: तुम्ही तिच्या प्रगतीबद्दल तिच्या गणिताच्या शिक्षकाशी बोलू शकता का?
  • Teacher: Don’t worry; I have already discussed this with her. It will be better to ask her tuition teacher to take her basics first.
  • शिक्षिका: काळजी करू नका; मी त्यांच्याशी याविषयी आधीच चर्चा केली आहे.  तिच्या शिकवणी शिक्षकांना तिला आधी मुलभूत गोष्टी शिकवण्यास सांगणे हे अधिक चांगले होईल.
  • Mother: Yes, ma’am, and thank you for informing me. Please, keep me informing.
  • आई: होय, मॅम, आणि मला कळवल्याबद्दल धन्यवाद. कृपया, मला माहिती देत ​​रहा.
  • Teacher: Sure, she is our student. We should take care of her progress, but we need your help also.
  • शिक्षिका: नक्कीच, ति आमची विद्यार्थिनी आहे. आम्हाला तिच्या प्रगतीची काळजी घ्यायला हवी, पण आम्हाला तुमच्याही मदतीची गरज आहे.
  • Mother: Yes, ma’am, I will take care of it. Thank you very much. I appreciate your work.
  • आई: होय, मॅम, मी याची काळजी घेईन. खूप खूप धन्यवाद. मला तुमच्या कामाचे कौतुक आहे.
  • Teacher: My pleasure!
  • शिक्षिका: माझे सौभाग्य

Back        Next