भेट वस्तू खरेदी करणे
Meena wants to purchase a mobile phone to present her cousin.
मीना तिच्या चुलतभावाला भेट देण्यासाठी मोबाइल फोन खरेदी करू इच्छिते.
She goes to the shop.
ती दुकानात जाते.
There is a discussion between Meena and the shopkeeper.
मीना आणि दुकानदार यांच्यात चर्चा सुरु आहे.
Have a look-
- Shopkeeper: Welcome, how can I help you, Ma'am?
- दुकानदार: आपले स्वागत आहे, मी तुम्हाला कशी मदत करू?
- Meena: I want to buy a mobile phone.
- मीना: मला मोबाइल फोन घ्यायचा आहे.
- Shopkeeper: What type of mobile do you want, a touch screen or with the only keypad?
- दुकानदारः तुम्हाला कोणत्या प्रकारचा मोबाइल पाहिजे, टचस्क्रीन कि फक्त कीपॅड असलेला?
- Meena: I want a touch screen, the latest model.
- मीना: मला टच स्क्रीन हवा आहे, नवीन मॉडेलचा.
- Shopkeeper: We have a large variety. You can select from this showcase.
- दुकानदार: आमच्याकडे भरपुर प्रकार आहेत. आपण या शोकेसमधून निवडू शकता.
- Meena: Please show me that one, second in the third row.
- मीना: कृपया मला तो दाखवा, तिसर्या रांगेत दुसरा.
- Shopkeeper: Yes, of course. This mobile is of Nokia, a very nice piece.
- दुकानदार: होय, नक्कीच. हा मोबाइल नोकियाचा आहे, तो खूप छान आहे.
- Meena: What is the price?
- मीना: किंमत काय आहे?
- Shopkeeper: It costs twenty thousand rupees only.
- दुकानदार: याची किंमत फक्त वीस हजार रुपये आहे.
- Meena: Ok, show me another of this range.
- मीना: ठीक आहे, मला या श्रेणीतील दुसरा दाखवा.
- Shopkeeper: We have many brands of mobiles. Look at this, a new brand.
- दुकानदार: आमच्याकडे बर्याच ब्रँडचे मोबाइल आहेत. हा पहा, नवीन ब्रँड.
- Meena: No, I don’t want a new brand. Show me of a reputed brand. ##
- मीना: नाही, मला नवीन ब्रँड नको आहे. मला नामांकित ब्रँड चा दाखवा.
- Shopkeeper: Ma'am, this is a very nice mobile.
- दुकानदार: मॅम, हा खूप छान मोबाइल आहे.
- Meena: No, I didn’t like its design. Please show me another one.
- मीना: नाही, मला त्याची रचना आवडली नाही. कृपया मला आणखी एक दाखवा.
- Shopkeeper: Ok, this one?
- दुकानदार: ठीक आहे, हा?
- Meena: What brand is that?
- मीना: तो कोणता ब्रँड आहे?
- Shopkeeper: Samsung, having so many applications
- दुकानदार: सॅमसंग, खुप अप्लिकेशन्स आहेत
- Meena: Oh, nice! I liked it. What is its price?
- मीना: ओह छान! मला आवडले. त्याची किंमत काय आहे?
- Shopkeeper: Twenty thousand five hundred only
- दुकानदार: फक्त वीस हजार पाचशे
- Meena: Is there any guarantee?
- मीना: काही हमी आहे का?
- Shopkeeper: Yes, two years
- दुकानदार: होय, दोन वर्षे
- Meena: I shall buy this.
- मीना: मी हा विकत घेईन.
- Shopkeeper: Thank you for buying from our shop.
- दुकानदार: आमच्या दुकानातून खरेदी केल्याबद्दल धन्यवाद.
- Meena: How can I pay- by cash or card?
- मीना: मी पैसे कसे देऊ शकते- रोख कि कार्डद्वारे?
- Shopkeeper: Anyway
- दुकानदार: कसेही
- Meena: I have a card. Can I pay with a card?
- मीना: माझ्याकडे कार्ड आहे. मी कार्डद्वारे पैसे देऊ शकते का?
- Shopkeeper: Of course, you can.
- दुकानदार: नक्कीच, देऊ शकता.
- Meena: Ok, can you gift-wrap it, please?Meena pays.
- मीना: ठीक आहे, तुम्ही भेटवस्तू-लपेट करू शकता, कृपया? (मीना पैसे चुकते करते)
- Shopkeeper: Sure! Thank you, ma'am. Here is your coupon. Carry this with you next time when you visit our shop. You will get a discount on the purchased items.
- दुकानदार: नक्की! धन्यवाद, मॅम. हे आपले कूपन आहे. पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही आमच्या दुकानात याल तेव्हा हे बरोबर घेऊन या. आपल्याला खरेदी केलेल्या वस्तूंवर सूट मिळेल.