Skip to content
'च्या समोर' चा वाक्यात वापर
- She parked her car in front of the office of her husband.
- तिने तिची कार तिच्या पतीच्या कार्यालयासमोर उभी केली.
- A really fat woman was sitting in front of me and I couldn’t see the stage performance of my son properly.
- एक अगदीच जाड महिला माझ्या समोर बसली होती आणि मी माझ्या मुलाचा रंगभुमीवरील प्रयोग व्यवस्थित पाहू शकलो नाही.
- He sat down in front of her table to check the account of last month.
- गेल्या महिन्याचा हिशेब तपासण्यासाठी तो तिच्या टेबलासमोर बसला.
- Never argue with your wife in front of children.
- कधीही मुलांसमोर आपल्या पत्नींसोबत वाद घालू नका.
- I don’t want you insulting in front of your kids.
- तुमच्या मुलांसमोर तुमचा अपमान व्हावा अशी माझी इच्छा नाही.
- I was surprised suddenly seeing him in front of me.
- त्याला अचानक माझ्या समोर पाहून मला आश्चर्य वाटले.
- Yesterday, a bike accident took place in front of our office.
- काल आमच्या कार्यालयासमोर एका दुचाकीचा अपघात झाला.
- There is a strange man, wandering in front of my house.
- माझ्या घरासमोर एक विचित्र माणूस भटकत आहे.
- Don’t open your secrets in front of everyone.
- प्रत्येकासमोर आपली गुपिते उघडू नका.
- She kept the fruits on the dining table in front of his eyes.
- तिने त्याच्या डोळ्यासमोर जेवणाच्या टेबलावर फळं ठेवली.
- He stood up in front of his boss and gave a presentation.
- तो त्याच्या साहेबासमोर उभा राहिला आणि सादरिकरण केले.
- In this corona pandemic, you should keep a safe distance from a person in front of you.
- या कोरोना महामारीत आपण आपल्या समोरच्या व्यक्तीपासून सुरक्षित अंतर ठेवले पाहिजे.
- Who is the man standing in front of the office gate?
- कार्यालयाच्या फाटकासमोर उभा असलेला माणूस कोण आहे?
- She slapped him at his house in front of his friend.
- तिने त्याला त्याच्या घरी त्याच्या मित्रासमोर थप्पड मारली.
- They decided to meet in the hotel in front of the railway station.
- त्यांनी रेल्वे स्थानकासमोरील हॉटेलमध्ये भेटण्याचे ठरविले.
- Park your car in the parking space in front of the hotel.
- हॉटेलसमोर पार्किंगच्या जागेवर आपली कार पार्क करा.
- She wanted to talk with an agent about the rent but not in front of the owner.
- तिला अडत्याबरोबर भाड्याबद्दल बोलायचे होते परंतु मालकासमोर नाही.
- She washed her hand at the basin in front of the inn.
- तिने खाणावळीसमोरच्या पात्रात हात धुतले.
- She left the job because the shop owner insulted her in front of the customers.
- दुकानातील मालकाने ग्राहकांसमोर तिचा अपमान केल्यामुळे तिने नोकरी सोडली.
- Dorothy was calm because she was afraid to perform a dance in front of the audience.
- डोरोथी शांत होती कारण ती प्रेक्षकांसमोर नृत्य करण्यास घाबरत होती.
- There was cold in the hills, so they warmed up in front of the bonfire.
- डोंगरांमध्ये थंडी होती म्हणून त्यांनी शेकोटीसमोर शेक घेतला.
- Arun sprawled on the floor in front of the TV.
- अरुण टीव्हीसमोर फरशीवर पसरला.
- Swearing in front of the children is not a good thing.
- मुलांसमोर शपथ घेणे ही चांगली गोष्ट नाही.
- He couldn’t move as she stopped with her kid under her arm in front of him.
- ति तिच्या मुलाला कडेवर घेऊन त्याच्या समोर थांबली तेंव्हा तो हलु शकला नाही.
- Alka swept the courtyard in front of her house.
- अल्काने तिच्या घरासमोरील अंगण झाडून काढले.
- The woman stood in front of her was warning not to go ahead.
- तिच्या समोर उभी असलेली स्त्री पुढे न जाण्याचा इशारा देत होती.
- She didn’t want to show her distress in front of anyone.
- तिला आपला त्रास कोणासमोरही दाखवायचा नव्हता.
- There is a beautiful lake in front of his house.
- त्याच्या घरासमोर एक सुंदर तलाव आहे.
- They spend too much time in front of the television.
- ते दूरदर्शनसमोर बराच वेळ घालवतात.
- I bought this umbrella at the store in front of the railway station.
- ही छत्री मी रेल्वे स्थानकासमोरील दुकानातून विकत घेतली.