At the bank

A lady has to open an account in the bank. There is a discussion between a lady and a bank employee.

एका महिलेला बँकेत खाते उघडायचे आहे. एक महिला आणि बँक कर्मचार्‍यामध्ये चर्चा सुरु आहे.

Have a look-

एक नजर टाका -

  • Lady: Excuse me. Which is the counter to open a new account?
     
  • स्त्री: माफ करा. नवीन खाते उघडण्यासाठी कोणता मेज (काउंटर) आहे?
  • Bank employee: Please go to the cabin in front of the inquiry desk.
  • बँक कर्मचारीः कृपया चौकशी डेस्कसमोरच्या खोलीमध्ये जा.

(Lady goes to the cabin and stands by the door of the cabin.) 

(स्त्री खोलीकडे जाते आणि खोलीच्या दाराशी उभी राहते.)

  • Lady: May I come in, sir?
  • स्त्री: ( सर) साहेब मी आत येऊ शकते का?
  • Bank officer: Yes, please. What can I do for you?
  • बँक अधिकारी: होय, कृपया. मी तुमच्यासाठी काय करू शकतो?
  • Lady: I want to open a savings account in this bank.
  • स्त्री: मला या बँकेत बचत खाते उघडण्याची इच्छा आहे.
  • Bank officer: Oh sure, madam. Are you new to this bank?
  • बँक अधिकारी: हो जरूर, (मॅडम) बाईसाहेब. आपण या बँकेत नवीन आहात का?
  • Lady: Yes, I came here from Ahemadabad last week, but I have an account in the Surat branch.
  • स्त्री: होय, मी गेल्या आठवड्यात अहमदाबादहून येथे आले आहे, परंतु माझे एक खाते सुरत शाखेत आहे.
  • Bank officer: Have you to transfer your account, or to open a new account here?
  • बँक अधिकारी: आपले खाते हस्तांतरित करायचे आहे की येथे नवीन खाते उघडायचे आहे?
  • Lady: What will be suitable? I want it easier and faster.
  • स्त्री: काय सोयीस्कर असेल? मला हे सोपे आणि लवकर हवे आहे.
  • Bank officer: Opening a new account is easier and faster, but we need a reference from someone known to the bank, that is, he should be an account holder of this bank.
  • बँक अधिकारी: नवीन खाते उघडणे सोपे आणि जलद आहे, परंतु आम्हाला बँकेच्या एखाद्या ओळखीचा संदर्भ आवश्यक आहे, म्हणजे तो या बँकेचा खातेदार असावा.
  • Lady: Ok. No problem, my friend has an account in this bank. What is the minimum deposit for it?
  • स्त्री: ठीक आहे. काही हरकत नाही, माझ्या मित्राचे या बँकेत खाते आहे. त्यासाठी किमान ठेव किती आहे?
  • Bank officer: You can open an ordinary savings account with a minimum deposit of five hundred rupees. But if you want a debit card and cheque book, it needs to deposit one thousand rupees.
  • बँक अधिकारीः तुम्ही किमान पाचशे रुपयांच्या ठेवीसह एक सामान्य बचत खाते उघडू शकता. परंतु जर तुम्हाला डेबिट कार्ड आणि चेकबुक हवे असेल तर त्यासाठी एक हजार रुपये जमा करणे आवश्यक आहे.
  • Lady: How much time will it take to get the debit card?
  • स्त्री: डेबिट कार्ड मिळण्यासाठी किती वेळ लागेल?
  • Bank officer: It will take a week, and will be sent to your address mentioned in the form.
  • बँक अधिकारी: यास एक आठवडा लागेल, आणि (फॉर्ममध्ये) छापील नमुन्यात  नमुद केलेल्या तुमच्या पत्त्यावर पाठविले जाईल.
  • Lady: What is the rate of interest on a savings account?
  • स्त्री: बचत खात्यावर व्याज किती आहे?
  • Bank officer: Four percent per annum
  • बँक अधिकारीः वर्षाकाठी चार टक्के
  • Lady: Has this branch ATM facility?
  • स्त्री: या शाखेत एटीएम सुविधा आहे का?
  • Bank officer: Yes, of course
  • बँक अधिकारी: होय, अर्थात
  • Lady: What is the withdrawal limit a day?
  • स्त्री: दिवसाला पैसे काढण्याची मर्यादा किती आहे?
  • Bank officer: Ten thousand rupees
  • बँक अधिकारी: दहा हजार रुपये
  • Lady: Nice. Please give me details for the account opening.
  • स्त्री: छान. कृपया खाते उघडण्यासाठी मला तपशील द्या.
  • Bank officer: Ok. Here is a form. Please get the signature of your friend on this card, and this is for your specimen signature. Fill up this form and bring two passport size photos.
  • बँक अधिकारी: ठीक आहे. येथे एक फॉर्म आहे. कृपया या कार्डवर आपल्या मित्राची सही घ्या आणि हे आपल्या नमुना  स्वाक्षरीसाठी आहे. हा फॉर्म भरा आणि पासपोर्ट आकाराचे दोन फोटो आणा.
  • Lady: What documents should I submit?
  • स्त्री: मी कोणती कागदपत्रे जमा करावीत?
  • Bank officer: You need to submit hard copies of address proof and ID proof.
  • बँक अधिकारी: आपल्याला पत्ता पुरावा आणि ओळख पुराव्याच्या कागदी प्रती सादर कराव्या लागतील.
  • Lady: Can I submit it tomorrow?
  • स्त्री: मी ते उद्या सादर करू शकते का?
  • Bank officer: Yes, you can submit at any time on weekdays.
  • बँक अधिकारी: होय, आपण आठवड्याच्या कामकाजाच्या दिवशी कधीही जमा करू शकता.
  • Lady: Okay sir, thank you so much
  • स्त्री: ठीक आहे सर, खुप खुप आभार
  • Bank officer: You are welcome.
      
  • बँक अधिकारी: तुमचे स्वागत आहे. 

Back          Next         

Leave a Comment