At the library

ग्रंथालयात

A girl is preparing for a competitive exam to acquire an administrative job. She is in need of the required books for the examination. So, she has come to the library. There is a discussion between the librarian and a girl.

प्रशासकीय नोकरी मिळवण्यासाठी एक मुलगी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे. तिला परीक्षेसाठी आवश्यक पुस्तकांची गरज आहे. म्हणुन ती वाचनालयात आली आहे. ग्रंथपाल आणि मुलगी यांच्यात चर्चा सुरु आहे.

Have a look

 • Girl: Excuse me! I want some books.
 • मुलगी: माफ करा! मला काही पुस्तके हवी आहेत.
 • Assistant Librarian: Are you a member of this library?
 • सहाय्यक ग्रंथपाल: आपण या ग्रंथालयाचे सदस्य आहात का?
 • Girl: No, but I want to be a member. I got the information that this library has all the books I need.
 • मुलगी: नाही, परंतु मला सदस्य व्हायचे आहे. या ग्रंथालयात मला आवश्यक असलेली सर्व पुस्तके असल्याची माहिती मिळाली.
 • Assistant Librarian: Yes, of course. (You got the right information.) We have a lot of books. You can get all types of books in this library.
 • सहाय्यक ग्रंथपाल: होय, अर्थात. (आपल्याला योग्य माहिती मिळाली.) आमच्याकडे बरीच पुस्तके आहेत. आपल्याला या ग्रंथालयात सर्व प्रकारचि पुस्तके मिळू शकतात.
 • Girl: Yes, that’s why I came here to be a member of this library. Can you tell me what procedure is required?
 • मुलगी: होय, म्हणूनच मी येथे या ग्रंथालयाचा सदस्य होण्यासाठी आले आहे. कोणती रीत अनुसरणे आवश्यक आहे ते मला सांगू शकता का?
 • Assistant librarian: Please go to the cabin. There is our librarian, meet him. He will explain the procedure to you. 
 • सहाय्यक ग्रंथपाल: कृपया केबिनला जा. तिथे आमचे ग्रंथपाल आहेत, त्यांना भेटा. ते तुम्हाला रीत समजावून सांगतिल.
 • Girl: Ok, thanks
 • मुलगी: ठीक आहे, धन्यवाद

(The girl goes to the librarian.)

(मुलगी ग्रंथपालाकडे जाते.)

 • Girl: May I come in, sir?
 • मुलगी: मी आत येऊ शकते का सर?
 • Librarian: Yes, come in, please.
 • ग्रंथपाल: होय, आत या, कृपया
 • Girl: Sir, I am preparing for a competitive exam in an administrative post. I want the required books from your library.
 • मुलगी: सर, मी प्रशासकीय पदा साठीच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे. मला तुमच्या ग्रंथालयातून आवश्यक पुस्तके हवी आहेत.
 • Librarian: First, you should be a member of this library. Please fill-up this form, and pay the deposit amount.
 • ग्रंथपाल: प्रथम, आपण या ग्रंथालयाचे सदस्य असले पाहिजे. कृपया हा फॉर्म भरा आणि जमा रक्कम भरा.
 • Girl: What is the deposit, sir?
 • मुलगी: ठेव किती आहे सर?
 • Librarian: Two thousand rupees. You will get two books a week at home. Then you should return those books and take another two.
 • ग्रंथपाल: दोन हजार रुपये. तुम्हाला आठवड्याला दोन पुस्तके घरी मिळतील. मग आपण ती पुस्तके परत करावीत आणि आणखी दोन घ्यावी.
 • Girl: Ok, sir, I fill-up the form and pay the deposit now. Can I get them issued for a month?
 • मुलगी: ठीक आहे सर मी फॉर्म भरते आणि ठेव आता जमा करते. मला ते एका महिन्यासाठी मिळु शकतील का?
 • Librarian: Yes, have you to get both the books issued at the same time?
 • ग्रंथपाल: होय. तुम्हाला दोन्ही पुस्तके, एकाच वेळी हवी आहेत का?
 • Girl: Yes sir. I have to go through those thoroughly. Please issue me a membership card.
 • मुलगी: हो सर. मला त्यांचा सखोल अभ्यास करायचा आहे. कृपया मला सदस्यता ओळखपत्र द्या.
 • Librarian: This is your library membership card. Please sign the back of the card.
 • ग्रंथपाल: हे आपले ग्रंथालयाचे सदस्यता ओळखपत्र आहे. कृपया ओळखप त्राच्या मागील बाजूस सही करा.
 • Girl: Okay. I have signed it.
 • मुलगी: ठीक आहे. मी त्यावर सही केली आहे.
 • Librarian: Please keep it safe. When you come to the library, bring it with you.
 • ग्रंथपाल: कृपया ते सुरक्षित ठेवा. जेव्हा आपण ग्रंथालयात याल तेव्हा ते आपल्याबरोबर घेऊन या.
 • Girl: Yes, of course, sir. Can I get the books now?
 • मुलगी: हो, साहेब नक्कीच. मला आता पुस्तके मिळू शकतात काय?
 • Librarian: Yes, you can choose from the shelf. Make an entry of those books in the register with the issuing date.
 • ग्रंथपाल: होय, तुम्ही फडताळामधून निवडू शकता, रजिस्टरमध्ये मिळालेल्या तारखेसह त्या पुस्तकांची नोंद करा.
 • Girl: Yes sir, on which shelf are the books? Today I want books in English literature.
 • मुलगी: हो सर, कोणत्या फडताळावर पुस्तके आहेत? आज मला इंग्रजी साहित्याचि पुस्तके हवी आहेत.
 • Librarian: In the left corner, you can go and get the books you need.
 • ग्रंथपाल: डाव्या कोपर्‍यात, आपण जाऊ शकता आणि आपल्याला आवश्यक पुस्तके घेऊ शकता.
 • Girl: Thank you, sir.
 • मुलगी: धन्यवाद, सर.

Back          Next 

Leave a Comment