Use of Have

हॅव चा वापर

'Have' is used with I, we, you, and they, or plural nouns in the present. Let’s see how to use ‘have’ in a sentence.

मी, आम्ही, तु, तुम्ही, आणि ते किंवा अनेकवचनि नाम यांच्यासह 'हॅव' वर्तमानात वापरले जाते.

We can use ‘have’ to explain-

  • possession of anything in the present
  • physical feeling
  • relationships
  • the action to do in the present
  • action completed in the present

आपण ‘हॅव’-

  • वर्तमानात असलेला कोणत्याही वस्तूचा ताबा
  • शारीरिक भावना
  • नाती
  • वर्तमानात करावयाची कृती
  • वर्तमानात पूर्ण करावयाची कृती

यांचे स्पष्टीकरण देण्यासाठी वापरू शकतो.

As said above, ‘have is used to explain about possession of anything in the present.

वर सांगितल्याप्रमाणे, ‘have’ चा वापर वर्तमानात असलेला कोणत्याही वस्तूचा ताबा/मालकी स्पष्ट करण्यासाठी केला जातो.

मालकी सांगण्यासाठी हॅव चा उपयोग

In this lesson, we shall see how to form a sentence to explain the possession of anything, physical feeling, and relationships.

या पाठात आपण कोणत्याही गोष्टीचा ताबा/ मालकी, शारीरिक भावना व नाती सांगण्यासाठी वाक्य कसे तयार करावे ते पाहू.

Formation of a sentence

वाक्यरचना

We can form a sentence as;

आपण वाक्य असे बनवू शकतो;

  • Subject (I / we / you / they/ any plural noun) + have + remaining words.
  • कर्ता (मी / आम्ही / तू/ तूम्ही/ 'ते' /अन्य अनेकवचनी नाम) + have ' आहे/ असते ' + उर्वरित शब्द

In these sentences, ‘have’ is used as the main verb. Let's see how to use have in a sentence.

या वाक्यांमध्ये, ‘हॅव’ मुख्य क्रियापद म्हणून वापरले जाते. चला वाक्यात ‘हॅव’ कसे वापरायचे ते पाहूया.

Here are some examples. The formation of a sentence is as above.

येथे काही उदाहरणे आहेत. वाक्यरचना वरीलप्रमाणे आहे.

Let’s have a look-

चला एक नजर टाकूया-

  1. I have a book with pictures.
    माझ्याकडे चित्र असलेले पुस्तक आहे.
  2. We have six notebooks in our cupboard.
    आमच्याकडे आमच्या कपाटात सहा वह्या आहेत.
  3. You have a new calendar on a wall.
    तुमच्याकडे भिंतीवर एक नवीन दिनदर्शिका आहे.
  4. They have a CPU with a graphic card.
    त्यांच्याकडे ग्राफिक कार्ड असलेले सीपीयू आहे.
  5. I have too much homework.
    मला खूप गृहपाठ/ गृहकार्य आहे.
  6. We have a shoe rack with a blue cover.
    आमच्याकडे निळ्या रंगाचे आवरण असलेले बुटांचे कपाट आहे.
  7. You have an artistic viewpoint.
    तुम्हाला कलात्मक दृष्टीकोन आहे.
  8. I have a sister two years younger than me. (relationship)
    मला माझ्यापेक्षा दोन वर्षांनी लहान एक बहीण आहे. (नाते)
  9. I have a green skirt with white patches.
    माझ्याकडे पांढरे ठिपके असलेला एक हिरवा घागरा आहे.
  10. You have a blue shirt with a polo collar.
    तुला पोलो कॉलरचा निळा शर्ट आहे.
  11. They have five files of card paper.
    त्यांच्याकडे कागदाच्या कपटाच्या पाच फाईल्स आहेत.
  12. I have a headache since morning. (physical feeling)
    मला सकाळपासूनच डोकेदुखी आहे. (शारीरिक भावना)
  13. You have backache due to the overriding of a bicycle.
    तुम्हाला सायकलच्या अति वापरामुळे पाठदुखी आहे.
  14. We have our own cricket kit.
    आमच्याकडे स्वतः चा क्रिकेट संच आहे.
  15. They have a water tank in their house.
    त्यांच्या घरात पाण्याची टाकी आहे.
  16. I have a meeting at 2 pm today.
    आज दुपारी दोन वाजता माझी बैठक आहे.
  17. We have two bedrooms flat in that building.
    त्या इमारतीत आमचा दोन शय्यागृह असलेला फ्लॅट आहे.
  18. You have an iPhone to use for shooting that event.
    त्या कार्यक्रमाच्या चित्रणात वापर करण्यासाठी तुमच्याकडे आयफोन आहे.
  19. They have a white car.
    त्यांच्याकडे पांढरी कार आहे.
  20. Nurses have a difficult job.
    परिचारिकांना कठीण काम आहे/ असते.
  21. Teachers have a vacation for one month.
    शिक्षकांना एक महिन्याची सुट्टी आहे/ असते.
  22. Those boys have blue dresses.
    त्या मुलांना निळे कपडे आहेत.
  23. Birds have wings.
    पक्ष्यांना पंख असतात.
  24. Animals have tails.
    प्राण्यांना शेपट्या आहेत/ असतात.
  25. Squirrels have bushy tails.
    खारींना झुबकेदार शेपटी असते.
  26. I have a new black jersey.
    माझ्याकडे एक नवीन काळी जर्सी आहे.
  27. You have a new haircut today.
    आज तु केस नवीन पद्धतिने कापले.
  28. They have a football match next week.
    पुढच्या आठवड्यात त्यांचा फुटबॉलचा सामना आहे.
  29. I have a big assignment this week.
    या आठवड्यात मला नेमून दिलेले एक मोठे काम आहे.
  30. They have two cotton bags.
    त्यांच्याकडे दोन कापडी पिशव्या आहेत.

Back        Next

Leave a Comment