व्यवसायाबद्दल सांगण्यासाठी 'आहे' चा वापर
या धड्यात आपण व्यवसायाबद्दल सांगण्यासाठी ‘is’ चा उपयोग शिकू.
या वाक्याची रचना मागील धड्यातील वाक्यांसारखीच आहे.
वाक्याची रचना
या वाक्याची रचना आहे-
- Subject (he/she/it/any singular noun) + is + remaining words
- कर्ता (तो / ती / तो / एकवचन संज्ञा) + आहे + उर्वरित शब्द
येथे काही उदाहरणे आहेत. रचना वरीलप्रमाणे आहे.
एक नजर टाका–
- She is a doctor.ती डॉक्टर आहे.
- My mother is a professor.माझी आई प्राध्यापक आहे.
- He is a potter.तो कुंभार आहे.
- My sister is an engineer.माझी बहीण अभियंता आहे.
- She is a cook.ती एक स्वयंपाकीण आहे.
- He is a hawker.तो एक फेरीवाला आहे.
- Her sister is a designer.तिची बहिण एक डिझाइनर/योजक आहे.
- His father is a collector.त्याचे वडील जिल्हाधिकारी आहेत.
- Her brother is a watchman.तिचा भाऊ एक पहारेकरी आहे.
- She is an advocate.ती एक वकील आहे.
- He is a manager.तो एक व्यवस्थापक आहे.
- She is a reporter.ती एक पत्रकार आहे.
- He is a blacksmith.तो एक लोहार आहे.
- His uncle is a photographer.त्याचे काका छायाचित्रकार आहेत.
- Sachin is a player.सचिन एक खेळाडू आहे.
- She is a motorwoman.ती एक आगगाडीची चालक आहे.
- Lara is a clerk.लारा एक लिपिक आहे.
- Tarak is a poet. तारक कवी आहे.
- She is a nurse.ती एक परिचारिका आहे.
- Sahil is a driver.साहिल एक वाहनचालक आहे.
- He is a shopkeeper.तो एक दुकानदार आहे.
- She is a writer.ती एक लेखक आहे.
- Sameer is an architect.समीर एक वास्तुविद्याविशारद आहे.
- He is an officer.तो एक अधिकारी आहे.
- My brother is a pilot.माझा भाऊ एक वैमानिक आहे.
- She is a Minister.ती एक मंत्री आहे.
- She is an MLA.ती आमदार आहे.
- Smita is a teacher.स्मिता शिक्षक आहे.
- She is a book publisher. ती एक पुस्तक प्रकाशक आहे.
- He is a bookseller. तो एक पुस्तक विक्रेता आहे.