Knowing the way

मार्ग माहित करणे

When we go to an unknown place, we ask the way to someone.

Roshan has to go to Powai, but he doesn’t know the way to reach there.

He is asking the way to a person.

जेव्हा आपण एखाद्या अज्ञात ठिकाणी जातो, तेव्हा आपण एखाद्याला मार्ग विचारतो.

रोशनला पवईला जायचे आहे, पण  त्याला तिथपर्यंत पोहोचण्याचा रस्ता माहित नाही.

तो एका व्यक्तीला मार्ग विचारत आहे.

Have a look-

 • Roshan: Excuse me. Could you tell me the bus number to go to Powai?
 • रोशन: माफ करा. तुम्ही मला पवईला जाण्यासाठीचा  बस क्रमांक सांगू शकाल का?
 • Person:  You should take 461 to reach Powai. As compared to other buses, it skips most of the stops. So you can reach early.
 • व्यक्ति: पवईला पोहोचण्यासाठी तुम्ही 461 घ्यायला हवी. इतर बसेसच्या तुलनेत, ही बरेचसे थांबे वगळते. म्हणुन तुम्ही लवकर पोहोचू शकता.
 • Roshan: At what bus stop should I get down?
 • रोशन: मी कोणत्या बस स्टॉपवर उतरले पाहिजे?
 • Person: At Rambaugh, Rambag bus stop will be convenient to go to Powai. Take a taxi at the stop.
 • व्यक्ति : रामबाग येथे, पवईला जाण्यासाठी रामबाग बसस्थानक सोयीचे होईल. स्टॉपवर टॅक्सी घ्या.
 • Roshan: Ok, thank you. You made it very easy for me.
 • रोशन: ठीक आहे, धन्यवाद. तुम्ही माझ्यासाठी हे खूप सोपे केले आहे.
 • Person: Welcome! The bus is passing. You can take it.
 • व्यक्ति: स्वागत आहे! बस जात आहे. तुम्ही ति घेऊ शकता.

Roshan gets in the bus.

रोशन बसमध्ये चढतो.

 • Roshan: (to the conductor) Would you please inform me when the bus reaches Rambag so that I can get down?
 • रोशन: (कंडक्टरला/ वाहकास)  रामबागला बस पोहोचेल तेव्हा कृपया मला सांगाल का जेणेकरून मी खाली उतरू शकेन?
 • Conductor: Yes, I will, but stand up at the Tata steel. Rambaugh is the next stop to Tata steel.
 • वाहक: होय, मी सांगेल, पण टाटा स्टील आले की उभे रहा. रामबाग टाटा स्टीलचा पुढील थांबा आहे.
 • Roshan: Ok, how much time will it take?
 • रोशन: ठीक आहे, किती वेळ लागेल?
 • Conductor: Around one hour
 • वाहक: सुमारे एक तास

Roshan gets off the bus and tries to take a taxi.

रोशन बसमधून खाली उतरतो आणि टॅक्सी घेण्याचा प्रयत्न करतो.

 • Roshan: (to the taxi driver) Will you come to Raheja Vihar? Do you know where it is?
 • रोशन: (टॅक्सी चालकाकडे) तुम्ही रहेजा विहारला येणार का? तुम्हाला माहित आहे ते कोठे आहे?
 • Taxi driver: I don’t know. Please guide me. I shall drive according to your suggestions
 • टॅक्सी चालक: मला माहित नाही. कृपया मला मार्गदर्शन करा. मी तुमच्या सूचनांनुसार गाडी चालवीन.
 • Roshan: Ok, I am new to this area. We shall ask someone.
 • रोशन: ठीक आहे, मी या क्षेत्रात नवीन आहे. आपण एखाद्याला विचारू.
 • Roshan: (to hawker) Excuse me, can you tell me how to reach Raheja Vihar?
 • रोशन: (फेरीवाल्यास) मला माफ करा, रहेजा विहारला कसे जायचे ते सांगु शकता का?
 • Hawker:  Go straight. After some time, you will see two ways, go to the left and then turn to the right. You will reach Raheja Vihar.
 • फेरीवाला: सरळ जा. थोड्या वेळाने, तुम्हाला दोन मार्ग दिसतील, डावीकडे जा आणि नंतर उजवीकडे वळा. तुम्ही रहेजा विहारला पोहोचाल.
 • Roshan: Ok, thank you for your help.
 • रोशन: ठीक आहे, तुमच्या मदतीबद्दल धन्यवाद.
 • Roshan : (to the taxi driver) Please stop. We reached our destination.
 • रोशन: (टॅक्सी चालकास) कृपया थांबा. आपण आपल्या मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचलो. ( गंतव्यस्थानावर पोहोचलो.)
 • Taxi driver: Ok
 • टॅक्सी चालक: ठीक आहे
 • Roshan: This is your fare, received it?
 • रोशन: हे तुमचे भाडे आहे, मिळाले का?
 • Taxi driver: Yes, Thank you.
 • टॅक्सी चालक: होय, धन्यवाद.

Back        Next