Selling

विक्री करणे

When we have to sell something, we have to convince the consumer to purchase.

जेव्हा आपल्याला काही विकायचे असते तेव्हा आपल्याला ग्राहकांना खरेदीसाठी पटवायचे (खात्री करून द्यायची ) असते.

Charwak is selling a Grammar book written by his grandfather.

चार्वाक त्याच्या आजोबांनी लिहिलेले व्याकरणाचे पुस्तक विकत आहे.

Have a look-

  • Charwak: Hello uncle, I have a nice book for you. Would you like to see it?
  • चार्वाक: हॅलो काका, माझ्याकडे तुमच्यासाठी एक छान पुस्तक आहे. तुम्हाला ते बघायला आवडेल का?
  • Consumer: No, I am not interested in any book. I have so many such books.
  • ग्राहक: नाही, मला कोणत्याही पुस्तकात रस नाही. माझ्याकडे अशी अनेक पुस्तके आहेत.
  • Charwak: It’s a Grammar book. I know you didn’t get such a type of book.
  • चार्वाक: हे व्याकरणाचे पुस्तक आहे. मला माहित आहे तुम्हाला अशा प्रकारचे पुस्तक मिळाले नाही.
  • Consumer: Ok, Grammar book, I would like to see.
  • ग्राहक: ठीक आहे, व्याकरणाचे पुस्तक, मला बघायला आवडेल.
  • Charwak: Yes, you can check this. You will not get this in the market.
  • चार्वाक: होय, तुम्ही हे पाहु शकता. तुम्हाला हे बाजारात मिळणार नाही.
  • Consumer: By the cover, it seems nice.
  • ग्राहकः मुखपृष्ठावरून ते छान वाटते.
  • Charwak: Yes, it is! You won’t get such a type of explanation in other books to learn English.
  • चार्वाक: होय, ते छानच आहे! इंग्रजी शिकण्यासाठी तुम्हाला इतर पुस्तकांमध्ये अशा प्रकारचे स्पष्टीकरण मिळणार नाही.
  • Consumer: (opens the book and reads) Oh, this is of a different style. Can I learn from this book?
  • ग्राहक: (पुस्तक उघडतो आणि वाचतो) अरे, हे वेगळ्या शैलीचे आहे. मी या पुस्तकातून शिकू शकतो का?
  • Charwak: Yes, this is useful for students, teachers, and parents also.
  • चार्वाक: होय, हे विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांसाठीही उपयुक्त आहे.
  • Consumer: Yes, an interesting and the best way to learn English. I can also explain this method to my children so that they can understand the lessons of their academic books.
  • ग्राहक: होय, इंग्रजी शिकण्याचा एक मनोरंजक आणि उत्तम मार्ग. मी ही पद्धत माझ्या मुलांनासुद्धा समजावुन सांगू शकेन जेणेकरून त्यांना त्यांच्या शैक्षणिक पुस्तकांचे धडे समजु शकतील.
  • Charwak: This is a unique system of learning English. Children also can get the grammar terms on their own by using this book.
  • चार्वाक: ही इंग्रजी शिकण्याची एक अनोखी प्रणाली आहे. या पुस्तकाचा वापर करून मुले देखील व्याकरणाच्या परिभाषा स्वतः शिकु शकतात.
  • Consumer: About what this table is?
  • ग्राहकः हा तक्ता कशाचा आहे?
  • Charwak: This table is of construction, how to construct a sentence. If you understand this technique, you can easily construct any sentence confidently on your own.
  • चार्वाक: हा तक्ता रचनेचा आहे, वाक्य रचना कशी करावी. जर आपल्याला हे तंत्र समजले तर तुम्ही स्वतःहून आत्मविश्वासाने सहजपणे कोणतेही वाक्य तयार करू शकता.
  • Consumer: Can I speak correctly and fluently by learning this system?
  • ग्राहकः ही प्रणाली शिकून मी योग्य आणि अस्खलितपणे बोलू शकतो?
  • Charwak: Yes, of course. Please see the first sentence, read it, and let me know how it is.
  • चार्वाक: होय, नक्कीच. कृपया पहिले वाक्य पहा, ते वाचा आणि ते कसे आहे ते मला सांगा.
  • Consumer: Oh, very easy! I understood without your help.
  • ग्राहक: अरे, खूप सोपे आहे! मला तुझ्या मदतीशिवाय समजलं.
  • Charwak: Yes, that’s why it’s unique.
  • चार्वाक: होय, म्हणुनच ते अद्वितीय आहे.
  • Consumer: What is the title of the book? I didn’t see it.
  • ग्राहकः पुस्तकाचे शिर्षक काय आहे? मी पाहिले नाही.
  • Charwak: The Unique System of Learning English
  • चार्वाक: इंग्रजी शिकण्याची अनोखी प्रणाली
  • Consumer: Who is the author of this book?
  • ग्राहक: या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
  • Charwak: Satyaranjan Kherde, my grandfather
  • चार्वाक: सत्यरंजन खेरडे, माझे आजोबा
  • Consumer: Oh, it means you are not a salesman.
  • ग्राहक: अरे, याचा अर्थ असा की तु विक्रेता नाहीस.
  • Charwak: No. My grandfather wishes that needy people should get his book.
  • चार्वाक: नाही. गरजु लोकांना त्यांचे पुस्तक मिळावे ही माझ्या आजोबांची इच्छा आहे.
  • Consumer: I can buy this. How much to pay?
  • ग्राहकः मी हे विकत घेऊ शकतो. किती द्यायचे?
  • Charwak: One hundred Rupees only
  • चार्वाक: शंभर रुपये फक्त
  • Consumer: It is also very cheap. (consumer pays) Have it.
  • ग्राहक: हे अगदी स्वस्त देखील आहे. (ग्राहक पैसे देतो) हे घे.
  • Charwak: Thank you. Have a good day.
  • चार्वाक: धन्यवाद. आपला दिवस चांगला जावो.
  • Consumer: My pleasure. You too
  • ग्राहक: खुशीने, तुलाही

Back        Next

Leave a Comment