Skip to content
'चे नाही' ची वाक्ये
- I decided not to speak with her during the yoga session. मी योग सत्रात तिच्याशी बोलायचे नाही असा निर्णय घेतला.
- He asked her sister not to go by that way. त्याने तिच्या बहिणीला त्या मार्गाने जायचे नाही म्हणून सांगितले.
- A teacher asked students not to use red ink on the answer sheet. शिक्षकाने विद्यार्थ्यांना उत्तर पत्रिकेत लाल शाई वापरू नका असे सांगितले.
- I told you several times not to drink water so fast. गटागटा पाणी पिऊ नये असे मी तुला कित्येकदा सांगितले.
- He advised her son not to copy the lessons. त्याने आपल्या मुलाला धड्यांची नक्कल करू नको असा सल्ला दिला.
- His mother told him not to make a noise. त्याच्या आईने त्याला गोंगाट करू नको असे सांगितले.
- She told us not to apply this ointment to the face. तिने आम्हाला हा मलम चेहऱ्याला लावायचा नाही असे सांगितले.
- He told her not to drive too fast on the express highway. त्याने तिला एक्स्प्रेस हायवेवर वेगाने गाडी चालवू नको असे सांगितले.
- My son promised me not to go out on these Covid pandemic days. माझ्या मुलाने मला या कोविड महामारीच्या दिवसात बाहेर न जाण्याचे आश्वासन दिले.
- I told him not to pay more for that chair. मी त्याला त्या खुर्चीसाठी जास्त पैसे न देण्याचे सांगितले.
- The doctor told a patient not to sit idle. डॉक्टरांनी रुग्णाला निष्क्रिय बसू नका असे सांगितले.
- He asked her not to quit her job in this situation. अशा परिस्थितीत त्याने तिला नोकरी सोडू नको असे सांगितले.
- She pleaded with her boss not to take action for her absence in the office. तिने तिच्या बॉसकडे कार्यालयात गैरहजर राहिल्याबद्दल कारवाई करू नये अशी विनंती केली.
- He ordered me not to make that entry in the register. त्यांनी मला नोंदणीपुस्तकात ती नोंद न करण्याचा आदेश दिला.
- She warned me not to enter the cabin without knocking. ठोठावल्याशिवाय केबिनमध्ये जाऊ नये असा इशारा तिने मला दिला.
- He took an oath not to quarrel with anyone. त्याने कोणाशीही भांडण करणार नाही अशी शपथ घेतली.
- Her husband told her not to buy a used car. तिच्या पतीने तिला वापरलेली गाडी न खरेदी करण्यास सांगितले.
- He decided not to smoke any more. त्याने यापुढे धूम्रपान न करण्याचा निर्णय घेतला.
- She thought not to speak to others on this topic. तिने या विषयावर इतरांशी न बोलण्याचा विचार केला.
- Be careful not to harm others. इतरांचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्या.
- She asked him not to speak an ill language with others. तिने त्याला इतरांशी ओंगळ भाषेत न बोलण्यास सांगितले.
- The doctor advised a patient not to eat too much sugar. डॉक्टरांनी रुग्णाला जास्त साखर न खाण्याचा सल्ला दिला.
- Sarita was trying not to break the glass bottle. सरिता काचेची बाटली फुटू नये यासाठी प्रयत्न करीत होती.
- Tom told his brother not to swim in the swimming pool at night. टॉमने आपल्या भावाला रात्री जलतरण तलावात न पोहण्यास सांगितले.
- Her mother warned her not to go shopping alone. तिच्या आईने तिला एकटे खरेदीस न जाण्याचा इशारा दिला.
- Saurabh decided not to go out on these sunny days. सौरभने या उन्हाच्या दिवसांत बाहेर न जाण्याचे ठरवले.
- She will take the permission of the principal not to work on the assignment. नेमून दिलेल्या कामगिरीवर काम न करण्यासाठी ती मुख्याध्यापकाची परवानगी घेईल.
- Jemini tried to persuade a shopkeeper not to decline the offer. जेमिनीने दुकानदाराला प्रस्ताव नाकारू नये म्हणून मन वळवण्याचा प्रयत्न केला.
- She decided not to borrow a home loan from a bank. तिने बँकेकडून गृहकर्ज न घेण्याचे ठरविले.
- She made it a rule not to watch crime shows anymore. तिने यापुढे गुन्हेगारी कार्यक्रम न पाहण्याचा नियम बनविला.
Back Next