Sentences with not to

'चे नाही' ची वाक्ये

  1. I decided not to speak with her during the yoga session.
    मी योग सत्रात तिच्याशी बोलायचे नाही असा निर्णय घेतला.
  2. He asked her sister not to go by that way.
    त्याने तिच्या बहिणीला त्या मार्गाने जायचे नाही म्हणून सांगितले.
  3. A teacher asked students not to use red ink on the answer sheet.
    शिक्षकाने विद्यार्थ्यांना उत्तर पत्रिकेत लाल शाई वापरू नका असे सांगितले.
  4. I told you several times not to drink water so fast.
    गटागटा पाणी पिऊ नये असे मी तुला कित्येकदा सांगितले.
  5. He advised her son not to copy the lessons.
    त्याने आपल्या मुलाला धड्यांची नक्कल करू नको असा सल्ला दिला.
  6. His mother told him not to make a noise.
    त्याच्या आईने त्याला गोंगाट करू नको असे सांगितले.
  7. She told us not to apply this ointment to the face.
    तिने आम्हाला हा मलम चेहऱ्याला लावायचा नाही असे सांगितले.
  8. He told her not to drive too fast on the express highway.
    त्याने तिला एक्स्प्रेस हायवेवर वेगाने गाडी चालवू नको असे सांगितले.
  9. My son promised me not to go out on these Covid pandemic days.
    माझ्या मुलाने मला या कोविड महामारीच्या दिवसात बाहेर न जाण्याचे आश्वासन दिले.
  10. I told him not to pay more for that chair.
    मी त्याला त्या खुर्चीसाठी जास्त पैसे न देण्याचे सांगितले.
  11. The doctor told a patient not to sit idle.
    डॉक्टरांनी रुग्णाला निष्क्रिय बसू नका असे सांगितले.
  12. He asked her not to quit her job in this situation.
    अशा परिस्थितीत त्याने तिला नोकरी सोडू नको असे सांगितले.
  13. She pleaded with her boss not to take action for her absence in the office.
    तिने तिच्या बॉसकडे कार्यालयात गैरहजर राहिल्याबद्दल कारवाई करू नये अशी विनंती केली.
  14. He ordered me not to make that entry in the register.
    त्यांनी मला नोंदणीपुस्तकात ती नोंद न करण्याचा आदेश दिला.
  15. She warned me not to enter the cabin without knocking.
    ठोठावल्याशिवाय केबिनमध्ये जाऊ नये असा इशारा तिने मला दिला.
  16. He took an oath not to quarrel with anyone.
    त्याने कोणाशीही भांडण करणार नाही अशी शपथ घेतली.
  17. Her husband told her not to buy a used car.
    तिच्या पतीने तिला वापरलेली गाडी न खरेदी करण्यास सांगितले.
  18. He decided not to smoke any more.
    त्याने यापुढे धूम्रपान न करण्याचा निर्णय घेतला.
  19. She thought not to speak to others on this topic.
    तिने या विषयावर इतरांशी न बोलण्याचा विचार केला.
  20. Be careful not to harm others.
    इतरांचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्या.
  21. She asked him not to speak an ill language with others.
    तिने त्याला इतरांशी ओंगळ भाषेत न बोलण्यास सांगितले.
  22. The doctor advised a patient not to eat too much sugar.
    डॉक्टरांनी रुग्णाला जास्त साखर न खाण्याचा सल्ला दिला.
  23. Sarita was trying not to break the glass bottle.
    सरिता काचेची बाटली फुटू नये यासाठी प्रयत्न करीत होती.
  24. Tom told his brother not to swim in the swimming pool at night.
    टॉमने आपल्या भावाला रात्री जलतरण तलावात न पोहण्यास सांगितले.
  25. Her mother warned her not to go shopping alone.
    तिच्या आईने तिला एकटे खरेदीस न जाण्याचा इशारा दिला.
  26. Saurabh decided not to go out on these sunny days.
    सौरभने या उन्हाच्या दिवसांत बाहेर न जाण्याचे ठरवले.
  27. She will take the permission of the principal not to work on the assignment.
    नेमून दिलेल्या  कामगिरीवर  काम न करण्यासाठी ती मुख्याध्यापकाची परवानगी घेईल.
  28. Jemini tried to persuade a shopkeeper not to decline the offer.
    जेमिनीने दुकानदाराला प्रस्ताव नाकारू नये म्हणून मन वळवण्याचा प्रयत्न केला.
  29. She decided not to borrow a home loan from a bank.
    तिने बँकेकडून गृहकर्ज न घेण्याचे ठरविले.
  30. She made it a rule not to watch crime shows anymore.
    तिने यापुढे गुन्हेगारी कार्यक्रम न पाहण्याचा नियम बनविला.

Back        Next