Skip to content
'टेक' ची वाक्ये
- Take him to the garden. त्याला बागेत घेऊन जा.
- She took her boss to the river and showed her the actual situation of the river water.तिने तिच्या बॉसला नदीकडे नेले आणि त्यांना नदीच्या पाण्याची वास्तविक परिस्थिती दाखविली.
- My uncle took my mother’s gold necklace, so my mother is angry with him. माझ्या काकांनी माझ्या आईचा सोन्याचा हार घेतला, म्हणून आई त्यांच्यावर रागावली आहे.
- Nowadays all shops take debit cards. आजकाल सर्व दुकाने डेबिट कार्ड स्विकारतात.
- Why don’t you take his offer? आपण त्याचा प्रस्ताव का स्विकारत नाही?
- I take a pinch of salt in my salad. मी माझ्या कोशिंबीरमध्ये एक चिमूटभर मीठ घेतो.
- It took me four days to clean the complete house. पूर्ण घर साफ करण्यास मला चार दिवस लागले.
- It takes more than one hour to get to Church gate from here.येथून चर्चगेटपर्यंत जाण्यास एका तासापेक्षा जास्त वेळ लागतो.
- How much time does it take to get from the bus stop to the station? बसस्थानकापासुन स्टेशनवर जाण्यासाठी किती वेळ लागतो?
- Take your time, and submit a fair copy of it in the office. आपला वेळ घ्या आणि त्याची सुवाच्य प्रत ऑफिसमध्ये जमा करा.
- An accident with a bike and a bus took place yesterday evening. काल संध्याकाळी दुचाकी व बसचा अपघात झाला.
- The medicine took effect within half an hour, and he felt much better. अर्ध्या तासाच्या आत औषधाचा प्रभाव पडला आणि त्याला बरे वाटले.
- The plane for Delhi took off at seven o’clock. दिल्लीसाठी विमानाने सात वाजता उड्डाण केले.
- My son went on a trip, and he really took to Himachal Pradesh. माझा मुलगा सहलीला गेला, आणि त्याला खरोखर हिमाचल प्रदेश आवडला.
- He thought he should take up exercising every day. त्याला वाटले की त्याने दररोज व्यायाम करायला हवा.
- He changed all the strategies after taking over the company. कंपनीची सूत्रे हाती घेतल्यानंतर त्याने सर्व नीती बदलल्या.
- She takes a bath right after she gets up in the morning. ती सकाळी उठल्यानंतर लगेच आंघोळ करते.
- He is taking a rest in his room. तो त्याच्या खोलीत विश्रांती घेत आहे.
- He doesn’t take care of his pets. तो आपल्या पाळीव प्राण्यांची काळजी घेत नाही.
- He took responsibility for his brother and mother. त्याने आपल्या भावाची आणि आईची जबाबदारी घेतली.
- It will be suitable for you to take a taxi. तुमच्यासाठी टॅक्सी करणे योग्य राहील.
- She knows well which way to take. कोणत्या रस्त्याने जायचे हे तिला चांगले ठाऊक आहे.
- We should always take our work easy. आपण आपले काम नेहमी सहज घेतले पाहिजे.
- She couldn’t take eyes off that jewelry. ति दागिन्यांवरून नजर हटवू शकली नाही.
- He took her mother’s age into account and decided not to go far from home. त्याने तिच्या आईचे वय विचारात घेतले आणि घराबाहेर न जाण्याचा निर्णय घेतला.
- Take off your hat. It seems weird on you. तुमची टोपी काढा. ती तुम्हाला विचित्र दिसते.
- I can’t take it anymore. मी आता आणखी सहन करू शकत नाही.
- She couldn’t take the pains of radiation therapy while she was receiving it. उत्सर्जित किरण उपचार घेत असताना ति त्याच्या वेदना सहन करू शकली नाही.
- He sent a person with an employee to take away his authority. त्याने एका व्यक्तीस कर्मचाऱ्याबरोबर त्याचा अधिकार काढून घेण्यासाठी पाठविले.
- He wanted to take her away from her mother. त्याला तिला तिच्या आईपासून तोडायचे होते.
Back Next