Sentences with ‘Take’

'टेक' ची वाक्ये

  • Take him to the garden.
    त्याला बागेत घेऊन जा.
  • She took her boss to the river and showed her the actual situation of the river water.
    तिने तिच्या बॉसला नदीकडे नेले आणि त्यांना नदीच्या पाण्याची वास्तविक परिस्थिती दाखविली.
  • My uncle took my mother’s gold necklace, so my mother is angry with him.
    माझ्या काकांनी माझ्या आईचा सोन्याचा हार घेतला, म्हणून आई त्यांच्यावर रागावली आहे.
  • Nowadays all shops take debit cards.
    आजकाल सर्व दुकाने डेबिट कार्ड स्विकारतात.
  • Why don’t you take his offer?
    आपण त्याचा प्रस्ताव का स्विकारत नाही?
  • I take a pinch of salt in my salad.
    मी माझ्या कोशिंबीरमध्ये एक चिमूटभर मीठ घेतो.
  • It took me four days to clean the complete house.
    पूर्ण घर साफ करण्यास मला चार दिवस लागले.
  • It takes more than one hour to get to Church gate from here.
    येथून चर्चगेटपर्यंत जाण्यास एका तासापेक्षा जास्त वेळ लागतो.
  • How much time does it take to get from the bus stop to the station?
    बसस्थानकापासुन स्टेशनवर जाण्यासाठी किती वेळ लागतो?
  • Take your time, and submit a fair copy of it in the office.
    आपला वेळ घ्या आणि त्याची सुवाच्य प्रत ऑफिसमध्ये जमा करा.
  • An accident with a bike and a bus took place yesterday evening.
    काल संध्याकाळी दुचाकी व बसचा अपघात झाला.
  • The medicine took effect within half an hour, and he felt much better.
    अर्ध्या तासाच्या आत औषधाचा प्रभाव पडला आणि त्याला बरे वाटले.
  • The plane for Delhi took off at seven o’clock.
    दिल्लीसाठी विमानाने सात वाजता उड्डाण केले.
  • My son went on a trip, and he really took to Himachal Pradesh.
    माझा मुलगा सहलीला गेला, आणि त्याला खरोखर हिमाचल प्रदेश आवडला.
  • He thought he should take up exercising every day.
    त्याला वाटले की त्याने दररोज व्यायाम करायला हवा.
  • He changed all the strategies after taking over the company.
    कंपनीची सूत्रे हाती घेतल्यानंतर त्याने सर्व नीती बदलल्या.
  • She takes a bath right after she gets up in the morning.
    ती सकाळी उठल्यानंतर लगेच आंघोळ करते.
  • He is taking a rest in his room.
    तो त्याच्या खोलीत विश्रांती घेत आहे.
  • He doesn’t take care of his pets.
    तो आपल्या पाळीव प्राण्यांची काळजी घेत नाही.
  • He took responsibility for his brother and mother.
    त्याने आपल्या भावाची आणि आईची जबाबदारी घेतली.
  • It will be suitable for you to take a taxi.
    तुमच्यासाठी टॅक्सी करणे योग्य राहील.
  • She knows well which way to take.
    कोणत्या रस्त्याने जायचे हे तिला चांगले ठाऊक आहे.
  • We should always take our work easy.
    आपण आपले काम नेहमी सहज घेतले पाहिजे.
  • She couldn’t take eyes off that jewelry.
    ति दागिन्यांवरून नजर हटवू शकली नाही.
  • He took her mother’s age into account and decided not to go far from home.
    त्याने तिच्या आईचे वय विचारात घेतले आणि घराबाहेर न जाण्याचा निर्णय घेतला.
  • Take off your hat. It seems weird on you.
    तुमची टोपी काढा. ती तुम्हाला विचित्र दिसते.
  • I can’t take it anymore.
    मी आता आणखी सहन करू शकत नाही.
  • She couldn’t take the pains of radiation therapy while she was receiving it.
     उत्सर्जित किरण उपचार घेत असताना ति त्याच्या वेदना सहन करू शकली नाही.
  • He sent a person with an employee to take away his authority.
    Error occurred when trying to fetch the file using wp_remote_get(). cURL error 35: Recv failure: Connection reset by peer
    त्याने एका व्यक्तीस कर्मचाऱ्याबरोबर त्याचा अधिकार काढून घेण्यासाठी पाठविले.
  • He wanted to take her away from her mother.
    त्याला तिला तिच्या आईपासून तोडायचे होते.

Back        Next