Use of Was

होता/ होती (वॉज) चा उपयोग

Was (वॉज )हे (to be) ‘असणे’ या क्रियापदाचे भूतकाळी रूप आहे.

आपण ‘होता/ होती'  (was) साध्या वाक्यांत मी, तो, ती, ते किंवा तृतीय व्यक्तीच्या एकवचनी कर्त्यासह वापरू शकतो.

चला 'was' कसा वापरायचा ते पाहू.

Formation of a sentence

वाक्याची रचना

 • Subject (I/he/ she/ it/ any singular noun) + was + remaining words
 • कर्ता (मी, तो / ती / ते/ अन्य तृतीय एकवचनी नाम ) + होता/ होती  + उर्वरित शब्द

आपण was चा वापर भूतकाळातील -

 •  स्थिती
 • व्यवसाय
 • शारीरिक परिस्थिती
 • सतत ची क्रिया

सांगण्यासाठी करू शकतो.

आता आपण वाक्यातील 'was' च्या वापराबद्दल चर्चा करू.

 भूतकाळातील स्थितीबद्दल सांगणे

येथे काही उदाहरणे आहेत.

एक नजर टाका-

 1. He was a peaceful person.
  तो एक शांत व्यक्ती होता.
 2. Sameer was present.
  समीर उपस्थित होता.
 3. She was very happy.
  ती खूप आनंदी होती.
 4. He was extremely sorry.
  त्याला अत्यंत खेद होता.
 5. My brother was surprised.
  माझा भाऊ आश्चर्यचकित झालेला होता.
 6. Her sister was sad.
  तिची बहीण दुःखी होती.
 7. She was thirsty.
    ती तहानलेली होती.
 8. He was frightened.
  तो  घाबरलेला होता.
 9. She was eighteen years old.
  ती अठरा वर्षांची होती.
 10. Nayana was seventeen.
  नयना सतरा वर्षांची होती.
 11.                      More

Next