‘वअ/वअर’: स्थितीबद्दल नकारात्मक उत्तरे
या धड्यात आपण ‘वअ/वअर’ वापरून स्थितीबद्दल नकारात्मक वाक्यात उत्तर कसे द्यावे हे पाहू.
नकारात्मक उत्तराची रचना
नकारात्मक उत्तराची रचना अशी आहे;
- No, + subject (we/you/they) + were not + remaining words.
- नाही, + कर्ता (आम्ही /तू /तूम्ही/ ते/कोणतेही अनेकवचनी नाम ) + नव्हतो/ नव्हता /नव्हती/ नव्हते + उर्वरित शब्द.
किंवा थोडक्यात उत्तर देण्यासाठी आपण फक्त-
- No, + subject + weren’t.
- नाही, + कर्ता + नव्हतो/ नव्हता /नव्हती/ नव्हते
असे म्हणू शकतो.
येथे काही उदाहरणे आहेत. रचना वरीलप्रमाणे आहे.
एक नजर टाका–
- No, we were not students. नाही, आम्ही विद्यार्थी नव्हतो. (No, we weren’t.)
- No, you were not a student. नाही, तु विद्यार्थी नव्हतास. (No, you weren’t.)
- No, you were not the students. नाही, तुम्ही विद्यार्थी नव्हता. (No, you weren’t.)
- No, they were not students. नाही, ते विद्यार्थी नव्हते. (No, they weren’t.)
- No, his sisters were not very sad.नाही, त्याच्या बहिणी खूप दुःखी नव्हत्या.(No, they weren’t.)
- No, the boys were not pleased. नाही, मुले खूश नव्हती. (No, they weren’t.)
- No, they were not creative. नाही,ते सर्जनशील नव्हते. (No, they weren’t.)
- No, you were not tired. नाही, तुम्ही थकलेले नव्हता. (No, you weren’t.)
- No, we were not tired. नाही, आम्ही थकलेलो नव्हतो. (No, we weren’t.)
- No, they were not happy. नाही, ते आनंदी नव्हते. (No, they weren’t.)
- No, her siblings were not happy. नाही, तिचे भावंड आनंदी नव्हते. (No, they weren’t.)
- No, they were not surprised. नाही, ते आश्चर्यचकित झालेले नव्हते. (No, they weren’t.)
- No, we were not a family. नाही, आपण /आम्ही कुटुंब नव्हतो. (No, we weren’t.)
- No, we were not extremely sorry. नाही, आम्हाला अत्यंत खेद नव्हता. (No, we weren’t.)
- No, they were not liars. नाही, ते खोटे बोलणारे नव्हते. (No, they weren’t.)
- No, the girls were not beautiful. नाही, मुली सुंदर नव्हत्या. (No, they weren’t.)
- No, we were not thirsty. नाही, आम्ही तहानलेलो नव्हतो. (No, we weren’t.)
- No, the students were not well dressed. नाही, विद्यार्थी चांगल्या कपड्यात नव्हते.(No, they weren’t.)
- No, we were not hungry.नाही, आम्ही भुकेले नव्हतो. (No, we weren’t.)
- No, you were not ten years old. नाही, तु दहा वर्षांचा नव्हतास. / नाही, आपण दहा वर्षांचे नव्हता. (No, you weren’t.)
- No, they were not on time.नाही, ते वेळेवर नव्हते. (No, they weren’t.)
- No, you were not wrong. नाही, तुझे चूक नव्हते. (No, you weren’t.)
- No, they were not joyful. नाही, ते आनंदित नव्हते. (No, they weren’t.)
- No, they were not superstitious. नाही, ते अंधश्रद्धाळू नव्हते. (No, they weren’t.)
- No, we were not innocent. नाही, आम्ही निर्दोष / निष्पाप नव्हतो. (No, we weren’t.)
- No, you were not smart.नाही, तुम्ही हुशार नव्हता. (No, you weren’t.)
- No, they were not rude. नाही, ते उद्धट नव्हते. (No, they weren’t.)
- No, they were not frightened. नाही, ते घाबरलेले नव्हते. (No, they weren’t.)
- No, we were not polite. नाही, आम्ही सभ्य नव्हतो. (No, we weren’t.)
- No, all servants were not loyal. नाही, सर्व सेवक निष्ठावान नव्हते. (No, they weren’t.)