प्रश्न विचारण्यासाठी will 'करील/ करेन ' चा वापर
भविष्यात काहीतरी करण्याची इच्छा विचारण्यासाठी तू/ तूम्ही तो/ ती/ ते / अन्य एकवचनी किंवा अनेकवचनी नामासह ' वील' वापरले जाते.
या वाक्याची रचना अशी आहे;
- Will + he / she/ it/ they / any subject + base form of verb + remaining words + question mark (?)
- (Will) करेन/ असेल + कर्ता (तू/ तूम्ही तो/ ती/ ते / अन्य एकवचनी किंवा अनेकवचनी) + क्रियापदाचे मूलभूत रूप+ उर्वरित शब्द+ ?
येथे काही उदाहरणे आहेत. रचना वरीलप्रमाणे आहे.
एक नजर टाका-
- Will he go to the market?तो बाजारात जाईल का?
- Will she cook sweets for us?ती आमच्यासाठी मिठाई बनवेल का?
- Will they come on Monday?ते सोमवारी येतील का?
- Will it eat an apple?ते सफरचंद खाईल का?
- Will Anil solve an exercise in English?अनिल इंग्रजीतील सराव सोडवेल का?
- Will Gaurav play on the ground?गौरव मैदानावर खेळेल का?
- Will my parents go for a walk in the evening?माझे पालक संध्याकाळी फिरायला जातील का?
- Will Shamali study in the college library?शामली महाविद्यालयाच्या ग्रंथालयात अभ्यास करेल का?
- Will she work hard to achieve her goal?ती आपले लक्ष्य साध्य करण्यासाठी परिश्रम घेईल का?
- Will students watch an airstrike documentary?विद्यार्थी हवाई हल्ल्याचा माहितीपट पाहतील का?
- Will you buy a book for me?तू माझ्यासाठी पुस्तक विकत घेशिल का?
- Will they collect stamps?ते शिक्के गोळा करतील का?
- Will Amruta write a story of a genius country boy?अमृता खेड्यातिल एका अलौकिक बुद्धिमान मुलाची कथा लिहील का?
- Will a cleaner clean our house tomorrow?सफाई कामगार उद्या आमचे घर स्वच्छ करेल का?
- Will she inquire about the bus?ती बसबद्दल विचारपूस करेल का?
- Will my mother purchase some green groceries?माझी आई काही भाज्या खरेदी करेल का?
- Will Sameer go by bus to his home town?समीर बसने आपल्या गावी जाईल का?
- Will they read this magazine?ते हे मासिक वाचतील का?
- Will students have fun on a trip?सहलीत विद्यार्थ्यांना मजा येइल का?
- Will she have her own house?तिचे स्वतःचे घर असेल का?
- Will he send you a message?तो तुम्हाला एक संदेश पाठवेल का?
- Will his brother receive him at the airport?त्याचा भाऊ विमानतळावर त्याला घ्यायला जाइल का?
- Will Smita reach there by 10 o’clock?Requested file could not be found (error code 404). Verify the file URL specified in the shortcode.स्मिता तेथे १० वाजेपर्यंत पोहोचेल का?
- Will her father solve that issue early?तिचे वडील लवकर हा प्रश्न सोडवतील का?
- Will Chetan watch a cartoon movie?चेतन हास्यचित्रपट पाहिल का?
- Will Karan plan to go out next week?करण पुढच्या आठवड्यात बाहेर जाण्याची योजना करेल का?
- Will you observe the lane?तूम्ही रस्त्याचे नियम पाळाल का?
- Will they communicate with each other?ते एकमेकांशी संवाद साधतील का?
- Will you drink hot water in the morning?तुम्ही सकाळी गरम पाणी प्याल का?
- Will his mother save some money for the tour?त्याचि आई दौर्यासाठी काही पैसे वाचवेल का?