Use of ‘will’ in Negative Sentences

नकारात्मक वाक्यांमध्ये  विल (will) चा वापर

भविष्यात काहीतरी न करण्याची इच्छा व्यक्त करण्यासाठी तो, ती बरोबर आणि ‘मी’ व ‘आम्ही’ व्यतिरिक्त अन्य कर्त्याबरोबर ' विल' वापरले जाते.

वाक्याची रचना

या वाक्यात, will सह not वापरला जातो.

या वाक्याची रचना अशी आहे;

 • Subject (you/he/ she / it/ they /any subject) + will not + base form of verb + remaining words
 • कर्ता (तू /तूम्ही/तो / ती / ते / कोणताही एकवचनी किंवा अनेकवचनी ) + विल नॉट+ क्रियापदाचे मूळ रुप+ उर्वरित शब्द

येथे काही उदाहरणे दिली आहेत. रचना वरीलप्रमाणे आहे.

एक नजर टाका-

 1. He will not go to the market.
  तो बाजारात जाणार नाही.
 2. She will not cook sweets for us.
  ती आमच्यासाठी मिठाई बनवणार नाही.
 3. They will not come on Monday.
  ते सोमवारी येणार नाहीत.
 4. It will not eat an apple.
  ते एक सफरचंद खाणार नाही.
 5. Anil will not solve an exercise in English.
  अनिल इंग्रजीतील एक सराव सोडवणार नाही.
 6. Gaurav will not play on the ground.
  गौरव मैदानावर खेळणार नाही.
 7. My parents will not go for a walk in the evening.
  माझे पालक संध्याकाळी फिरायला जाणार नाहीत.
 8. Shamali will not study in the college library.
  शामली महाविद्यालयाच्या ग्रंथालयात अभ्यास करणार नाही.
 9. She will not work hard to achieve her goal.
  ती आपले लक्ष्य साध्य करण्यासाठी परिश्रम घेणार नाही.
 10. Students will not watch an airstrike documentary.
  विद्यार्थी हवाई हल्ल्याचा माहितीपट पाहणार नाहीत.
 11. You will not buy a book for me.
  तू माझ्यासाठी पुस्तक विकत घेणार नाही.
 12. They will not collect stamps.
  ते शिक्के गोळा करणार नाहीत.
 13. Amruta will not write a story of a genius country boy.
  अमृता खेड्यातिल  एका अलौकिक बुद्धिमान मुलाची कथा लिहीणार नाही.
 14. A cleaner will not clean our house tomorrow.
  सफाई कामगार उद्या आमचे घर स्वच्छ करणार नाही.
 15. She will not inquire about the bus.
  ती बसबद्दल विचारपूस करणार नाही.
 16. My mother will not purchase some vegetables.
  माझी आई काही भाज्या खरेदी करणार नाही.
 17. Sameer will not go by bus to his home town.
  समीर बसने आपल्या गावी जाणार नाही.
 18. They will not read this magazine.
  ते हे मासिक वाचणार नाहीत.
 19. Students will not have fun on a trip.
  सहलीत विद्यार्थ्यांना मजा येणार नाही.
 20. She will not have her own house.
  तिचे स्वतःचे घर असणार नाही.
 21. He will not send you a message.
  तो तुम्हाला संदेश पाठवणार नाही.
 22. His brother will not receive him at the airport.
  त्याचा भाऊ विमानतळावर त्याला घ्यायला जाणार नाही.
 23. Smita will not reach there by 10 o’clock.
  Requested file could not be found (error code 404). Verify the file URL specified in the shortcode.
  स्मिता तेथे १० वाजेपर्यंत पोहोचणार नाही.
 24. Her father will not solve that issue early.
  तिचे वडील लवकर हा प्रश्न सोडवणार नाहीत.
 25. Chetan will not watch a cartoon movie.
  चेतन हास्यचित्रपट पाहणार नाही.
 26. Karan will not plan to go out next week.
  करण पुढच्या आठवड्यात बाहेर जाण्याची योजना करणार नाही.
 27. You will not observe the lane.
  तूम्ही रस्त्याचे नियम पाळणार नाही.
 28. They will not communicate with each other.
   ते एकमेकांशी संवाद साधणार नाहीत.
 29. You will not drink hot water in the morning.
  तुम्ही सकाळी गरम पाणी पिणार नाही.
 30. His mother will not save some money for the tour.
  त्याचि आई दौर्‍यासाठी काही पैसे वाचवणार नाही.

   Back          Next