अभ्यासाबद्दल
- In which college are you? तुम्ही कोणत्या महाविद्यालयात आहात?
- William’s college at Andheri अंधेरी येथिल विल्यमचे महाविद्यालय
- I had been in that college for three years. मी त्या महाविद्यालयात तीन वर्षे होते.
- How many subjects do you have?तुम्हाला किती विषय आहेत?
- I have six subjects. मला सहा विषय आहेत.
- Your handwriting is good. तुमचे हस्ताक्षर चांगले आहे.
- He is also good at drawing. तो चित्र काढण्यातही चांगला आहे.
- She is a good student. ती चांगली विद्यार्थीनी आहे.
- She has got a distinction in Mathematics.तिला गणितामध्ये प्राविण्य प्राप्त झाले आहे.
- In which standard is she?ती कोणत्या इयत्तेत आहे?
- She is senior to me by two years. ती माझ्यापेक्षा दोन इयत्ता पुढे आहे.
- He is weak in Mathematics.तो गणितामध्ये कच्चा आहे.
- But I am good at Biology. पण मी जीवशास्त्रात चांगला आहे.
- She has an interest in physics. तिला भौतिकशास्त्रात रस आहे.
- She scores more than ninety in physics. ति भौतिकशास्त्रामध्ये नव्वदपेक्षा जास्त गुण मिळवते.
- But other subjects are also important. पण इतर विषयही महत्त्वाचे आहेत.
- Have you got your examination time table? तुम्हाला तुमच्या परीक्षेचे वेळापत्रक मिळाले आहे का?
- No, we shall get it tomorrow. नाही, आम्हाला ते उद्या मिळणार आहे.
- So, how is your preparation? मग, तुमची तयारी कशी आहे?
- I’ll definitely get through it with good marks. Requested file could not be found (error code 404). Verify the file URL specified in the shortcode.मी त्यात नक्कीच चांगल्या गुणांसह पास होइल.
- Will you become a graduate this year? तुम्ही या वर्षी पदवीधर होणार का?
- Yes, of course!हो नक्कीच!
- The students will get the result after one week. विद्यार्थ्यांना एका आठवड्यानंतर निकाल मिळेल.
- Our college will be closed from tomorrow.उद्यापासून आमचे कॉलेज बंद असेल.
- You have passed the examination.तुम्ही परीक्षा उत्तीर्ण झाला आहात.
- The new timetable comes into force in June. नवीन वेळापत्रक जुनपासून अस्तित्वात येते.
- Keep this book with you. हे पुस्तक तुमच्याकडे ठेवा.
- And I gift you this pen.आणि हा पेन मी तुम्हाला बक्षीस देते.
- Which ink do you prefer to use? तुम्ही कोणती शाई वापरणे पसंत करता?
- I use a pen with blue ink. मी निळ्या शाईचा पेन वापरते.
- This pen has blue ink. या पेनमध्ये निळी शाई आहे.
- Thank you very much! खूप खूप धन्यवाद!