Use of Is: Questions about State of Being

इज चा वापरः स्थितीबद्दल प्रश्न

आता आपण इज चा वापर करुन प्रश्न कसा तयार करावा ते पाहू.

प्रश्नाची रचना

प्रश्न विचारण्यासाठी च्या वाक्याची रचना अशी आहे;

  • Is + subject + remaining words+ question mark(?)
  • आहे (is)  + कर्ता (तो / ती / ते/ अन्य एकवचन संज्ञा)  + उर्वरित शब्द + प्रश्न चिन्ह (?)

येथे काही उदाहरणे आहेत.रचना वरीलप्रमाणे आहे.

चला एक नजर टाकूया-

  1. Is she a girl? 
     
    ती मुलगी आहे का?
  2. Is he a boy? 
     
    तो मुलगा आहे का?
  3. Is Sarika happy? 
     
    सारिका आनंदी आहे का?
  4. Is Balu so tired?
    बालू खूप थकले आहे का?
  5. Is she bored? 
      
    ती कंटाळलेली आहे का?
  6. Is he a peaceful person? 
     
    तो एक शांत मनुष्य आहे का?
  7. Is Sameer present?
     
    समीर उपस्थित आहे का?
  8. Is she so happy? 
    ती खूप आनंदी आहे का?
  9. Is he extremely sorry? 
     
    त्याला अत्यंत खेद आहे का?
  10. Is my brother surprised? 
     
    माझा भाऊ आश्चर्यचकित झालाआहे का?
  11. Is her sister sad? 
     
    तिची बहीण दुःखी आहे का?
  12. Is she thirsty?
     
    ती तहानलेली आहे का?
  13. Is he frightened? 
     
    तो घाबरलेला आहे का?
  14. Is she eighteen years old? 
     
    ती अठरा वर्षांची आहे का?
  15. Is Nayana seventeen? 
     
    नैना सतरा वर्षांची आहे का?
  16. Is he an older person? 
    तो एक वृद्ध व्यक्ती आहे का?
  17. Is the teacher angry? 
    शिक्षक रागावलेले आहेत का?
  18. Is he mischievous? 
     
    तो खोडकर आहे का?
  19. Is his father a tragic person? 
     
     त्याचे वडील त्रासदायक व्यक्ती आहेत का?
  20. Is her mother superstitious? 
     
    तिची आई अंधश्रद्धाळू आहे का?
  21. Is she innocent? 
     
    ती निर्दोष आहे का?
  22. Is Saumya helpful? 
     
    सौम्या मदतशील आहे का?
  23. Is he active? 
     
    तो सक्रिय आहे का?
  24. Is she helpful? 
    ती खूप मदतशील आहे का?
  25. Is Anand talented? 
     
    आनंद प्रतिभावान आहे का?
  26. Is he handsome? 
     
    तो देखणा आहे का?
  27. Is she adamant? 
     
    ती हट्टी का?
  28. Is the motorman very cautious? 
    आगगाडीचा चालक अतिशय सावध आहे का?
  29. Is he a comic person? 
     
    तो एक विनोदी व्यक्ती आहे का?
  30. Is Sameer a loyal person? 
     
    समीर एक निष्ठावंत व्यक्ती आहे का?

BACK                                         NEXT