'होतो/ होता/ होती/होते' (were) चा वापर
Were हे (to be) ‘असणे’ या क्रियापदाचे भूतकाळातील रूप आहे.
चला ‘वअ/वअर’ (were)कसा वापरायचा ते पाहू.
'होता/ होते' चा वापर साध्या वाक्यांत-
- 'आम्ही' (प्रथम व्यक्ती अनेकवचनी संख्या),
- 'तू /तूम्ही' (द्वितीय व्यक्ती एकवचनी संख्या तसेच अनेकवचनी संख्या)
- 'ते' (तो, ती आणि ते चे अनेकवचन) ,
- हे, ते किंवा कोणताही अनेकवचनी नाम असलेला कर्ता
यासह केला जातो.
आपण 'were' भूतकाळातील -
- अस्तित्वाची स्थिती
- व्यवसाय
- शारीरिक परिस्थिती
- चालू क्रिया
सांगण्यासाठी वापरु शकतो
भूतकाळातील स्थितीबद्दल सांगण्यासाठी were ‘होता/ होते' चा वापर
वाक्याची रचना
- Subject (we/you/they/ any other plural noun)+ were + remaining words
- कर्ता (आम्ही /तू /तूम्ही/ ते/ या /त्या/ कोणतेही अनेकवचनी नाम ) + were ‘होता/होती/ होते' + उर्वरित शब्द
येथे काही उदाहरणे आहेत. रचना वरीलप्रमाणे आहे.
एक नजर टाका-
- We were students.आम्ही विद्यार्थी होतो.
- You were a student.तु विद्यार्थी होतास.
- You were the students.तुम्ही विद्यार्थी होता.
- They were students.ते विद्यार्थी होते.
- His sisters were very sad.त्याच्या बहिणी खूप दुःखी होत्या.
- The boys were pleased.मुले खूश होती.
- They were creative.ते सर्जनशील होते.
- You were tired.तुम्ही थकलेले होता.
- We were tired.आम्ही थकलेलो होतो.
- They were happy.ते आनंदी होते.
- Her siblings were happy.तिचे भावंड आनंदी होते.
- They were surprised.ते आश्चर्यचकित झालेले होते.
- We were a family.आपण /आम्ही कुटुंब होतो.
- We were extremely sorry.आम्हाला अत्यंत खेद होता.
- They were liars.ते खोटे बोलणारे होते.
- The girls were beautiful.मुली सुंदर होत्या.
- We were thirsty.आम्ही तहानलेलो होतो.
- The students were well dressed.विद्यार्थी चांगल्या कपड्यात होते.
- We were hungry.आम्ही भुकेलेलो होतो.
- You were ten years old.तु दहा वर्षांचा होतास./ तुम्ही दहा वर्षांचे होता.
- They were on time.ते वेळेवर होते.
- You were wrong.तुझे चूक होते.
- They were joyful.ते आनंदित होते.
- They were superstitious.ते अंधश्रद्धाळू होते.
- We were innocent.आम्ही निर्दोष / निष्पाप होतो.
- You were smart.तुम्ही हुशार होता.
- They were rude.ते उद्धट होते.
- They were frightened.ते घाबरलेले होते.
- We were polite.आम्ही सभ्य होतो.
- All servants were loyal.सर्व सेवक निष्ठावान होते.