विल (करील/ असेन/ होईल): सकारात्मक उत्तरे
ही सकारात्मक उत्तरे आहेत.
भविष्यात काहीतरी क्रिया करण्या विषयीच्या सकारात्मक उत्तरामध्ये (will) विल चा वापर खालिलप्रमाणे असतो.
वाक्यरचना
या वाक्याची रचना अशी आहे;
- Yes, + you/he/ she / it/ they/ any singular or plural subject + will + base form of a verb+ remaining words.
- होय, + कर्ता (मी / आम्ही) + (will ) करेन (करणार/ असणार/ होणार) + क्रियापदाचे मूळ रूप+ उर्वरित शब्द.
येथे काही उदाहरणे आहेत. रचना वरीलप्रमाणे आहे.
चला एक नजर टाकूया-
- Yes, he will go to the market.होय, तो बाजारात जाईल.
- Yes, she will cook sweets for us.होय,ती आमच्यासाठी मिठाई बनवेल.
- Yes, they will come on Monday.होय, ते सोमवारी येतील.
- Yes, it will eat an apple.होय, ते एक सफरचंद खाईल.
- Yes, Anil will solve an exercise in English.होय,अनिल इंग्रजीतील एक सराव सोडवेल.
- Yes, Gaurav will play on the ground.होय,गौरव मैदानावर खेळेल.
- Yes, my parents will go for a walk in the evening.होय, माझे पालक संध्याकाळी फिरायला जातील.
- Yes, Shamali will study in the college library.होय, शामली महाविद्यालयाच्या ग्रंथालयात अभ्यास करेल.
- Yes, she will work hard to achieve her goal.होय, ती आपले लक्ष्य साध्य करण्यासाठी परिश्रम घेईल.
- Yes, students will watch an air strike documentary.होय, विद्यार्थी हवाई हल्ल्याचा माहितीपट पाहतील.
- Yes, you will buy a book for me.होय, तू माझ्यासाठी पुस्तक विकत घेशिल.
- Yes, they will collect stamps.होय, ते शिक्के गोळा करतील.
- Yes, Amruta will write a story of a genius country boy.होय, अमृता खेड्यातिल एका अलौकिक बुद्धिमान मुलाची कथा लिहील.
- Yes, a cleaner will clean our house tomorrow.होय, सफाई कामगार उद्या आमचे घर स्वच्छ करेल.
- Yes, she will inquire about the bus.होय, ती बसबद्दल विचारपूस करेल.
- Yes, my mother will purchase some vegetables.होय, माझी आई काही भाज्या खरेदी करेल.
- Yes, Sameer will go by bus to his home town.होय, समीर बसने आपल्या गावी जाईल.
- Yes, they will read this magazine.होय, ते हे मासिक वाचतील.
- Yes, students will have fun on a trip.होय, सहलीत विद्यार्थ्यांना मजा येइल.
- Yes, she will have her own house.होय, तिचे स्वतःचे घर असेल.
- Yes, he will send you a message.होय, तो तुम्हाला एक संदेश पाठवेल.
- Yes, his brother will receive him at the airport.होय, त्याचा भाऊ विमानतळावर त्याला घ्यायला जाइल.
- Yes, Smita will reach there by 10 o’clock.Requested file could not be found (error code 404). Verify the file URL specified in the shortcode.होय, स्मिता तेथे १० वाजेपर्यंत पोहोचेल.
- Yes, her father will solve that issue early.होय, तिचे वडील लवकर हा प्रश्न सोडवतील.
- Yes, Chetan will watch a cartoon movie.होय, चेतन एक हास्यचित्रपट पाहिल.
- Yes, Karan will plan to go out next week.होय, करण पुढच्या आठवड्यात बाहेर जाण्याची योजना करेल.
- Yes, you will observe the lane.होय, तूम्ही रस्त्याचे नियम पाळाल.
- Yes, they will communicate with each other.होय, ते एकमेकांशी संवाद साधतील.
- Yes, you will drink hot water in the morning.होय, तुम्ही सकाळी गरम पाणी प्याल.
- Yes, his mother will save some money for the tour.होय, त्याचि आई दौर्यासाठी काही पैसे वाचवेल.