प्रश्न विचारण्यासाठी ‘त्या/ ती/ ते' ’ (दोज)चा वापर
या प्रकरणात आपण प्रश्न विचारण्यासाठी 'those' (दोज) च्या वापराबद्दल जाणून घेऊ.
प्रश्नाची रचना
प्रश्न विचारण्यासाठी च्या वाक्याची रचना अशी आहे;
- Are/were + those + other words + ?
- आहेत का/ होते का (क्रियापद) + त्या/ ती/ ते + उर्वरित शब्द + प्रश्न चिन्ह (?)
- Are/were + those + noun + other words + ?
- आहेत का/होते का(क्रियापद) + त्या/ ती/ ते + नाम + इतर शब्द + प्रश्न चिन्ह (?)
येथे काही उदाहरणे आहेत. रचना वरीलप्रमाणे आहे.
चला एक नजर टाकूया-
- Are those oranges fresh?ती संत्री ताजी आहेत का?
- Were those writing papers and pencils?त्या लिहिण्याचे कागद आणि पेन्सिली होत्या का?
- Are those automatic calculators?ते स्वयंचलित गणनयंत्र (कॅल्क्युलेटर) आहेत का?
- Were those garlands of flowers?ते फुलांचे हार होते का?
- Are those children mischievous?ती मुले खोडकर आहेत का?
- Were those mountains very steep?ते पर्वत मोठया चढाचे होते का?
- Are those huts at the bank of the river?त्या झोपड्या नदीच्या काठावर आहेत का?
- Were those the books I needed?ती मला आवश्यक असलेली पुस्तके होती का?
- Are those my phones?ते माझे फोन आहेत का?
- Were those your watercolour bottles?त्या तुझ्या जल रंगाच्या बाटल्या होत्या का?
- Were those selected oil paintings?ती निवडलेली तैलचित्रे होती का?
- Are those trees in the mountains?ती झाडे डोंगरावर आहेत का?
- Are those students serious about their studies?ते विद्यार्थी आपल्या अभ्यासाबाबत गंभीर आहेत का?
- Are those cycles useful for handicaps?त्या सायकली अपंगांसाठी उपयुक्त आहेत का?
- Were those insects very small?ते कीटक खूपच लहान होते का?
- Are those women trained nurses?त्या महिला प्रशिक्षित परिचारिका आहेत का?
- Are those her documents?ती तिची कागदपत्रे आहेत का?
- Are those books available in a library?ती पुस्तके ग्रंथालयात उपलब्ध आहेत का?
- Were those damaged pieces of a blanket?ते ब्लँकेटचे (घोंगडीचे)खराब झालेले तुकडे होते का?
- Were those designs very attractive?त्या डिझाईन्स खूप आकर्षक होत्या का?
- Are those the computers of my son?ती माझ्या मुलाची संगणके आहेत का?
- Are those the assets of the company?त्या कंपनीची मालमत्ता आहे का?
- Are those chairs very expensive?त्या खुर्च्या खूप महाग आहेत का?
- Are those students in the sixth standard?ते विद्यार्थी सहाव्या इयत्तेत आहेत का?
- Are those dresses for ICSE students?ते गणवेश आयसीएसई च्या विद्यार्थ्यांसाठी आहेत का?
- Are those wallets of leather?ते पाकीट चामड्याचे आहेत का?
- Were those bags blue in colour?त्या पिशव्या निळ्या रंगाच्या होत्या का?
- Were those utensils clean?ती भांडी स्वच्छ होती का?
- Are those computer accessories?त्या संगणकाच्या वस्तू आहेत का?
- Were those girls beautiful?त्या मुली सुंदर होत्या का?