Use of ‘Those’ to Ask Questions

प्रश्न विचारण्यासाठी ‘त्या/ ती/ ते' ’ (दोज)चा वापर

या प्रकरणात आपण प्रश्न विचारण्यासाठी 'those' (दोज) च्या वापराबद्दल जाणून घेऊ.

प्रश्नाची रचना

प्रश्न विचारण्यासाठी च्या वाक्याची रचना अशी आहे;

  • Are/were + those + other words + ?
  • आहेत का/ होते का (क्रियापद) + त्या/ ती/ ते + उर्वरित शब्द + प्रश्न चिन्ह (?)
  • Are/were + those + noun + other words + ?
  • आहेत का/होते का(क्रियापद) + त्या/ ती/ ते + नाम + इतर शब्द + प्रश्न चिन्ह (?)

येथे काही उदाहरणे आहेत. रचना वरीलप्रमाणे आहे.

चला एक नजर टाकूया-

  1. Are those oranges fresh?
    ती संत्री ताजी आहेत का?
  2. Were those writing papers and pencils?
    त्या लिहिण्याचे कागद आणि पेन्सिली होत्या का?
  3. Are those automatic calculators?
    ते स्वयंचलित गणनयंत्र (कॅल्क्युलेटर) आहेत का?
  4. Were those garlands of flowers?
    ते फुलांचे हार होते का?
  5. Are those children mischievous?
    ती मुले खोडकर आहेत का?
  6. Were those mountains very steep?
    ते पर्वत मोठया चढाचे होते का?
  7. Are those huts at the bank of the river?
    त्या झोपड्या नदीच्या काठावर आहेत का?
  8. Were those the books I needed?
    ती मला आवश्यक असलेली पुस्तके होती का?
  9. Are those my phones?
    ते माझे फोन आहेत का?
  10. Were those your watercolour bottles?
    त्या तुझ्या जल रंगाच्या बाटल्या होत्या का?
  11. Were those selected oil paintings?
    ती निवडलेली तैलचित्रे होती का?
  12. Are those trees in the mountains?
    ती झाडे डोंगरावर आहेत का?
  13. Are those students serious about their studies?
    ते विद्यार्थी आपल्या अभ्यासाबाबत गंभीर आहेत का?
  14. Are those cycles useful for handicaps?
    त्या सायकली अपंगांसाठी उपयुक्त आहेत का?
  15. Were those insects very small?
    ते कीटक खूपच लहान होते का?
  16. Are those women trained nurses?
    त्या महिला प्रशिक्षित परिचारिका आहेत का?
  17. Are those her documents?
    ती तिची कागदपत्रे आहेत का?
  18. Are those books available in a library?
    ती पुस्तके ग्रंथालयात उपलब्ध आहेत का?
  19. Were those damaged pieces of a blanket?
    ते ब्लँकेटचे (घोंगडीचे)खराब झालेले तुकडे होते का?
  20. Were those designs very attractive?
    Error occurred when trying to fetch the file using wp_remote_get(). cURL error 35: Recv failure: Connection reset by peer
    त्या डिझाईन्स खूप आकर्षक होत्या का?
  21. Are those the computers of my son?
    ती माझ्या मुलाची संगणके आहेत का?
  22. Are those the assets of the company?
    त्या कंपनीची मालमत्ता आहे का?
  23. Are those chairs very expensive?
    त्या खुर्च्या खूप महाग आहेत का?
  24. Are those students in the sixth standard?
    ते विद्यार्थी सहाव्या इयत्तेत आहेत का?
  25. Are those dresses for ICSE students?
    ते गणवेश आयसीएसई च्या विद्यार्थ्यांसाठी आहेत का?
  26. Are those wallets of leather?
    ते पाकीट चामड्याचे आहेत का?
  27. Were those bags blue in colour?
    त्या पिशव्या निळ्या रंगाच्या होत्या का?
  28. Were those utensils clean?
    ती भांडी स्वच्छ होती का?
  29. Are those computer accessories?
    त्या संगणकाच्या वस्तू आहेत का?
  30. Were those girls beautiful?
    त्या मुली सुंदर होत्या का?

   Back          Next