‘त्या/ ती/ ते'(दोज) चा वापरः सकारात्मक उत्तरे
या धड्यात आपण 'those' चा वापर करून सकारात्मक उत्तरे कशी तयार करावी ते पाहू.
सकारात्मक उत्तराची रचना
ही सकारात्मक उत्तरे आहेत. सकारात्मक उत्तराची रचना अशी आहे;
- Yes, + those + are/were + other words
- होय , + त्या/ ती/ ते + क्रियापद + अन्य शब्द
- Yes, + those + noun + are/were + other words
- होय , + त्या/ ती/ ते+ नाम + क्रियापद + अन्य शब्द
किंवा थोडक्यात उत्तर देण्यासाठी आपण फक्त-
- Yes, + those + are/were
- होय + कर्ता + होतो/होते / होती
- Yes, those are.
- Yes, those were.
असे म्हणू शकतो.
येथे काही उदाहरणे आहेत. रचना वरीलप्रमाणे आहे.
एक नजर टाका–
- Yes, those oranges are fresh. होय, ती संत्री ताजी आहेत. (Yes, those are.)
- Yes, those were writing-papers and pencils. होय, त्या लिहिण्याचे कागद आणि पेन्सिली होत्या. (Yes, those were.)
- Yes, those are automatic calculators. होय, ते स्वयंचलित गणनयंत्र (कॅल्क्युलेटर) आहेत. (Yes, those are.)
- Yes, those were garlands of flowers. होय, ते फुलांचे हार होते. (Yes, those were.)
- Yes, those children are mischievous. होय, ती मुले खोडकर आहेत. (Yes, those are.)
- Yes, those mountains were very steep.होय, ते पर्वत मोठया चढाचे होते. (Yes, those were.)
- Yes, those huts are at the bank of the river.होय, त्या झोपड्या नदीच्या काठावर आहेत. (Yes, those are.)
- Yes, those were the books I needed. होय, ती मला आवश्यक असलेली पुस्तके होती. (Yes, those were.)
- Yes, those are my phones. होय, ते माझे फोन आहेत. (Yes, those are.)
- Yes, those were your watercolour bottles.होय, त्या तुझ्या जल रंगाच्या बाटल्या होत्या. (Yes, those were.)
- Yes, those were selected oil paintings. होय, ती निवडलेली तैलचित्रे होती. (Yes, those were.)
- Yes, those trees are in the mountains. होय, ती झाडे डोंगरावर आहेत. (Yes, those are.)
- Yes, those students are serious about their studies. होय, ते विद्यार्थी आपल्या अभ्यासाबाबत गंभीर आहेत. (Yes, those are.)
- Yes, those cycles are useful for handicaps. होय, त्या सायकली अपंगांसाठी उपयुक्त आहेत. (Yes, those are.)
- Yes, those insects were very small. होय, ते कीटक खूपच लहान होते. (Yes, those were.)
- Yes, those women are trained nurses. होय, त्या महिला प्रशिक्षित परिचारिका आहेत. (Yes, those are.)
- Yes, those are her documents. होय, ती तिची कागदपत्रे आहेत. (Yes, those are.)
- Yes, those books are available in a library. होय, ती पुस्तके ग्रंथालयात उपलब्ध आहेत. (Yes, those are.)
- Yes, those were damaged pieces of a blanket. होय, ते ब्लँकेटचे (घोंगडीचे)खराब झालेले तुकडे होते. (Yes, those were.)
- Yes, those designs were very attractive. होय, त्या डिझाईन्स खूप आकर्षक होत्या. (Yes, those were.)
- Yes, those are the computers of my son.होय, ती माझ्या मुलाची संगणके आहेत. (Yes, those are.)
- Yes, those are the assets of the company. होय, त्या कंपनीची मालमत्ता आहे.(Yes, those are.)
- Yes, those chairs are very expensive. होय, त्या खुर्च्या खूप महाग आहेत. (Yes, those are.)
- Yes, those students are in the sixth standard. होय, ते विद्यार्थी सहाव्या इयत्तेत आहेत.(Yes, those are.)
- Yes, those dresses are for ICSE students. होय, ते गणवेश आयसीएसई च्या विद्यार्थ्यांसाठी आहेत. (Yes, those are.)
- Yes, those wallets are of leather.होय, ते पाकीट चामड्याचे आहेत. (Yes, those are.)
- Yes, those bags were blue in colour. होय, त्या पिशव्या निळ्या रंगाच्या होत्या. (Yes, those were.)
- Yes, those utensils were clean. होय, ती भांडी स्वच्छ होती. (Yes, those were.)
- Yes, those are computer accessories. होय, त्या संगणकाच्या वस्तू आहेत. (Yes, those are.)
- Yes, those girls were beautiful.होय, त्या मुली सुंदर होत्या. (Yes, those were.)