Use of Am: Negative Sentence About Continuous Action

Am चा उपयोग: सतत कृती बद्दल नकारात्मक वाक्य

या प्रकरणात आपण नकारात्मक वाक्यातिल 'am'च्या वापराबद्दल जाणून घेऊ.

आपण वर्तमानात निरंतर सुरु असलेल्या क्रियेबद्दल सांगण्यासाठी नकारात्मक वाक्यात (am) आहे चा वापर करतो.

आता आपण सतत कृतीबद्दल सांगण्यासाठी नकारात्मक वाक्यात 'am' कसे वापरावे ते शिकू.

या वाक्यांमध्ये आपण मुख्य क्रियापदासह ‘am’ साह्यकारी क्रियापद म्हणून वापरतो.

आपण क्रियापदाच्या कृदंत रूपाचा (-ing) वापर केला पाहिजे.

वाक्याची रचना

या वाक्यात, अन्य (दुसऱ्या) क्रियापदासह am not ‘नाही’ वापरला जातो.

वाक्य या  स्वरुपात असेल-

  • I + am not + -ing form of main verb + remaining words
  • मी + नाही + मुख्य क्रियापदाचे कृदंत (-ing) रूप + उर्वरित शब्द.

येथे काही उदाहरणे आहेत. रचना वरीलप्रमाणे आहे.

एक नजर टाका-

  1. I am not going home.
      मी घरी जात नाही.
  2. I am not coming in five minutes.
    मी पाच मिनिटांत येत नाही.
  3. I am not studying at Mumbai University.
    मी मुंबई विद्यापीठात शिकत नाही.
  4. I am not teaching English Grammar.
    मी इंग्रजी व्याकरण शिकवित नाही.
  5. I am not eating fruit.
    मी फळ खात नाही.
  6. I am not brushing my teeth.
    मी माझे दात घासत नाही.
  7. I am not laughing at you.
    मी तुला हसत नाही.
  8. I am not crying for your help.
    मी तुमच्या मदतीसाठी ओरडत नाही.
  9. I am not frying snacks.
    मी खाद्यपदार्थ तळत नाही.
  10. I am not singing a song.
    मी गाणे गात नाही.
  11. I am not telling a story.
    मी एक कथा सांगत नाही.
  12. I am not watching an action movie.
    मी एक कृती  चित्रपट पहात नाही.
  13. I am not writing a drama.
    मी नाटक लिहित नाही.
  14. I am not feeling well now.
    आता मला बरे वाटत नाही.
  15. I am not reading a novel.
    मी एक कादंबरी वाचत नाही.
  16. I am not closing the door.
    मी दार बंद करीत नाही.
  17. I am not catching a ball.
    मी चेंडू पकडत नाही.
  18. I am not playing cricket.
    मी क्रिकेट खेळत नाही.
  19. I am not glorifying it.
    मी त्याचा गौरव करीत नाही.
  20. I am not drinking water.
    मी पाणी पित नाही.
  21. I am not cleaning the house.
    मी घर साफ करत नाही.
  22. I am not pulling it.
    मी ते खेचत नाही.
  23. I am not pushing it.
    मी ते ढकलत नाही.
  24. I am not opening the window.
    मी खिडकी उघडत नाही.
  25. I am not booking a ticket.
    मी तिकीट आरक्षित करीत नाही.
  26. I am not standing in front of you.
    मी तुझ्यासमोर उभा नाही.
  27. I am not sitting in a chair.
    मी खुर्चीवर बसत नाही.
  28. I am not enjoying the match.
    मी एक सामन्याचा आनंद घेत नाही.
  29. I am not cooking for my kids.
    मी माझ्या मुलांसाठी स्वयंपाक करीत नाही.
  30. I am not wandering out of my house.
    मी माझ्या घराबाहेर भटकत नाही.

               Back          Next