Use of ‘Are’ to Tell about Profession

व्यवसायाबद्दल सांगण्यासाठी ‘आहेत’ चा वापर

या धड्यात आपण व्यवसायाबद्दल सांगण्यासाठी ‘are’ चा उपयोग शिकू.

या वाक्याची रचना मागील धड्यातील वाक्यांसारखीच आहे.

वाक्याची रचना

या वाक्याची रचना आहे-

  • Subject(we/you/you/they/these/those) + are + remaining words
  • कर्ता (आम्ही /तू /तूम्ही/ ते/ या /त्या कोणतेही अनेकवचनी नाम ) + are आहेत + उर्वरित शब्द

लक्षात ठेवा-

  • आपण इतर लोकांशी आदराने बोलतो.
  • दुसर्‍या एखा द्या व्यक्तीबरोबर बोलताना आपण मराठीत अनेकवचनी संज्ञा प्रमाणे बोलतो.
  • म्हणून आपण एका व्यक्तीसही ‘तु’ ऐवजी ‘तुम्ही’ असे संबोधतो.
  • परंतु इंग्रजीमध्ये ‘तु’ आणि ‘तुम्ही’ या दोन्हीसाठी ‘you’ वापरले जाते.

येथे काही उदाहरणे आहेत. रचना वरीलप्रमाणे आहे.

एक नजर टाका–

  1. You are a doctor.
    तू डॉक्टर आहेस.
  2. We are professors.
    आम्ही प्राध्यापक आहोत.
  3. They are potters.
    ते कुंभार आहेत.
  4. My sisters are engineers.
    माझ्या बहिणी अभियंत्या (अभियंता )आहेत.
  5. You are a cook.
    तू एक स्वयंपाकीण आहेस. / तूम्ही एक स्वयंपाकीण आहात.
  6. They are hawkers.
    ते फेरीवाले आहेत.
  7. Her sisters are designers.
    तिच्या बहिणी योजक (डिझाइनर) आहेत.
  8. We are collectors.
    आम्ही संग्राहक/ जिल्हाधिकारी आहोत.
  9. They are watchmen.
    ते पहारेकरी आहेत.
  10. You are an advocate.
    तू/तूम्ही वकील आहात.
  11. You are a manager.
    तू/ तूम्ही व्यवस्थापक आहात.
  12. You are a reporter.
    तू/तूम्ही पत्रकार आहात.
  13. They are blacksmiths.
    ते लोहार आहेत.
  14. His two uncles are photographers.
    त्याचे दोन काका छायाचित्रकार आहेत.
  15. They are players.
    ते खेळाडू आहेत.
  16. You are a motorman.
    तू/ तूम्ही एक आगगाडी चालक आहात.
  17. We are clerks.
    आम्ही लिपिक आहोत.
  18. They are poets.
    ते कवी आहेत.
  19. We are nurses.
    आम्ही परिचारिका आहोत.
  20. You are a driver.
    तु/तुम्ही एक वाहनचालक आहात.
  21. We are shopkeepers.
    आम्ही दुकानदार आहोत.
  22. You are a writer.
    तुम्ही एक लेखक आहात.
  23. We are architects.
    आम्ही वास्तुविद्याविशारद आहोत.
  24. You are an officer.
    तू एक अधिकारी आहेस.
  25. All my friends are pilots.
    माझे सर्व मित्र वैमानिक आहेत.
  26. They are ministers.
    ते मंत्री आहेत.
  27. We are MLAs.
    आम्ही आमदार आहोत.
  28. They are teachers.
    ते शिक्षक आहेत.
  29. They are book publishers.
    ते पुस्तक प्रकाशक आहेत.
  30. We are booksellers.
    आम्ही पुस्तक विक्रेते आहोत.

BACK        NEXT